Ichalkaranji Loksabha : इचलकरंजीत पाच निवडणुकांत तीन वेगवेगळ्या खासदारांना साथ; माने विरुद्ध आवाडे लढत ठरली निर्णायक

१९९६ च्या निवडणुकीत बाळासाहेब माने यांच्यानंतर काँग्रेसचा उमेदवार कोण? अशी चर्चा होती.
Ichalkaranji Lok Sabha Constituency
Ichalkaranji Lok Sabha Constituencyesakal
Updated on
Summary

निवेदिता माने (Nivedita Mane) यांनी आवाडे यांना जोरदार लढत दिली. तेरापैकी चार उमेदवारच आपला कस दाखवू शकले. इतर उमेदवारांना चार आकडी मतदान मिळाले.

कोल्हापूर : इचलकरंजी लोकसभा मतदारसंघात (Ichalkaranji Lok Sabha Constituency) काँग्रेसमधील (Congress) गटबाजी कायम चर्चेचा विषय असायची. १९९६ च्या पूर्वीच्या निवडणुकीत अंतर्गत राजकारणाची उदाहरणे पाहायला मिळाली. १९९६ च्या निवडणुकीत बाळासाहेब माने यांच्यानंतर काँग्रेसचा उमेदवार कोण? अशी चर्चा होती. माने यांनी स्नुषा निवेदिता माने यांचे नाव पुढे आणले. पण, काँग्रेसने कल्लाप्पाण्णा आवाडे यांची उमेदवारी जाहीर केली. त्यातून माने यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. कॉंग्रेसमधीलच दोन उमेदवारांत लढत झाली व आवाडे निवडून आले.

Ichalkaranji Lok Sabha Constituency
Kolhapur Loksabha : शामराव माळी यांचं 'घोडा' चिन्ह अन् काँग्रेस उमेदवाराचा फक्त 165 मतांनी झाला पराभव

तिथून २००९ पर्यंतच्या पाच निवडणुकांत तीन वेगवेगळे खासदार झाले. इचलकरंजीतील गटातटाचे राजकारण मोठे होते. या निवडणुकीत आवाडे (Kallappanna Awade) यांच्याविरोधात बाळासाहेब माने गट होता. १९९१ च्या निवडणुकीत उमेदवार उभे करणाऱ्या भाजपने (BJP) या निवडणुकीत गणपतराव सरनोबत यांना उमेदवारी दिली. तसेच भाकपचे के. एल. मलाबादे तसेच अन्य असे एकूण १३ उमेदवार रिंगणात होते.

Ichalkaranji Lok Sabha Constituency
उदयनराजेंच्या उमेदवारीचा निर्णय पुन्हा लांबणीवर; सलग दुसऱ्या दिवशीही राजेंना मिळाली नाही अमित शहांची भेट

निवेदिता माने (Nivedita Mane) यांनी आवाडे यांना जोरदार लढत दिली. तेरापैकी चार उमेदवारच आपला कस दाखवू शकले. इतर उमेदवारांना चार आकडी मतदान मिळाले. त्यात आवाडे यांना दोन लाख ३७ हजार, तर निवेदिता माने यांना दोन लाख नऊ हजार व गणपतराव सरनोबत यांना १ लाख २५ हजार मते मिळाली. त्यानंतर १९९८ मध्ये झालेल्या निवडणुकीत आवाडे यांची लढत पुन्हा निवेदिता माने यांच्याशी झाली. माने यांनी शिवसेनेची उमेदवारी घेतली होती. त्यावेळी नऊ उमेदवार असले तरी दोघांतच लढत झाली. त्यावेळीही माने यांना अवघ्या १२ हजार मतांनी पराभव पत्करावा लागला.

Ichalkaranji Lok Sabha Constituency
Sangli Loksabha : ठाकरेंचा ‘शब्द’, काँग्रेसला ‘कोडे’; सांगलीचा तिढा सुटणार कसा? चंद्रहारच्या घोषणेनंतर ठिणग्या

माने यांना दोन वेळा संधी

आवाडे यांना दोन वेळा संधी मिळाल्यानंतर १९९९ च्या निवडणुकीपूर्वी स्थापन झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून निवेदिता माने यांना उमेदवारी मिळाली. त्यावेळी काँग्रेसकडून आवाडे, तसेच शिवसेनेकडून पुंडलिक जाधव लढले. त्यात माने यांनी १२ हजार मतांनी विजय मिळवला. २००४ च्या निवडणुकीत माने यांच्याविरोधात शिवसेनेकडून डॉ. संजय पाटील यांनी निवडणूक लढवली. त्यावेळी माने यांनी एक लाखावर मतांनी विजय मिळवला. २००९ मध्ये माने यांचा राजू शेट्टी यांनी पराभव केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.