Satara LokSabha : सातारा जातीयवादी विचाराकडे कधीही जाऊ देणार नाही; काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण?

महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) कोणीही उमेदवार असला तरी आम्ही ताकदीने तो उमेदवार निवडून आणणार आहोत.
Prithviraj Chavan and PM Narendra Modi
Prithviraj Chavan and PM Narendra Modiesakal
Updated on
Summary

'पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) विरोधातील जी मते आहेत, त्याची विभागणी होऊ नये, यासाठी आमचे प्रयत्न सुरू होते.'

कऱ्हाड : महाविकास आघाडीतून कोणाला उमेदवारी द्यायची, तो निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल. सातारा लोकसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. त्यांच्याकडून उमेदवार ठरवण्याचे काम सुरू आहे. मात्र, सातारा लोकसभा मतदारसंघ जातीयवादी विचाराकडे कधीही गेलेला नाही आणि आम्ही तो जाऊनही देणार नाही, असा निर्धार केल्याचे माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी जाहीर केले.

Prithviraj Chavan and PM Narendra Modi
महाराष्ट्र लुबाडला जाताना दाढीवाले मिंधे दिल्लीची चाकरी करतायत, त्यांचे बूट चाटताहेत; ठाकरेंचा घणाघाती हल्ला

महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) कोणीही उमेदवार असला तरी आम्ही ताकदीने तो उमेदवार निवडून आणणार आहोत, अशीही भूमिका त्यांनी आज स्पष्ट केली. काँग्रेसच्या कऱ्हाड दक्षिण मतदारसंघातील कार्यकर्त्यांची बैठक आज घेण्यात आली. त्यानंतर माध्यमांशी ते बोलत होते. काँग्रेसचे सरचिटणीस अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, कऱ्हाड दक्षिणचे अध्यक्ष मनोहर शिंदे, प्रा. धनाजी काटकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Prithviraj Chavan and PM Narendra Modi
Kolhapur Loksabha : धैर्यशील माने, मंडलिक अजूनही गॅसवरच; निर्णय लांबल्याने उमदेवारीचा तिढा कायम, कार्यकर्ते अस्वस्थ

सांगलीच्या महाविकास आघाडीच्या जागेवरून वाद सुरू आहेत. त्यावर ते म्हणाले, ‘‘सांगलीची जागा काँग्रेस पक्षाला मिळावी, ही तेथील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची आग्रही मागणी आहे. शिवसेनेनेही तेथे मागणी केली आहे. वरिष्ठ पातळीवर दिल्लीला त्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. त्यातून योग्य निर्णय होईल.’’ महाविकास आघाडीतून वंचित बाहेर पडले आहे, असे खासदार संजय राऊत म्हणत आहेत. त्यावर आमदार चव्हाण म्हणाले, ‘‘वंचित आघाडीने ठराविक ठिकाणी महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) विरोधातील जी मते आहेत, त्याची विभागणी होऊ नये, यासाठी आमचे प्रयत्न सुरू होते. मात्र, ते होताना दिसत नाहीत.’’

साताऱ्याच्या जागेबाबत आमदार चव्हाण म्हणाले, ‘‘महाविकास आघाडीतून कोणाला उमेदवारी द्यायची, तो निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल. साताऱ्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. त्यांच्याकडून उमेदवार ठरवण्याचे काम सुरू आहे. जातीयवादी विचाराकडे कधीही सातारा लोकसभेची जागा गेलेली नाही आणि आम्ही ती जाऊनही देणार नाही, असा निर्धार केल्याचे आमदार चव्हाण यांनी जाहीर केले. महाविकास आघाडीचा उमेदवार आम्ही ताकदीने निवडून आणणार आहोत, असेही ते म्हणाले.

Prithviraj Chavan and PM Narendra Modi
Kolhapur Loksabha : शाहू छत्रपती महाराजांच्या प्रचारासह विजयी सभेलाही कोल्हापुरात येणार; उद्धव ठाकरेंची ग्वाही

पृथ्वीराज चव्हाण यांना संधी द्यावी

सातारा लोकसभा मतदारसंघातून आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी काँग्रेसच्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी व जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांनी केली. या वेळी त्यांनी बाबांची स्वच्छ प्रतिमा आहे. देशाच्या प्रश्नांची त्यांना जाण आहे. त्यांच्याविरोधात कोणीही उभे राहिले तरी तो निवडून येणार नाही. त्यामुळे काँग्रेसकडून त्यांना लोकसभा निवडणूक उमेदवार म्हणून संधी द्यावी, अशी आमची मागणी असल्याचे सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()