मानेंना भाजप, शिवसेना शिंदे गट, महाडिक गट, सदाभाऊ खोत यांच्या साथीनेच इथे लढावे लागेल. त्यांचा वैयक्तिक संपर्क कमी आहे.
इस्लामपूर : लोकसभेच्या रिंगणात इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात (Islampur Assembly Constituency) आमदार जयंत पाटील (Jayant Patil) कोणाच्या बाजूने, यावर मतांचे गणित ठरणार आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांचा पंधरा वर्षांपासून संपर्क असून, त्यांचा मतदारसंघात राबता आहे. खासदार धैर्यशील माने यांना स्थानिक पातळीवरील जयंत पाटील यांच्या पारंपरिक विरोधकांना हाताशी धरून वाटचाल करावी लागेल.
लोकसभेला ऊसदराच्या मुद्द्यावर मतदान करणारा मतदारसंघ आहे. येथे जयंत पाटील यांचे मोठे प्राबल्य आहे. शेट्टींचे बोटावर मोजण्याइतपतच उघड कार्यकर्ते आहेत. तरीही शेट्टींना या मतदारसंघात प्रत्येक निवडणुकीत विरोधी उमेदवारापेक्षा जादा मतदान झाले आहे. या मतदारसंघात विधानसभेला जयंत पाटील व लोकसभेला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढणाऱ्याला कौल व्यक्त केला जातो, असे चित्र राहिले आहे.
गेल्या निवडणुकीत शेट्टी (Raju Shetti) यांचा पराभव झाला असला, तरी या मतदारसंघात शेट्टी पुढे राहिले. त्यामुळे येथे पक्षीय गणिते उपयोगाला येत नाहीत. या वेळी राष्ट्रवादी, शिवसेना या पक्षांची फाटाफूट झाली आहे. शिवसेनेचे मर्यादित नेटवर्क असल्याने कार्यकर्त्यांची कमतरता आहे. तरीही धैर्यशील माने यांनी शेवटच्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात निधी देऊन बॅकलॉक भरून काढण्याचा प्रयत्न केला आहे.
मानेंना भाजप, शिवसेना शिंदे गट, महाडिक गट, सदाभाऊ खोत यांच्या साथीनेच इथे लढावे लागेल. त्यांचा वैयक्तिक संपर्क कमी आहे. त्यातच जयंत पाटील यांच्या विरोधकांमध्ये राजू शेट्टी यांच्याविषयी असलेला पूर्वीपासूनचा जिव्हाळा हा मुद्दाही निर्णायक असेल. त्यामुळे धैर्यशील माने यांना इस्लामपूर मतदारसंघात मोठी कसरत करावी लागेल. जयंत पाटील यांचीही या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लागल्याने ते ज्याच्या बाजूने असतील, त्याच उमेदवाराला या ठिकाणी मोठे समर्थन मिळण्याची शक्यता आहे.
या मतदारसंघात ठाकरे, शरद पवार गट कोणाच्या बाजूला असणार, याबरोबरच ऊसपट्टा असल्याने आजपर्यंत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांना झालेली मदत व त्यांच्याविषयी उठवलेला आवाज यावर इथला मतदार विचार करून आपले मत ठरवतो. हा मतदारसंघ जयंत पाटील यांचा बालेकिल्ला असल्यामुळे ते या मतदारसंघात पुन्हा एकदा आपली ताकद सिद्ध करण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावतील.
मतदारांशी वैयक्तिक संपर्क
ऊसदराचा मुद्दा
जयंत पाटील यांची भूमिका
जयंत पाटील यांचे विरोधक
कोणाच्या बाजूने?
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.