Lok Sabha World Record: "यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बनला वर्ल्ड रेकॉर्ड"; मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिला आश्चर्याचा धक्का

देशातील लोकसभा निवडणुकीचं मतदान संपल्यानंतर आज निवडणूक आयोगाच्यावतीनं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेतली.
Rajeev Kumar
Rajeev Kumar
Updated on

नवी दिल्ली : देशातील लोकसभा निवडणुकीचं मतदान संपल्यानंतर आज निवडणूक आयोगाच्यावतीनं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी मतदान कसं पार पडलं, तसंच सात टप्प्यातील मतदानाच्या प्रक्रियेबाबत चर्चा केली. तसंच या निवडणुकीत एक 'जागतीक विक्रम' झाल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. (Loksabha Election 2024 made world record Chief Election Commissioner Rajeev Kumar gave a surprise)

Rajeev Kumar
Kolhapur Accident: कोल्हापुरातील रस्त्यावर घडला 'कॅरम बोर्ड'सारखा थरार! भरधाव कारनं दुचाकींना उडवलं, तिघांचा मृत्यू; व्हिडिओ व्हायरल

पत्रकार परिषदेत राजीव कुमार यांनी उभं राहून भारतातील मतदारांचं अभिनंदन केलं. तसंच त्यांनी सांगितलं की, आम्ही वयोवृद्धांकडून अर्थात ८५ वर्षांवरील मतदारांच्या घरी जाऊन त्यांचं मतदान करवून घेतलं. भारतात ६४२ मिलियन अर्थात ६४ कोटी मतदार आहेत. मतदारांची ही संख्या जगातील २७ देशांतील मतदारांहून पाच पट जास्त आहे. इतक्या मोठ्या संख्येनं देशात लोकांनी मतदानाचा हक्क बजावला. आपण या निवडणुकीत जागतीक विक्रम केला आहे.

दरम्यान, सात टप्प्यातील मतदानाच्या प्रक्रियेबाबत माहिती देताना EC राजीव कुमार म्हणाले, या संपूर्ण निवडणूक कार्यक्रमासाठी १.५ कोटी मतदान आणि सुरक्षा रक्षकांसाठी १३५ विशेष रेल्वे गाड्या, ४ लाख वाहनं आणि १६९२ फ्लाईट्सचा वापर केला गेला. यामध्ये ६८,७६३ मॉनिटरिंग टीम निवडणुकीवर लक्ष ठेऊन होत्या. भारतीय लोकसभा निवडणुकीच्या यशस्वीतेचा विस्तारानं उल्लेख करताना सीईसी राजीव कुमार यांनी सर्वांचं आभार मानले आहेत. या निवडणुकीत मोठ्या ब्रँडसह स्टार्टअपपर्यंत सर्वांनी स्वेच्छेनं योगदान दिलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.