आता विधान परिषद निवडणुकीचे रणांगण; काँग्रेसला बहुमत मिळविण्याची संधी, 'इतक्या' जागांसाठी अधिसूचना जारी

राज्यात लोकसभेसाठी मतदान झाले असून, राजकीय पक्ष ब्रेक घेण्याच्या मनस्थितीत नाहीत.
Legislative Council Elections
Legislative Council Electionsesakal
Updated on
Summary

विधान परिषदेच्या सहा जागांची निवडणूक भाजप आणि धजदच्या युतीसाठी कसोटी ठरणार आहे.

बंगळूर : राज्यात लोकसभेसाठी मतदान झाले असून, राजकीय पक्ष ब्रेक घेण्याच्या मनस्थितीत नाहीत. आता विधान परिषद निवडणुकीची (Legislative Council Elections) तयारी सुरू झाली आहे. सर्व काही अपेक्षेप्रमाणे झाले तर विधान परिषदेत काँग्रेसचाच वरचष्मा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सभापतीपदही काँग्रेसकडे (Congress) जाण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, आज विधान परिषदेच्या सहा जागांसाठी अधिसूचना जारी झाली.

पुढील काही आठवड्यांमध्ये बऱ्याच विद्यमान परिषद सदस्यांचा कालावधी संपणार आहे. शिक्षक आणि पदवीधरांच्या मतदारसंघांसह (Graduate Constituency) १८ परिषद जागांसाठी निवडणुका होतील. सध्या ७५ सदस्यांच्या सभागृहात परिषदेच्या अध्यक्षांसह ७० सदस्य आहेत. त्यापैकी काहींनी त्यांच्या पदांचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे १८ पदे रिक्त राहणार आहेत. त्यापैकी ११ सदस्य विधानसभेतील आमदारांकडून निवडून आले आहेत, तर सहा शिक्षक आणि पदवीधर क्षेत्रातून निवडून आले.

Legislative Council Elections
पहिल्या तीन टप्प्यांनी मोदींना अस्वस्थ केलंय, राज्यात 'महाविकास'ला 30 ते 35 जागा मिळणार; शरद पवारांना विश्वास

विधानसभेत १३६ आमदारांसह काँग्रेसचे वर्चस्व आहे. त्यामुळे आठ आमदारांना निवडून येण्याची संधी आहे. पण भाजप-धजद युतीचे केवळ चारच सदस्य निवडून येऊ शकतात. वरीष्ठ सभागृहात काँग्रेसचे बहुमत नसल्याने विधानसभेत मंजूर झालेली अनेक विधेयके परिषदेत तशीच आहेत. आतापर्यंत आमच्याकडे ७५ सदस्यांपैकी ३० सदस्य आहेत. यावेळी आम्हाला आणखी आठ ते नऊ जागा मिळाल्या तर आम्ही बहुमत मिळवू. यातून ही विधेयके मंजूर होऊ शकतात, असे काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, काँग्रेसने शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी दोणाऱ्या सहा जागांसाठी आपल्या उमेदवारांची नावे आधीच जाहीर केली आहेत, तर भाजपने अद्याप उमेदवारांची घोषणा केलेली नाही. या निवडणुकीसाठी आज अधिसूचना जारी करण्यात आली. पक्षाने प्रत्येक मतदारसंघासाठी दोन-तीन नावांची शिफारस केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र म्हणाले की, हायकमांड लवकरच उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करण्याची अपेक्षा आहे.

Legislative Council Elections
Kolhapur Lok Sabha : 'या' 40 गावांत ज्या उमेदवाराला मताधिक्य, त्याच उमेदवाराला लागणार विजयाचा गुलाल!

विधान परिषदेच्या तीन पदवीधर आणि तीन शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची अधिसूचना गुरुवारी प्रसिद्ध झाली. उमेदवारी प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. ईशान्य पदवीधर, दक्षिण-पश्चिम पदवीधर आणि बंगळूर पदवीधर मतदारसंघांसाठी आणि दक्षिण-पूर्व शिक्षक, दक्षिण-पश्चिम शिक्षक आणि दक्षिण शिक्षक मतदारसंघांसाठी निवडणुका होणार आहेत. यापैकी धजदने गेल्या वेळी दक्षिण शिक्षक मतदारसंघ आणि दक्षिण पश्चिम शिक्षक मतदारसंघ जिंकले होते. मरितीब्बेगौडा यांनी दक्षिण शिक्षक मतदारसंघाचे तर एस. एल. भोजेगौडा यांनी दक्षिण पश्चिम शिक्षक मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. यापैकी मरतिब्बे गौडा यांनी यापूर्वीच राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

भाजप, धजद स्वतंत्र लढणार?

विधान परिषदेच्या सहा जागांची निवडणूक भाजप आणि धजदच्या युतीसाठी कसोटी ठरणार आहे. परिषद निवडणुकीतही दोन्ही पक्षांची युती कायम रहाणार की, दोन्ही पक्ष स्वतंत्र निवडणूक लढविणार हे अजून निश्चित झालेले नाही. धजद खासदार प्रज्वल रेवण्णा यांच्या अश्लील व्हिडिओ प्रकरणाने दोन्ही पक्ष एकमेकाशी कसे जुळवून घेतात आणि परिषद निवडणुकीला कसे सामोरे जातात याकडे राज्याचे लक्ष आहे.

Legislative Council Elections
Narayan Rane : तीन मंत्री, दोन आमदारांवर राणेंची मदार; सिंधुदुर्गातील वाढीव टक्का कोणाच्या पथ्थ्यावर?

विधान परिषदेतील बलाबल

  • एकूण जागा -------- ७५

  • काँग्रेस -------- ३०

  • भाजप-------- ३२

  • धजद -------- ७

  • अपक्ष-------- १

  • रिक्त-------- ५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.