राज्य-मिती : ‘हिंदी पट्ट्यात’ मोदींची जादू कायम; मध्य प्रदेशात काय स्थिती?

Lok Sabha 2024 : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला २९ पैकी अवघी एक जागा मिळाली होती. ही जागा म्हणजे छिंदवाडा होय. यावेळी येथेही भाजपने बूथ पातळीवर नियोजन करीत काँग्रेसचे उमेदवार नकुलनाथ यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे.
MP Lok Sabha 2024
MP Lok Sabha 2024eSakal
Updated on

भारतीय जनता पक्षाला केंद्रातील सत्ता मिळवून देण्यात ‘हिंदी हार्ट लॅंड’वरील वर्चस्व कारणीभूत ठरत आले आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला २९ पैकी अवघी एक जागा मिळाली होती. ही जागा म्हणजे छिंदवाडा होय. यावेळी येथेही भाजपने बूथ पातळीवर नियोजन करीत काँग्रेसचे उमेदवार नकुलनाथ यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे.

देशातील हिंदी भाषिक राज्यांमधील मध्य प्रदेश गेल्या २५ वर्षांपासून भाजपच्या पाठीशी उभा आहे. या निवडणुकीतही काही वेगळे चित्र नाही. मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसकडे उमद्या आणि तरुण नेत्यांची वानवा आहे. सत्तरी पार केलेले माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह आणि माजी केंद्रीय मंत्री कांतिलाल भुरिया हे ज्येष्ठ नेते भाजपच्या तरुण उमेदवारांशी सामना करीत आहेत. गेल्या निवडणुकीत बहुजन समाज पक्ष (बसप) ‘एमआयएम’ आणि समाजवादी पक्षाने (सप) उमेदवार उभे करीत निवडणुकीत रंगत आणण्याचा प्रयत्न केला होता. पण, यावर्षीच्या प्रचारात हे ‘बसप’ आणि ‘सप’फारसे सक्रिय नाहीत.

छिंदवाड्यात यंदा नकुलनाथ

नरेंद्र मोदी यांची २०१९ मध्ये लाट असतानाही छिंदवाडा मतदारसंघात काँग्रेसचे वरिष्ठ नेते कमलनाथ विजयी झाले होते. हा मतदारसंघ काँग्रेसचा गड आहे. १९५२ ते २०१९ या काळात १८ वेळा निवडणुका झाल्या. यापैकी १७ वेळा काँग्रेसने बाजी मारली. केवळ १९९७ च्या पोटनिवडणुकीत मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री सुंदरलाल पटवा यांनी कमलनाथ यांचा पराभव केला होता. स्वतः कमलनाथ नऊ वेळा विजयी झाले. या निवडणुकीत त्यांचे पुत्र नकुलनाथ यांना मैदानात उतरविण्यात आले आहे. छिंदवाडाचे आमदार आणि माजी मंत्री दीपक सक्सेना आणि महापौर विक्रम आहाके हे भाजपमध्ये सामील झाल्याने काँग्रेसला विजयासाठी घाम गाळावा लागणार आहे. दुसरीकडे छिंदवाडा लोकसभा मतदारसंघातील सातही विधानसभा मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात असल्याने भाजपलाही मेहनत घ्यावी लागणार आहे.

पहिल्या टप्प्यात येत्या १९ रोजी होणाऱ्या शाहडोल, जबलपूर, मंडला, बालाघाट आणि छिंदवाडा या जागांवर मतदान होत आहे. २०१९ मध्ये या पाच जागांपैकी काँग्रेसला छिंदवाडा येथे विजय मिळाला होता तर उर्वरित भाजपने जिंकल्या होत्या. मंडला मतदारसंघात आदिवासी मोठ्या प्रमाणात असून त्यांची भाजपप्रती असलेली नाराजी पक्षाचे ज्येष्ठ नेते फग्गनसिंह कुलस्ते अडचणीत येऊ शकतात.

दुसऱ्या टप्प्यात टीकमगड, दमोह, खजुराहो, सतना, रीवा, होशंगाबाद, बैतुल या जागांवर मतदान होणार आहे. २०१९ मध्ये या सर्व जागाही भाजपने जिंकल्या होत्या. तिसऱ्या टप्प्यात मुरैना, भिंड, ग्वाल्हेर, गुना, सागर, विदिशा, भोपाळ आणि राजगड या मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. या टप्प्यात गुना, विदिशा आणि राजगड येथे दिग्गज उमेदवार मैदानात आहेत. गुना मतदारसंघात शिंदे राजघराण्याचा प्रभाव आहे. सध्या के.पी. यादव येथील खासदार असून २००९ आणि २०१४ च्या निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या तिकिटावर ज्योतिरादित्य विजयी झाले होते. यावेळी त्यांच्यासमोर काँग्रेसचे राव यादवेंद्र यादव उभे ठाकले आहेत.

MP Lok Sabha 2024
राज्य-मिती : उत्तराखंडमध्ये भाजपची हॅट्ट्रिक, की काँग्रेसची सरशी?

शिवराजसिंहांबद्दल उत्सुकता

विदिशामध्ये माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि काँग्रेसचे प्रताप भानू शर्मा यांच्यात थेट सामना होत आहे. माजी परराष्ट्र मंत्री दिवंगत सुषमा स्वराज २००९ आणि २०१४ मध्ये याच मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या. २०१९ मध्ये भाजपचे रमाकांत भार्गव यांनी बाजी मारली होती. आता शिवराज चौहान किती मताधिक्क्याने जिंकतात, हा चर्चेचा मुद्दा ठरत आहे.

नागर की डिग्गीराजा?

राजगड लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने २००९ मध्ये विजय मिळविला होता. पण, त्यानंतर २०१४ आणि २०१९ मध्ये मोदी लाटेत भाजप यशस्वी ठरला. भाजपने रोडमल नागर यांना पुन्हा तिकीट दिले आहे. त्यांच्यासमोर काँग्रेसचे ७७ वर्षांचे दिग्विजयसिंह मैदानात आहेत. जातीय समीकरण भाजपसाठी पोषक असले तरी ऐंशीच्या जवळपास असलेला नेता पक्षासाठी झुंजत असल्याचे पाहून मतदारांमध्ये त्यांच्याप्रती सहानुभूती आहे.

काँग्रेसची आशा भुरीयांवर

चौथ्या टप्प्यात देवास, मंदसोर, उज्जैन, रतलाम, धार, इंदूर, खरगोन आणि खंडवा या मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने सर्व आठ जागा जिंकल्या होत्या. यावर्षीही भाजपचाच वरचष्मा आहे. पण रतलाम मतदारसंघात काँग्रेसने चारवेळा निवडून आलेले माजी केंद्रीय मंत्री कांतिलाल भुरिया यांना मैदानात उतरविल्याने सामना रंगतदार होणार आहे.

MP Lok Sabha 2024
राज्य-मिती : पंजाबमध्ये चौरंगी लढतींचे वातावरण

लक्षवेधी लढती

  • विदिशा : शिवराजसिंह चौहान(भाजप) विरुद्ध प्रताप भानू शर्मा

  • गुना : ज्योतिरादित्य शिंदे(भाजप) विरुद्ध राव यादवेंद्र सिंह(काँग्रेस)

  • राजगड : रोडमल नागर(भाजप) विरुद्ध दिग्विजय सिंह(काँग्रेस)

  • छिंदवाडा : विवेक बंटी साहू(भाजप) विरुद्ध नकुलनाथ (काँग्रेस)

  • मंडला : फग्गनसिंग कुलस्ते(भाजप) विरुद्ध ओमकारसिंह मरकाम (काँग्रेस)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.