Sangli Lok Sabha : 'सांगली लोकसभेचा विषय निकाली, आता पुन्हा चर्चा करायला नको'; जयंत पाटलांचं स्पष्ट मत

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याआधीही सांगली लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीला स्वतः जबाबदार नसल्याचे स्पष्ट केले होते.
Sangli Lok Sabha Jayant Patil
Sangli Lok Sabha Jayant Patilesakal
Updated on
Summary

'महाविकास आघाडीच्या मुंबई येथे झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ‘सांगली’बाबत अंतिम निर्णय झालेला आहे.'

सांगली : सांगली लोकसभा (Sangli Lok Sabha) निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारीबाबत संयुक्त पत्रकार परिषदेत विषय निकाली काढण्यात आला आहे. ‘सांगली’बाबत पुन्हा चर्चा करायला नको, असे स्पष्ट मत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष (शरदचंद्र पवार गट) जयंत पाटील (Jayant Patil) यांनी व्यक्त केले.

Sangli Lok Sabha Jayant Patil
Satara Lok Sabha : 'दुसऱ्यांचे पक्ष फोडून बालेकिल्ला होत नसतो'; शशिकांत शिंदेंचे शिवेंद्रराजेंना जोरदार प्रतिउत्तर

जयंत पाटील सकाळी प्रसार माध्यमांशी बोलत होते. सांगली लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे (Congress) उमेदवार विशाल पाटील (Vishal Patil) यांच्याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नांवर जयंत पाटील म्हणाले की, महाविकास आघाडीच्या मुंबई येथे झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ‘सांगली’बाबत अंतिम निर्णय झालेला आहे. त्याच वेळी तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी एकमताने राज्याची उमेदवार यादी जाहीर केली आहे. त्यामुळे या विषयावरील चर्चा आता थांबवायला पाहिजे.

दरम्यान, महायुतीसमोर (Mahayuti) तीन पक्षांच्या बिघाडीचे आव्हान नसेल, तसेच नकली शिवसेना व राष्ट्रवादीचा निवडणुकीत निभाव लागणार नसल्याचे भाजप नेते अमित शहा यांनी राज्यात प्रचारावेळी स्पष्ट केले आहे. यावर प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले, असली आणि नकली कोण हे निवडणूक आयोग आणि न्यायालयाच्या निर्णयावर ठरविले जाणे गैरच आहे. असली आणि नकली ठरविण्याचा अधिकार सर्वस्वी मतदारांचा आहे.

Sangli Lok Sabha Jayant Patil
Sangli Lok Sabha : विशाल पाटलांना उमेदवारी डावलली; मिरज काँग्रेस कमिटी बरखास्त, 'काँग्रेस' फलकाला फासला रंग

येत्या निवडणुकीत ते स्पष्ट होईल. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याआधीही सांगली लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीला स्वतः जबाबदार नसल्याचे स्पष्ट केले होते. ज्या वेळी वाद सुरू होता, त्या वेळीही महाविकास आघाडीच्या दोन्ही घटक पक्षांनी योग्य मार्ग काढला, असेच मत व्यक्त केले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()