सत्ता आल्यानंतर आणि खुर्चीवर बसल्यानंतर माणूस बदलतो, याचा अनुभव उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या बाबतीत आला.
मांगले : ‘‘शिराळा-वाळव्यातील कारखानदारांनो, विनाकारण माझ्या वाटेला जाऊ नका, चार जूनला गुलाल मलाच लागणार आहे, आता तुम्ही रिकामे आहात, सहा महिन्यानंतर मी रिकामा असणार आहे, माझ्या कामात अडथळे आणल्यास येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मी काय करतो ते पाहा,’’ असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील उमेदवार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी येथे दिला.
मांगले येथे प्रचार सभा झाली, त्या वेळी ते बोलत होत. शेट्टी म्हणाले, ‘‘शिराळा तालुक्यातील नागरिकांवर मोठी दडपशाही सुरू आहे. लोक जवळ यायला तयार नाहीत. भेटायला गेलो तर मागच्या दाराने बाहेर काढत आहेत. लोकशाहीचा गळा घोटणाऱ्यांना केवळ मीच जाब विचारू शकतो. कारण माझ्या मिशीला कुठेही खरकटे लागलेले नाही.’’
राजू शेट्टी म्हणाले, ‘‘आंबेडकरांनाही (Dr. Babasaheb Ambedkar) अभिमान वाटेल असे मी काम केले आहे. शेवटच्या श्वासापर्यंत माझा हात स्वच्छ असणार आहे. गेली वीस वर्षे वर्गणी काढून निवडणूक लढवत आहे. सत्ता आल्यानंतर आणि खुर्चीवर बसल्यानंतर माणूस बदलतो, याचा अनुभव उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या बाबतीत आला. एकरकमी एफआरपीची मागणी करीत होतो, मात्र कारखानदाराचे ऐकून एफआरपीचे तुकडे केले. शेतकऱ्यांवर दूरगामी परिणाम करणारे कायदे मंजूर करण्यात माझा मोठा वाटा आहे.’’
शेट्टी यांनी आमदार जयंत पाटील, मानसिंगराव नाईक यांच्यासह उमेदवार धैर्यशील माने, सत्यजित पाटील यांच्यावर टीकेची झोड उठवली. स्वाभिमानी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. संजय जगताप, कैलास पाटील, प्रहार संघटनेचे बंटी नांगरे, पोपटराव मोरे, रविंद्र मोरे, सर्जेराव कोकाटे, संजय चरापले, राजाराम खोत, दिग्विजय पाटील, मानसिंग पाटील ,सूर्यभान जाधव, कैलास देसाई, गजानन पाटील, मोहनराव पाटील आदी उपस्थित होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.