Ramdas Athawale: "एनडीएला 400 जागा जिंकणं अजिबात अवघड नाही"; आठवलेंना का आहे एवढा ठाम विश्वास?

महायुतीचे उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचारासाठी गडचिरोलीत दाखल झाल्यानंतर रामदास आठवले पत्रकार परीषदेत बोलत होते.
ramdas athawale
ramdas athawaleesakal
Updated on

गडचिरोली : देशात पुन्हा सत्तेत आल्यावर भाजप संविधान बदलेल अशी आवई विरोधी पक्ष उठवत असतात पण ही निव्वळ अफवा आहे, असं सांगत सेंट्रल विस्टामध्ये संविधान ठेवून त्यापुढे नतमस्तक होणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी कसे काय संविधान बदलतील, असा प्रतिप्रश्न रिपाइंचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी विचारला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली जनकल्याणाची कामं बघता यंदा ४०० पार आकडा गाठणं भाजप व महायुतीसाठी अजिबात अवघड नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. (It is not difficult for NDA to win 400 seats says RPI leader Ramdas Athawale)

ramdas athawale
Stories of Election: किस्से निवडणुकीचे! सुप्रिया सुळेंचा प्रचार सुरु झाला पण विरोधकांवर टीकाच करता येईना

मंगळवार (ता. ९) महायुतीचे उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचारार्थ गडचिरोलीत दाखल झाल्यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परीषदेत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आठवले म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनधन योजना, उज्ज्वला गॅस, प्रधानमंत्री पीकविमा योजना, गरीबांना मोफत धान्य, आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून ५ लाखांपर्यंतचे मोफत उपचार, अशा अनेक कल्याणकारी योजना राबविल्या आहेत. त्यामुळे ते देशातील लोकप्रिय पंतप्रधान आहेत. आता आम्ही लक्षद्वीपमध्येही पक्ष संघटन बांधणार आहोत.

ramdas athawale
Sangali Lok Sabha: सांगलीसाठी शिवसेनेनं जोर का लावला? काँग्रेसची पिछेहाट का झाली? जाणून घ्या

खासदार अशोक नेते यांनी आपल्या खासदारकीच्या काळात गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या संख्येने विकासकामे केली असून हा विकासाचा वेग कायम राखण्यासाठी त्यांनाच निवडून द्यावे, असेही ते म्हणाले. या पत्रकार परीषदेला महायुतीचे उमेदवार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, भाजपचे जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अॅड. जनबंधू, प्रदीप आगलावे आदी उपस्थित होते. (Latest Marathi News)

ramdas athawale
Vishwajeet Kadam, Vishal Patil : सांगलीच्या जागेवर शिवसेनेचं शिक्कामोर्तब; विश्वजीत कदम, विशाल पाटील नॉटरिचेबल?

कार्यकर्ते म्हणाले मोदींसोबत राहा

या लोकसभेत शिर्डी मतदार संघातून मी आपल्यासाठी व सोलापूर मतदार संघातून आपल्या पक्षाचे राजा सरोदे यांच्यासाठी जागा मागितली होती. पण शिर्डी इथं शिवसेना नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विद्यमान खासदार असल्याने ती जागा मिळाली नाही. सोलापुरचीही जागा मिळाली. मात्र आमचे कार्यकर्ते मला म्हणाले की, तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींचे देशविकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांच्यासोबतच राहा, म्हणून मी महायुतीत राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.