Loksabha Election 2024 : ‘आमचं ठरलंय’, तुतारी हाती घेणार ; जयसिंह मोहिते पाटील,भाजपविरोधात फुंकले रणशिंग

आमचं ठरलंय!’, म्हणत धैर्यशील मोहिते-पाटील हे तुतारी घेऊन माढ्याच्या रणांगणात उतरतील, अशी स्पष्ट भूमिका मोहिते पाटील गटाचे रणनीतीकार जयसिंह मोहिते-पाटील यांनी आज माध्यमांशी बोलताना मांडली.
Loksabha Election 2024
Loksabha Election 2024sakal
Updated on

नातेपुते : ’आमचं ठरलंय!’, म्हणत धैर्यशील मोहिते-पाटील हे तुतारी घेऊन माढ्याच्या रणांगणात उतरतील, अशी स्पष्ट भूमिका मोहिते पाटील गटाचे रणनीतीकार जयसिंह मोहिते-पाटील यांनी आज माध्यमांशी बोलताना मांडली. आम्ही कुठल्याही पक्षाचे नाही. आमचा पक्ष एकच विजयदादा. आता तुतारी घेऊन आम्ही निवडणूक लढणार आहोत. त्याबाबत शरद पवारांशी चर्चा होणे गरजेचे आहे. त्यांचा निर्णय महत्त्वाचा आहे. राजकारणात ठराविक वेळेतच काही गोष्टी करायच्या असतात. त्यामुळे आतापर्यंत आम्ही शांत आहोत. सर्वांचे म्हणणे आहे की, धैर्यशील यांनी तुतारीवर लढावे, असे सांगत जयसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपविरोधात रणशिंग फुंकले आहे.

जयसिंह मोहिते पाटील म्हणाले, माढा लोकसभा मतदारसंघात भाजप विरोधी सुनामी आली आहे. आमचा पक्ष म्हणजे विजयदादा आहे. कमळाचे कुणीही नाव काढत नाही. गिरीश महाजन आले त्याच दिवशी तुतारी वाजवणार होतो, परंतु ते योग्य दिसले नसते. आमच्या बंडामुळे माढा, सोलापूर, बारामती हे तीन लोकसभा मतदारसंघ भाजपच्या हातून गेल्यात जमा आहेत. तसेच जिल्ह्यातील माढा, सांगोला, करमाळा, माळशिरस तसेच माण हे विधानसभा मतदारसंघही भाजपच्या हातून जाणार आहेत.

धैर्यशील आता तुतारीवर निवडणूक लढवणार आहेत. मोहिते पाटील गटाचे सर्व कार्यकर्ते भाजपच्या सर्व पदांचा एकाच दिवशी राजीनामा देणार आहेत. मी कोणत्याही राजकीय पक्षाचा पहिल्यापासून सभासद नाही. मी संपूर्ण मतदारसंघाचा आढावा घेतला आहे. कुणीही कमळाचे नाव काढत नाही, असेही जयसिंह मोहिते पाटील म्हणाले. मोहिते-पाटील कुटुंबातील भाजपचे जिल्हा संघटक धैर्यशील मोहिते-पाटील यांनी माढा लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडे उमेदवारी मागितली होती.

Loksabha Election 2024
Solapur Lok Sabha 2024 : सोलापूर लोकसभा मतदारसंघात रामराज्य येणार? सातपुतेंच्या विजयात राहणार शिवसेनेचा निर्णायक वाटा

पक्षाने त्यांना डावलल्यापासून मोहिते पाटील गट अस्वस्थ आणि आक्रमक भूमिकेत आहे. मोहिते-पाटील गटाचे चाणक्य समजले जाणारे अकलूजच्या शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील हे पहिल्या दिवसापासून बंडाची भाषा करीत आहेत. मात्र या सर्वांपासून आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील हे स्वतःला दूर ठेवीत आहेत. प्रसारमाध्यमा पुढे किंवा इतर कुणापुढेही ते बंडाची भाषा करताना दिसत नाहीत. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण मोहिते पाटील गट भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केल्यापासून बंडाची भाषा करीत आहेत.

हे बंड उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खास दूत मंत्री गिरीश महाजन यांच्या भेटीनंतर शमेल, असे अनेकांना वाटत होते. तसे न होता उलट पक्षी त्यांच्यासमोर मोठे शक्ती प्रदर्शन करीत आपल्या उमेदवारीचा हक्क मोहिते पाटील यांनी अधोरेखित केला आहे. तेव्हा संपूर्ण माढा लोकसभा मतदारसंघात मोहिते पाटील परिवारातील बहुतेक सदस्य दररोज दहा-वीस गावांमधून मान्यवरांच्या भेटीगाठी घेत आपल्या उमेदवारीची चाचपणी करताना दिसतात.

आमदार रणजितसिंह आमचे ऐकत नाहीत

आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आमचे ऐकत नाहीत. ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घाबरत असल्याचे दिसते. त्यांचे पण बरोबर आहे, रणजितसिंह यांना फडणवीस यांनी अनेकवेळा मदत केली आहे. त्यामुळे ते नैतिकता सोडू शकत नाही. परंतु आम्ही आता गप्प बसणार नाही. रणजितसिंह वगळता धैर्यशील मोहिते-पाटील यांना सर्व मोहिते पाटील कुटुंबाचा पाठिंबा आहे. आता आमचं ठरलंय तुतारी हाती घेणारच, असेही जयसिंह मोहिते पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.