माने यांनी स्वातंत्र्यलढ्यात कोल्हापुरात मोठे काम केले होते. छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेला ब्रिटिश गव्हर्नर लॉर्ड विल्सनचा पुतळा त्यांच्या नेतृत्वाखाली फोडला होता.
कोल्हापूर : डाव्या विचारसरणीच्या खासदारांना निवडून देणाऱ्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात (Kolhapur Loksabha Constituency) १९६७ मध्ये स्वातंत्र्यसैनिक शंकरराव माने यांना कॉंग्रेसने (Congress) उमेदवारी दिली. त्यांनी ताकदवान असलेल्या शेकापचे उमदेवार डी. एस. नार्वेकर यांचा पराभव करून कॉंग्रेसच्या विजयाची परंपरा पुढे सुरू ठेवली.
माने यांनी स्वातंत्र्यलढ्यात कोल्हापुरात मोठे काम केले होते. छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेला ब्रिटिश गव्हर्नर लॉर्ड विल्सनचा पुतळा त्यांच्या नेतृत्वाखाली फोडला होता. ब्रिटिशांच्या खजिन्याच्या लुटीतही ते अग्रस्थानी होते. अशा धडाकेबाज कारवाया केलेल्या माने यांना कॉंग्रेसने उमेदवारी देऊन योग्य माणूस निवडला होता. ती निवड कोल्हापूरकरांनीही सार्थ ठरवली होती. अपक्ष व शेतकरी कामगार पक्षाचे प्राबल्य असलेल्या या मतदारसंघात शंकरराव माने (Shankarrao Mane) यांनी चांगली वाटचाल केली.
त्यावेळी सावंतवाडी या मतदारसंघात होती. प्राबल्य असलेल्या शेतकरी कामगार पक्षाकडून डी. एस. नार्वेकर हे उमेदवार होते, तर आर. आर. यादव हे अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात होते. लोकसभेबरोबर विधानसभा निवडणूकही झाली होती. कॉंग्रेसच्या शंकरराव माने यांना एक लाख ५८ हजार ३२७ मते मिळाली, तर डी. एस. नार्वेकर यांना एक लाख २५ हजार ६१७ मते मिळाली.
खासदार नंतर झाले असले तरी ते स्वातंत्र्यसैनिकांच्या गौरव समितीवर होते. त्यातून त्यांनी अनेक स्वातंत्र्यसैनिकांना पेन्शन, इतर लाभ मिळवून दिले. १९७७ मधील जनता सरकारच्या लाटेत १६५ मतांनी शेकापचे दाजिबा देसाई यांच्याकडून पराभूत झाले. ही निवडणूक अपवाद वगळता त्यानंतर १९९८ पर्यंत या मतदारसंघात कॉंग्रेसचे प्राबल्य राहिले.
खासदार म्हणून काम करताना त्यांनी नेहमी त्या पदाची शान जपण्याचा कटाक्ष पाळला. त्यामुळेच त्यांच्या कामकाजाचे दाखले आजही आदर्श कारभारासाठी दिले जात आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.