Kolhapur LokSabha : पहिल्याच निवडणुकीत सदाशिवराव मंडलिकांनी 61 हजारांच्या फरकानं घाटगेंवर मिळवला विजय!

कोल्हापूरच्या राजकारणात कागलमधील (Kagal) गटतट कायमच प्रभावी ठरत आले आहेत.
Kolhapur LokSabha
Kolhapur LokSabhaesakal
Updated on
Summary

सलग पाच वेळा विजयी झालेल्या गायकवाड यांच्या नावाऐवजी अचानक कागलमधीलच सदाशिवराव मंडलिक यांचे नाव कॉंग्रेसकडून पुढे आले.

कोल्हापूर : सलग पाच वेळा खासदार झाल्यानंतर १९९८ च्या निवडणुकीत (Kolhapur Lok Sabha) कॉंग्रेसने (Congress) कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील उमेदवार बदलला. त्यावेळी कागलमधील दोन उमेदवार समोरासमोर ठाकले. त्यातून सदाशिवराव मंडलिक (Sadashivarao Mandalik) यांनी बाजी मारत कॉंग्रेसची विजयाची परंपरा कायम राखली.

कोल्हापूरच्या राजकारणात कागलमधील (Kagal) गटतट कायमच प्रभावी ठरत आले आहेत. त्यातील राजकारणाचा संदर्भ शेजारील राधानगरी, गडहिंग्लज, भुदरगड अगदी चंदगड तालुक्यांपर्यंत घेतला जातो. कमी-अधिक प्रमाणात त्यावरच तेथील राजकारणाची चक्रे फिरत असतात, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

Kolhapur LokSabha
Loksabha Election : रत्नागिरी-सिंधुदुर्गात उमेदवारीचे सस्पेन्स; भाजप-शिवसेनेत चढाओढ, विलंबाचा फटका कुणाला?

१९९८ च्या निवडणुकीपर्यंत उदयसिंगराव गायकवाड यांच्याशिवाय दुसरा उमेदवार कॉंग्रेसने निवडला नव्हता. शिवसेनेने १९९१ पासून दोन वेळा उमेदवार उभे केले होते. त्यात १९९१ ला रामभाऊ फाळके (मते ७५,१७७), तर १९९६ ला अभिनेते रमेश देव (मते १,६८,४१४) यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. त्यामुळे १९९८ च्या निवडणुकीत शिवसेनेने जोर लावला. त्यावेळी शिवसेनेकडून विक्रमसिंह घाटगे यांचे नाव निश्‍चित झाले. कागल तसेच परिसरात असलेला घाटगे यांचा गट प्रबळ असल्याने कॉंग्रेसकडून कोण उमेदवार असणार, याचे औत्सुक्य वाढले होते.

सलग पाच वेळा विजयी झालेल्या गायकवाड यांच्या नावाऐवजी अचानक कागलमधीलच सदाशिवराव मंडलिक यांचे नाव कॉंग्रेसकडून पुढे आले. अगदी गावपातळीपर्यंत जिल्हास्तरापर्यंत असलेला संपर्क, तसेच त्यांचा कागल परिसरातील मोठा गट या दोन मोठ्या कारणांनी विक्रमसिंह घाटगे यांच्याशी लढत देण्यासाठी त्यांचे नाव निश्‍चित झाले. या दोघांबरोबरच जनता दलाचे श्रीपतराव शिंदे यांनीही उमेदवारी अर्ज भरला. गडहिंग्लज परिसरातील त्यांचे काम, तसेच जिल्ह्यातील जनता दलाच्या कार्यकर्त्यांच्या जोरावर ते रिंगणात उतरले.

Kolhapur LokSabha
Raigad Loksabha : सुनील तटकरेंच्या नावाची फक्त चर्चा, पण घोषणा नाहीच; महायुतीचा कोण असणार उमेदवार?

पहिल्याच निवडणुकीत मताधिक्याने विजय

१९९८ मध्ये खरी लढत झाली ती मंडलिक व घाटगे यांच्यातच. त्यात मंडलिक यांनी तीन लाख ६७ हजार ९५१ मते मिळवली, तर घाटगे यांना तीन लाख सहा हजार ३५३ मते मिळाली. शिंदे यांना ३७ हजार ९५८ मतांवर समाधान मानावे लागले. पहिल्याच निवडणुकीत मंडलिक यांनी ६१ हजारांच्या फरकाने विजय मिळवला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.