Belgaum Politics : चार आमदार अन् एक खासदार; बेळगावच्या राजकारणात जारकीहोळी घराण्याचा दबदबा कायम

बेळगाव जिल्ह्यातील राजकारणातील जारकीहोळी कुटुंबाचा प्रभाव पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
Belgaum Politics Jarkiholi Family
Belgaum Politics Jarkiholi Familyesakal
Updated on
Summary

जारकीहोळी कुटुंबातील पाच भावंडांपैकी चौघे आता आमदार आहे. त्यांच्या दुसऱ्या पिढीतील प्रियंका खासदार बनल्या आहेत.

बेळगाव : बेळगाव जिल्ह्याच्या राजकारणावर तीन दशकांपासून प्रभाव असलेल्या गोकाकच्या जारकीहोळी कुटुंबातील सदस्यांचा आता लोकसभेतही प्रवेश झाला आहे. त्यामुळे कुटुंबातील पाच जण लोकप्रतिनिधी झाले आहेत. जारकीहोळी (Jarkiholi Family) बंधूंपैकी चौघेजण कर्नाटक विधिमंडळाचे सदस्य आहेत. परंतु, आजवर जारकीहोळी कुटुंबातील कोणीच लोकसभा किंवा राज्यसभा सदस्य नव्हते. प्रियंका यांच्या माध्यमातून त्यांनी लोकसभेतही प्रवेश मिळविला.

त्यामुळे बेळगाव जिल्ह्यातील राजकारणातील जारकीहोळी कुटुंबाचा प्रभाव पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत जारकीहोळी बंधूंपैकी तिघे रिंगणात उतरले होते. गोकाकमधून रमेश व आरभावीमधून भालचंद्र यांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारीवर निवडणूक लढविली व ती जिंकलीही.

Belgaum Politics Jarkiholi Family
Chikkodi Lok Sabha Election Results : Not जोल्ले, Only जारकीहोळी! चिक्कोडीत प्रियांका जारकीहोळींचा दणदणीत विजय, भाजपचा मोठ्या फरकाने पराभव

यमकनमर्डी मतदारसंघातून सतीश यांनी कॉँग्रेसकडून निवडणूक लढविली व जिंकलीही. त्याआधी झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत त्यांचे आणखी एक बंधू लखन अपक्ष म्हणून रिंगणात उतरले होते. लखन यांनी त्यावेळी विधानपरिषद निवडणूक जिंकली होती. त्यामुळे एकाच कुटुंबातील तिघेजण विधानसभा सदस्य तर एकजण विधानपरिषद सदस्य झाले होते.

जारकीहोळी कुटुंबाच्या राजकीय कारकिर्दीलाही अनेक पैलू आहेत. सतीश (Satish Jarkiholi) व भालचंद्र हे दोघे आधी जनता दलात होते. त्यापैकी सतीश हे जनता दलाकडून विधानपरिषद सदस्य झाले होते तर भालचंद्र हे जनता दलाचे विधानसभा सदस्य होते. २००६ मध्ये धर्मनिरपेक्ष जनता दलात फूट पडली; त्यावेळी कर्नाटकाचे विद्यमान मुख्यमंत्री असलेल्या सिद्धरामय्या यांच्यासोबत सतीश यांनी धजदला सोडचिठ्ठी दिली व कॉँग्रेस पक्षात प्रवेश केला. तेव्हापासून सतीश हे कॉँग्रेस पक्षातच आहेत. आता ते बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे बांधकाम मंत्री आहेत.

Belgaum Politics Jarkiholi Family
Belgaum Lok Sabha Election Results : बेळगावात माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टरांचा मोठा विजय; काँग्रेसच्या मृणाल हेबाळकरांचा पराभव

भालचंद्र यांनी २००८ मध्ये ‘ऑपरेशन कमळ’च्या माध्यमातून भाजपमध्ये प्रवेश केला. तेव्हापासून आजवर भालचंद्र हे भाजपमध्येच आहेत. आरभावी मतदारसंघात ते निवडून येत आहेत. भाजप सरकारच्या काळात ते मंत्रीही होते. २०१९ पर्यंत रमेश कॉँग्रेस पक्षातच होते. परंतु, डी. के. शिवकुमार यांच्यासोबत मतभेद झाल्यामुळे २०१९ मध्ये त्यानी कॉँग्रेस पक्ष सोडला. २०१९ च्या ‘ऑपरेशन कमळ’चे नेतृत्वही रमेश यांनीच केले होते. त्यानंतर आजवर रमेश हे भाजपसोबतच आहेत. २०२३ ची विधानसभा निवडणूक त्यांनी भाजपकडून लढविली व जिंकली. त्यामुळे दोन भाजप विधानसभा सदस्य, एक कॉँग्रसचे विधानसभा सदस्य, एक अपक्ष विधानपरिषद सदस्य व एक कॉँग्रेस खासदार अशी राजकीय विभागणी जारकीहोळी कुटुंबात झाली आहे.

Belgaum Politics Jarkiholi Family
Sivaganga Lok Sabha Result : काँग्रेसचे दिग्गज नेते पी. चिदंबरम यांच्या मुलाने AIADMK उमेदवाराचा तब्बल 205664 मतांनी केला पराभव

मुले रिंगणात

जारकीहोळी कुटुंबातील पाच भावंडांपैकी चौघे आता आमदार आहे. त्यांच्या दुसऱ्या पिढीतील प्रियंका खासदार बनल्या आहेत. जारकीहोळी बंधूंची मुले आतापर्यंत निवडणूक रिंगणात उतरली नव्हती. यावेळी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पहिल्यांदाच प्रियंका निवडणूक रिंगणात उतरल्या व त्यांनी निवडणूक जिंकलीही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.