दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा... अनंत राऊत यांची ही कविता प्रचंड गाजली. आजही मैत्रीचे उदाहरण देताना या कवितेचा वापर होतो. असाच एक मैत्रीचा किस्सा आहे राजीव गांधी आणि भारतीय चित्रपट सृष्टीचा महानायक अभिनेता अमिताभ बच्चन यांचा...मैत्रीसाठी अमिताभ यांनी लोकसभेच्या मैदानात उडी घेतली होती...
१९८४ ची लोकसभा निवडणूक... पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झालेली. त्यामुळे राजीव गांधी एकटे पडले, संपूर्ण काँग्रेसचा भार त्यांच्या खांद्यावर होता. त्यांना भारतीय लोकदलाचे दिग्गज नेता हेमवती बहुगुणा यांचा राजकीय बदला घ्यायचा होता.. कारण बहुगुणा यांनी १९७७ ला जनता पार्टीला केंद्रात सत्ता मिळवून देण्यात मदत केली होती.
हेमवती अलाहाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत होते... त्यांना हरवण्यासाठी तगडा आणि लोकप्रिय उमेदवार हवा होता. यामुळे राजीव गांधींनी थेट अमिताभ बच्चन यांना मैदानात उतरवल... मैत्रीसाठी अमिताभ देखील तयार झाले. इंदिरा गांधींच्या हत्येमुळे जनतेची सहानुभूती देखील काँग्रेससोबत होती.
या निवडणूकीत अमिताभ बच्चन यांनी हेमवती बहुगुणा यांना काट्याची टक्कर दिली. आत अमिताभ प्रचारासाठी येतोय म्हटल्यावर लोक गर्दी करत होते. महिला तर अमिताभ यांच्या अंगावर ओढण्या टाकत स्वागत करत होत्या... त्यांना अलाहाबादचे रहिवासी असल्याचा फायदा सुद्धा या निवडणूकीत झाला होता. ही निवडणूकीला मनोरंजनाते स्वरूप आलं...
मतदानाचा दिवस आला...तेव्हा निवडणूक मतपत्रिकेचा वापर केला जायचा... ज्यामध्ये महिलांनी मतदान पत्रिकेवर लिपस्टिकची छाप सोडली होती. मतमोजणी झाली तेव्हा अधिकारी महिलांची ही गोष्ट पाहून चकित झाले. महिलांनी मते तर अमिताभ यांना दिली परंतु त्याच्यावर आपल्या ओठांच्या लिपस्टिकची छाप सुद्धा सोडली.
यामुळे जवळपास ४ हजार मतदानपत्र रद्द केली गेली. असे होवून सुद्धा अमिताभ बच्चन यांना २ लाख ९७ हजार ४६१ मते मिळाली. तर हेमवती नंदन बहुगुणा यांना १ लाख ९ हजार ६६६ मते मिळाली होती आणि अभिनेता अमिताभ बच्चन मोठ्या फरकाने विजयी झाले होते.
पुढं अमिताभ राजकारणात रमले नाहीत, कार्यकाळाचे ५ वर्ष पूर्ण होण्याआधी त्यांनी राजीनामा दिला. पण आपल्या मित्राचा बदला पूर्ण करण्यासाठी अमिताभ खऱ्या आयुष्यात नायक झाले होते....
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.