Loksabha Election : महाराष्ट्रातील या चार लोकसभा मतदारसंघातील राजकीय सध्यस्थितीची जाणून घ्या माहिती

लोकसभेच्या रणधुमाळीला शनिवारपासून सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघातील आजपर्यंतच्या राजकीय सध्यस्थितीची माहिती आजपासून सुरू होणाऱ्या ‘तथ्यचित्र’ या सदरामधून देत आहोत.
Maharashtra Loksabha Election Dates
Maharashtra Loksabha Election Datesesakal
Updated on

लोकसभेच्या रणधुमाळीला शनिवारपासून सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघातील आजपर्यंतच्या राजकीय सध्यस्थितीची माहिती आजपासून सुरू होणाऱ्या ‘तथ्यचित्र’ या सदरामधून देत आहोत.

नंदुरबार - जुन्या पटावर ‘जुनीच’ प्यादी

भारतीय जनता पक्षाने नंदुरबार लोकसभेसाठी डॉ. हीना गावित यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. मागील निवडणुकीतील उमेदवार माजी मंत्री काँग्रेसचे ॲड. के.सी. पाडवी हे पुन्हा निवडणूक रिंगणात उतरण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र काँग्रेसमधून माजी मंत्री सुरूपसिंग नाईक यांच्या स्नुषा रजनी नाईक यांच्या नावाचीही चर्चा आहे. काँग्रेसचे माजी मंत्री ॲड. पद्माकर वळवी काँग्रेस सोडून भाजपत डेरेदाखल झाले. हा काँग्रेसला धक्का आहे.

  • सीमा वळवी यांच्यासाठी पद्माकर वळवींची फिल्डिंग

  • हीना गावितांना उमेदवारी देऊन भाजपची सुरक्षित खेळी

  • भाजपमधील एका गटाचा गावित यांना विरोध

  • राहुल यांच्या यात्रेचा के. सी. पाडवी यांना फायदा शक्य

हे मुद्दे प्रभावी ठरणार

  • धनगरांना आदिवासीतून आरक्षण

  • जिल्ह्यातील रोजगार, स्थलांतर

  • औद्योगिक वसाहतीचा प्रश्न

  • मर्जीतील ठेकेदारांना दिली जाणारी कामे

पालघर - तिरंगी लढत शक्य

पालघरमध्ये शिवसेनेचा शिंदे गट, ठाकरे गट आणि बहुजन विकास आघाडी अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पालघर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार शिवसेनेचे (शिंदे गट) राजेंद्र गावित हे आहेत. बहुजन विकास आघाडीचे माजी खासदार बळिराम जाधव यांचा पराभव करून ते विजयी झाले होते. भाजपमधील काही कार्यकर्ते अन् पदाधिकारी नाराज असून अजित पवार गटही फारसा सक्रिय झालेला नाही.

  • ठाकरे गटाला मानणारा मोठा मतदार वर्ग

  • बहुजन विकास आघाडी उमेदवार देण्याची शक्यता

  • बळिराम पाटील, राजेश पाटील यांच्या नावांची चर्चा

  • ‘बविआ’चा उमेदवार आल्यास तिरंगी लढत शक्य

  • शिंदे गटालापुढे पक्षांतर्गत मतभेदांचे आव्हान

हे मुद्दे प्रभावी ठरणार

  • महापालिकेतील समाविष्ट गावांचा मुद्दा

  • वसई, बोईसर, आणि नालासोपाऱ्यात बहुजन विकास आघाडीचे वर्चस्व

  • प्रमुख पक्षांत झालेली फाटाफूट

हिंगोली - दुरंगी लढतीची शक्यता

कधीकाळी काँग्रेस पक्षाचा गड मानला गेलेला हा मतदारसंघ अलीकडे शिवसेनेचा बालेकिल्ला बनला आहे. या मतदारसंघात शिवसेनेच्या शिंदे गटाचे हेमंत पाटील हे खासदार आहेत. शिवसेना एकसंघ असताना शिवसेना भाजपच्या युतीवर निवडून आलेले हेमंत पाटील सध्या शिंदे गटामध्ये आहेत. हिंगोलीत कृषिपूरक उद्योग उभारले जाऊ शकतात. परंतु त्याकडे सर्वांचे दुर्लक्ष. येथे भाजप विरुद्ध काँग्रेस किंवा शिवसेना (शिंदे गट) विरुद्ध शिवसेना (ठाकरे गट) अशी लढत होऊ शकते.

  • ठाकरे गटाकडून जोरदार मोर्चेबांधणी

  • वंचित, बहुजन समाज पक्षाची भूमिका महत्त्वाची ठरणार

हे मुद्दे प्रभावी ठरणार

  • सिंचन व्यवस्थेचा अभाव

  • जनशताब्दी एक्स्प्रेस, मेडिकल कॉलेजवरून राजकारण

  • आरक्षणाचा मुद्दा

  • उद्योग, रोजगाराचा प्रश्न कळीचा मुद्दा ठरणार

  • शेतमाल दराच्या मुद्यावरून सरकारची कोंडी शक्य

  • आरोग्य सुविधांची वानवा

सांगली - ...तरच तुल्यबळ लढत

सांगली लोकसभेचा गड हा भाजपचा बालेकिल्ला बनला आहे, येथे पक्षाच्या उमेदवाराने २०१४ला अडीच लाख मतांनी, तर २०१९ ला दीड लाख मतांनी विजय मिळविला होता. याखेपेसही भाजपने तिसऱ्यांदा संजयकाका पाटील यांनाच उमेदवारी दिली आहे. विरोधकांचा उमेदवार कोण? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. शिवसेनेचा ठाकरे गट कोल्हापूरची जागा देण्याच्या बदल्यात सांगली मागत असल्याने हा तिढा बिकट झाला आहे.

  • विशाल पाटील यांच्या भूमिकेकडे लक्ष

  • ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील मैदानात

  • जयंत पाटलांची भूमिका महत्त्वाची ठरणार

  • ‘स्वाभिमानी’ रिंगणात उतरण्याची चिन्हे

  • भाजप, काँग्रेस भिडल्यास तुल्यबळ लढत

हे मुद्दे प्रभावी ठरणार

  • शुद्ध पाणीपुरवठ्याचा अभाव

  • संजय पाटील यांच्याबद्दलची पक्षांतर्गत नाराजी

  • दुष्काळी भागातील सिंचन प्रकल्प

  • विमानतळ व ड्रायपोर्टचा प्रश्न

  • काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्यातील वर्चस्वाची लढाई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.