Kolhapur Loksabha : शामराव माळी यांचं 'घोडा' चिन्ह अन् काँग्रेस उमेदवाराचा फक्त 165 मतांनी झाला पराभव

त्याचवेळी काँग्रेसचे कै. शंकरराव माने हे केवळ १६५ मतांनी पराभूत झाले होते.
Kolhapur Loksabha 1977
Kolhapur Loksabha 1977esakal
Updated on
Summary

माळी यांनी १९७७ मध्ये अपक्ष, १९८० मध्ये राष्ट्रीय लोकमंचतर्फे, १९८४ व १९९६ ची निवडणूक पुन्हा अपक्ष अपक्ष म्हणून लढवली.

Kolhapur Loksabha 1977 : कोल्हापूर लोकसभेच्या (Kolhapur Loksabha) यापूर्वीच्या निवडणुकीतील अनेक मजेदार किस्से आहेत. त्यापैकीच एक म्हणजे शामराव माळी (Shamrao Mali) आणि त्यांचे ‘घोडा’ चिन्ह (Horse Symbol). माळी यांनी लोकसभेच्या चार निवडणुका लढवल्या, त्यात त्यांचा विजय झाला नसला, तरी त्यांची उमेदवारी ही नेहमीच चर्चेचा विषय राहिली. १९७७ च्या लोकसभेच्या निवडणुकीत तर काँग्रेसचे कै. शंकरराव माने हे त्यांच्यामुळे पराभूत झाले.

श्री. माळी हे मूळचे मंगळवार पेठेतील. प्रॅक्टिस क्लबजवळ त्यांचे घर. फार मोठी राजकीय पार्श्‍वभूमी नसली, तरी प्रत्येक लोकसभेच्या निवडणुकीत त्यांची उमेदवारी ही ठरलेली होती. त्यांनी अर्ज भरला की लोक आवर्जून त्यांच्याकडे का निवडणूक लढवता? असा प्रश्‍न विचारायचे. त्यावरही त्यांचे उत्तर गमतीदार असायचे. ते म्हणाले, ‘मी केसाने डोंगर ओढायला लागलो आहे, तुटला तर केस आणि आला तर डोंगर.’ त्यांच्या या उत्तराचीही गंमत वाटायची.

Kolhapur Loksabha 1977
महाराष्ट्र लुबाडला जाताना दाढीवाले मिंधे दिल्लीची चाकरी करतायत, त्यांचे बूट चाटताहेत; ठाकरेंचा घणाघाती हल्ला

श्री. माळी यांनी पहिल्यांदा १९७७ मध्ये लोकसभेची निवडणूक लढवली. त्या निवडणुकीत त्यांचे चिन्ह होते ‘घोडा’. याच चिन्हावर जिल्हा परिषदेची निवडणूक नागाप्पाण्णा बटकडली गडहिंग्लजमधून लढवली होती, त्यात बटकडली हे विजयी झाले होती. लोकसभेच्या निवडणुकीत बटकडलीच रिंगणात असल्याचे समजून त्यांना केवळ गडहिंग्लज तालुक्यातून १५०० मते मिळाली. त्या निवडणुकीत त्यांना एकूण २१०९ मते मिळाली होती; पण त्याचवेळी काँग्रेसचे कै. शंकरराव माने हे केवळ १६५ मतांनी पराभूत झाले होते. शेतकरी कामगार पक्षाचे कै. दाजिबा देसाई यांनी ही निवडणूक जिंकली होती.

Kolhapur Loksabha 1977
Kolhapur Loksabha : तब्बल 25 वर्षांनंतर कोल्हापुरात दिसणार 'हात'; शाहू महाराजांच्या उमेदवारीने मिळाली प्रतिष्ठा

माळी यांनी १९७७ मध्ये अपक्ष, १९८० मध्ये राष्ट्रीय लोकमंचतर्फे, १९८४ व १९९६ ची निवडणूक पुन्हा अपक्ष अपक्ष म्हणून लढवली. त्यांचा विजयच काय; पण अमानतही वाचली नाही; पण उमेदवारी नेहमीच चर्चेत राहिली. १९७७ मध्ये २१०९, १९८० साली १६०१, ८४ साली १४६३, तर ९६ च्या निवडणुकीत ७४३ मते मिळाली होती. या लोकसभेच्या निमित्ताने त्यांच्या उमेदवारीच्या आठवणी ताज्या झाल्या.

Kolhapur Loksabha 1977
Kolhapur LokSabha : पहिल्याच निवडणुकीत सदाशिवराव मंडलिकांनी 61 हजारांच्या फरकानं घाटगेंवर मिळवला विजय!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.