Lok Sabha Election 2024: लोकसभेसाठी राज्यातून 'या' उमेदवारानं भरला पहिला अर्ज; कुठला मतदारसंघ? जाणून घ्या

लोकसभा निवडणुकीचं बिगुल आता वाजलं आहे. पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी आजपासून अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात झाली आहे.
Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024esakal
Updated on

मुंबई : लोकसभा निवडणुकीचं बिगुल आता वाजलं आहे. पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी आजपासून अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात झाली आहे. याार्श्वभूमीवर आजच्या पहिल्याच दिवशी एका उमेदवारानं राज्यातून पहिला अर्ज भरला आहे. (Lok Sabha Election 2024 first application filed by vyanktesh swami from nagpur constituency)

Lok Sabha Election 2024
Shivaji Adhalrao: अजित पवारांकडून आढळरावांना शिरुरमधून उमेदवारी निश्चित; दिलीप मोहितेंनी घेतली नरमाईची भूमिका

कोणी व कुठून भरला अर्ज?

श्री व्यंकटेश्वर स्वामी यांनी नागपूरमधून लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून पहिला अर्ज भरला आहे. स्वामी हे भाजपचे समर्थक असून त्यांनी नागपूर लोकसभा मतदारसंघातून अर्ज दाखल केला आहे. या ठिकाणी भाजपनं नितीन गडकरी यांना उमेदवारी दिली आहे. तरी देखील व्यंकटेश स्वामी यांनी भाजपचा पूरक उमेदवार म्हणून आपला अर्ज दाखल केला आहे. (Latest Marathi News)

Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024: पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात; 21 राज्यातील सर्वाधिक जागांवर होणार मतदान

सोलापुरातूनही भरणार अर्ज?

याच व्यंकटेश्वर स्वामी यांनी आपण सोलापुरातून राखीव मतदारसंघातूनही लोकसभा उमेदवार म्हणून अर्ज भरणार असल्याचं माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं. त्यांनी म्हटलं की, "गडकरींसोबत मी पूरक उमेदवार राहणार आहे. गडकरींशी माझं काही बोलणं झालेलं नाही पण ते आमचे मोठे नेते आहेत. (Marathi Tajya Batmya)

मला देशासाठी काम करायचं आहे, त्यामळं मला त्यांच्याशी बोलत बसून काही उपयोग नाहीए. देशाला त्यांनी तयार केलेले रस्ते दिसत आहेत. त्यांच्याच रोडवरुन मी येतो-जातो आहे. मी गडकरींना मत मिळावेत यासाठी आवाहन करणार आहे"

मी सोलापुरातून राखीव जागेतून लोकसभा मतदारसंघातून लढणार आहे, असंही यावेळी व्यंकटेश्वर स्वामी यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.