Loksabha election 2024 : मोदी अन् योगींना मंगळसूत्राचं काय घेणं-देणं; पंतप्रधानांच्या विधानावर अखिलेश यादवांचं प्रत्युत्तर

ज्यांचं लग्न झालं आहे ते मंगळसूत्राचं महत्त्व ओळखतात. भाजपच्या लोकांनी युवकांना नोकऱ्या दिल्या तरी बरं होईल कारण त्यांची लग्न होतील. ज्यांचं लग्नच झालं नाही त्यांच्यापुढे मंगळसूत्राच्या गोष्टी कशाला करता? असा सवाल अखिलेश यादव यांनी उपस्थित केला.
Narendra modi Yogi Adityanath
Narendra modi Yogi AdityanathSakal
Updated on

PM Narendra Modi : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी शुक्रवारी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यावेळच्या निवडणुकीमध्ये सगळ्यात जास्त चर्चा झाली ती मंगळसूत्राची. पंतप्रधानांनी मंगळसूत्रावरुन काँग्रेस आणि इंडिया आघाडीला घेरलं आहे.

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी पंतप्रधानांसह योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, हे लोक मंगळसूत्राच्या गोष्टी करत आहेत. परंतु मोदीजींना आणि योगीजींना मंगळसूत्राचं काय देणं-घेणं?

एक दिवसापूर्वीही अखिलेश यांनी मंगळसूत्रावरुन विधान केलं होते. ते म्हणाले होते की, ज्यांचं लग्न झालं आहे ते मंगळसूत्राचं महत्त्व ओळखतात. भाजपच्या लोकांनी केवळ युवकांना नोकऱ्या दिल्या तरी बरं होईल कारण त्यांची लग्न होतील. ज्यांचं लग्नच झालं नाही त्यांच्यापुढे मंगळसूत्राच्या गोष्टी कशाला करता? असा सवाल अखिलेश यादव यांनी उपस्थित केला.

Narendra modi Yogi Adityanath
Vinod Patil: विनोद पाटील अन् मुख्यमंत्र्यांमध्ये झाली 40 मिनिटं चर्चा; बैठकीत नेमकं काय घडलं?

मंगळसूत्राचा मुद्दा नेमका कुठून आला?

बांसवाडा येथे प्रचार सभेमध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, जर काँग्रेस सरकार सत्तेत आलं तर ते लोकांच्या मालमत्ता घेऊन जास्त मुलं असणाऱ्यांना आणि घुसखोरांना देतील. जेव्हा त्यांचं सरकार होतं तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की, देशाच्या संपत्तीवर पहिला हक्क हा मुस्लिमांचा आहे. याचा अर्थ ते संपत्तीचं एकत्रिकरण करुन वाटून टाकतील. तुमच्या मेहनतीचा पैसा घुसखोरांना दिला तर तुम्हाला आवडेल का? असा सवाल पंतप्रधानांनी केला होता.

Narendra modi Yogi Adityanath
Amitabh Bachchan: 'आकाशाची सावली'; महानायक अमिताभ बच्चन यांनी लताजींवर केली मराठीत कविता

पंतप्रधान पुढे म्हणाले होते की, काँग्रेसचा जाहीरनामा सांगतोय की ते आया-बहिणींच्या सोन्याचा हिशोब करतील, त्याची माहिती एकत्रित करतील आणि तेही वाटून टाकतील. मनमोहन सिंहांच्या सरकारने म्हटलं होतं की, संपत्तीवर पहिला अधिकार मुस्लिमांचा आहे. त्यामुळे ते त्यांनाच तुमची मालमत्ता वाटून टाकतील. हा शहरी नक्षलवादाचा विचार महिलांचं मंगळसूत्रही ठेवणार नाही, असा घणाघात मोदींनी केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.