Mahadev Jankar: परभणीतून महादेव जानकरांना उमेदवारी, ठाकरे गटातील 'या' दिग्गजाशी होणार सामना

Parbhani Lok Sabha Election 2024 : अजित पवार गटाने लोकसभा निवडणुकीसाठी परभणीची जागा रासपला दिली आहे. त्यामुळे महादेव जानकर परभणीतून लोकसभा लढवणार आहेत.
Parbhani Lok Sabha Election 2024
Parbhani Lok Sabha Election 2024esakal
Updated on

Parbhani Lok Sabha Election 2024:

राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर हे परभणीतून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आज अजित पवार गटाने पत्रकार परिषद घेऊन याची अधिकृत घोषणा केली आहे. यापूर्वी अजित पवार गटाने रायगडमधून सुनील तटकरे, शिरूरमधून शिवाजी आढळराव-पाटील यांची नावे जाहीर केली आहेत.

परभणीत ठाकरे गटाचे संजय जाधव खासदार आहे. त्यामुळे महादेव जानकर विरुद्ध ठाकरे गट अशी लढाई होणार आहे. परभणीची जागा रासपला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून देण्यात आली आहे. अमित शहा यांच्या उपस्थितीत ही जागा जानकर यांना देण्यात आली.

राष्ट्रीय समाज पक्षाने गेल्या दोन महिन्यांपासून कामाला सुरुवात करत प्रचारात आघाडी घेतली आहे. आधी महादेव जानकर माढ्यातून शरद पवार गटातून लढणार अशी चर्चा होती. त्यांनी शरद पवार यांची भेट देखील घेतली होती. मात्र ऐनवेळी पलटी मारत जानकर महायुतीत गेले.

Parbhani Lok Sabha Election 2024
baramati lok sabha 2024 : बंड झालं थंड! विजय शिवतारे यांची बारामती लोकसभा मतदारसंघातून माघार

परभणी लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. परभणीतील जनतेने नेहमी शिवसेनेचा उमेदवार निवडून दिला आहे. मात्र यावर्षी राजकीय गणितं बदलली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीत पडलेली फूट, महाग पडू शकते. १९९९ पासून ही जागा शिवसेनेच्या ताब्यात आहे.

२०१९ मध्ये शिवसेनेचे जाधव संजय विजयी झाले होते. त्यांना ५३८९४१ मते मिळाली होती. तर काँग्रेसचे राजेश उत्तमराव विटेकर दुसऱ्या क्रमांकावर होते. विटेकर यांना ४९६७४२ मते मिळाली होती..

Parbhani Lok Sabha Election 2024
Archana Patil Chakurkar: चाकूरकरांची भाजप एन्ट्री लातूरमधलं काँग्रेसचं वारं कसं थोपवणार?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.