वर्धा : महात्मा गांधींच्या वर्ध्यातून शरद पवारांनी काँग्रेसचा पंजा हद्दपार करुन दाखवला अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हल्लाबोल केला आहे. वर्ध्यात भाजपचे लोकसभेचे उमेदवार रामदास तडस यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपस्थिती लावल्यानंतर कार्यकर्त्यांना संबोधित करताना फडणवीस बोलत होते. (Lok Sabaha Election 2024 Sharad Pawar vanished congress from Mahatma Gandhi Vardha Devendra Fadnavis attack)
फडणवीस म्हणाले, "काल शरद पवार या ठिकाणी येऊन गेले मी त्यांचे मनापासून आभार मानतो. कारण जी गोष्ट आम्हाला जमली नाही ती गोष्ट पवारसाहेबांनी करुन दाखवली. आम्ही काँग्रसमुक्त वर्धाचा नारा दिला. त्यानंतर आम्ही जिल्हा परिषद जिंकलो, एकसोडून सर्व आमदारकीच्या जागा जिंकलो. नगरपालिका, नगरपरिषद जिंकलो पण आम्हाला पंजा मात्र गायब करता आला नाही. त्यामुळं पवार साहेबांचे मनापासून आभार की त्यांनी वर्ध्यातून पंजा गायब करुन दाखवला आमचं स्वप्न त्यांनी पूर्ण केलं" (Latest Marathi News)
काँग्रेसनं गांधींचं नाव घेऊन राजकारण केलं
ज्या महात्मा गांधींचं नाव सांगून-सांगून काँग्रेसनं इतकी वर्षे राजकारण केलं. त्या महात्मा गांधींच्या वर्ध्यातून काँग्रेसल हद्दपार करण्याचं काम शरद पवारांनी करुन दाखवलं. काय अवस्था आली आहे. काँग्रेस वर्ध्यातून हद्दपार त्यांना उमेदवारही सापडेना. एक गोष्ट गांधीजींचं वर्धा हे ना काँग्रेस ना शरद पवारांचं तर ते मोदींनं आणि भाजपचं आहे यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे, अशा शब्दांत फडणवीसांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर सडकून टीका केली. (Marathi Tajya Batmya)
फडणवीस पुढे म्हणाले, "रामदास तडस हे कुस्तिगीर परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. इतकी वर्षे कुस्तिगीर परिषदेवर शरद पवारांच्या पॅनलचा कब्जा होता. पण आमच्या पैलवानानं असा डाव टाकला की आता त्यांच्या हातून कुस्तिगीर परिषद निघाली आणि सर्व डावपेच त्यांच्या हाती आले आहेत. त्यांचा चेहरा भोळा आहे पण वेळप्रसंगी अशाप्रकारचं धोबीपछाड मारतात की समोरचा चितपट झाल्याशिवाय राहत नाही"
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.