Lok Sabha Election Predictions: ...तर मोदी पुन्हा PM नाहीत, 4 राज्यांवर बहुमत अवलंबून! आकडेवारीत समजून घ्या गणित

Lok Sabha Election Predictions: २०२४ च्या लोकसभा निवडणुका समजून घेण्यासाठी आधी एकूण ५४३ लोकसभा जागांचे तीन भागात (१००, २०० आणि २४३) विभाजन करा. यापैकी १०० जागा अशा आहेत जिथे भाजप लढतही नाही. तर २०० जागा अशा वर्गवारीत विभागल्या गेल्या आहेत.
Lok Sabha Election Predictions
Lok Sabha Election Predictionsesakal

Lok Sabha Election Predictions

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान  १ तारखेला मतदान होणार आहे. लोकसभा निवडणूकीत सर्व राजकीय पक्षांनी आपली ताकद पणाला लावली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांनी देशभरात प्रचार सभा घेतल्या. मात्र नरेंद्र मोदी सरकार पडणार म्हणून विरोधक खात्री देत आहेत. त्यामुळे मोदी इतिहास घडवतील की विरोधकांचा दावा खरा, ठरणार हे पाहणे महत्वाचे आहे. आतापर्यंत भारताच्या इतिहासात पंडित जवाहरलाल नेहरू हे एकमेव नेते ज्यांनी तीनवेळा पंतप्रधान पद भूषवले. आता मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर ते नेहरूंच्या विक्रमाची बरोबरी करतील.

यावेळी भाजपने मित्रपक्षाच्या मदतीने ४०० पारचा नारा दिला होता. तर स्वबळावर ३७० जागा जिंकणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला होता. त्यामुळे लोकसभेतील बहुमतासाठी आवश्यक असलेल्या २७२ जागांपेक्षा भाजप ९८ जास्त जागा जिंकेल असा दावा करण्यात येत आहे.

२०२४ च्या लोकसभा निवडणुका समजून घेण्यासाठी आधी एकूण ५४३ लोकसभा जागांचे तीन भागात (१००, २०० आणि २४३) विभाजन करा. यापैकी १०० जागा अशा आहेत जिथे भाजप लढतही नाही. तर २०० जागा अशा वर्गवारीत विभागल्या गेल्या आहेत. जिथे भाजपचा स्कोअर ९० टक्के आहे. म्हणजेच भाजपने या राज्यांतील १० जागांवर उमेदवार उभे केले तर त्यापैकी ९ जागा जिंकतात. तर २४३ जागांची श्रेणी आहे जिथे भाजप टक्कर प्रादेशिक पक्षाशी असते. त्यामुळे जर भाजपला ४०० पार जागा मिळवायच्या असतील तर  २४३ जागांच्या विभागात स्ट्राइक रेट सुधारण्याची गरज आहे, असे सी-व्होटरचे संस्थापक यशवंत देशमुख यांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हायचे असेल तर दक्षिणेकडील राज्यांमध्ये भाजपची स्थिती समजून घेणे महत्वाचे आहे. तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ आणि तेलंगणा या दक्षिणेकडील चार राज्यांमध्ये आपला ठसा उमटवण्यासाठी भाजप अजूनही धडपडत आहे. गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत या पक्षाला १०१ पैकी फक्त चार जागा जिंकता आल्या. मात्र, यावेळी भाजपच्या जागा वाढण्याची शक्यता आहे.

तामिळनाडूमध्ये भाजपला २०१४ ला १ जागा तर २०१९ मध्ये ० जागा मिळाल्या होत्या. आंध्र प्रदेशमध्ये २०१४ ला २ तर २०१९ ला ०, केरळमध्ये ० तर तलेंगनामध्ये भाजपला २०१४ ला १ तर २०१९ ला ४ जागा मिळाल्या होत्या. गेल्या लोकसभा निवडणुकीत ज्या राज्यात भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना झाला तिथे भाजपने मोठ्या फरकाने विजय मिळवला. २०१९ मध्ये १९० मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस, अशी थेट लढत होती. मात्र, यापैकी केवळ १५ जागा जिंकण्यात काँग्रेसला यश आले, उर्वरित १७५ जागा भाजपच्या वाट्याला गेल्या.

Lok Sabha Election Predictions
Loksabha Result: सी-व्होटरचा सर्वात मोठा अंदाज, 4 जूनपूर्वीच लावला निकाल; भाजपच्या जागा होणार कमी

२०२४ मध्ये प्रादेशिक पक्ष महत्वाचे -

पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार की नाही हे प्रादेशिक पक्षावर अवलंबून आहे. देशातील सहा प्रमुख राज्यांमध्ये एकूण २४४ जागा आहेत जिथे भाजपची प्रादेशिक पक्षांशी थेट स्पर्धा आहे आणि ही राज्ये २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचा निकाल मोठ्या प्रमाणावर ठरवतील. जनमत सर्वेक्षण आणि विधानसभा निवडणुका २०२२ नुसार महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, बिहार, पंजाब, ओडिशा, छत्तीसगड आणि उत्तर प्रदेश या सहा राज्यांपैकी उत्तर प्रदेशमध्ये भाजप मजबूत आहे. २०१४ प्रमाणे यावेळीही समाजवादी पक्ष (एसपी) आणि बहुजन समाज पक्ष (बसपा) वेगळे लढत आहेत. त्या वर्षी सपा आणि बसपा यांची युती नव्हती तेव्हा भाजपने ८० पैकी ७१ जागा जिंकल्या होत्या.

चार राज्य कोणते?

पंजाबमध्ये भाजपची ताकद फार काही नाही. तर महाराष्ट्र (४८ जागा), पश्चिम बंगाल (४२), बिहार (४०) आणि ओडिशा (२१). या चार राज्यांतील एकूण १५१ जागांपैकी भाजपने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ६६ जागा जिंकल्या होत्या. मात्र यावेळी महाराष्ट्रात दोन राष्ट्रवादी आणि दोन शिवसेना आहेत. राज्यात अस्वस्थतेचं राजकारण आहे . त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपला फायदा होईल की नुकसान होईल, हे कोणीही ठामपणे सांगू शकत नाही.

बिहारमध्ये, राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) सोबत त्यांची दुसरी टर्म सेवा केल्यानंतर, नितीशकुमार पुन्हा एनडीएमध्ये आले आहेत. पश्चिम बंगालबद्दलमध्ये भाजप आणि टीएमसी यांच्यात चुरशीची लढत होणार आहे, असे म्हणता येईल. ओडिशात भाजप आणि बिजू जनता दल (बीजेडी) यांच्यात युतीची चर्चा होती, परंतु आता ते एकमेकांच्या विरोधात थेट लढत आहेत. त्यामुळे भाजपला बहुमत महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, बिहार आणि ओडिशाचा निकालांवरून निश्चित होईल, असे राजकीय विश्लेषकांनी म्हटले आहे.

Lok Sabha Election Predictions
Loksabha Elections 2024 Result: शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात कोकणात कोण बाजी मारणार? | अंदाज निकालाचा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com