Lok sabha election 2024 : ''सत्तेत आल्यानंतर संपत्तीचं सर्व्हेक्षण करणार'', राहुल गांधींची मोठी घोषणा

देशामध्ये एससी, एसटी, ओबीसी आणि अल्पसंख्यकांची संख्या देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी ९० टक्के आहे. परंतु या समाजघटकांना नोकरी नाही आणि मालमत्तेचा समान हक्कदेखील नाही, असं राहुल गांधींनी म्हटलं.
rahul gandhi
rahul gandhiesakal
Updated on

Rahul Gandhi Congress : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी तेलंगणमध्ये एका सभेला संबोधित करताना संपत्तीच्या वाटपाचा मुद्दा उपस्थित केला आहे. देशामध्ये कुणाकडे किती संपत्ती आहे, याचं एक सर्व्हेक्षण करुन त्याचं वाटप करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे.

'जेवढी लोकसंख्या तेवढा हक्क' या घोषणेबद्दल राहुल गांधांनी सांगितलं. जर काँग्रेस पक्ष सत्तेमध्ये आला तर देशातली सर्वाधिक संपत्ती कुणाकडे आहे, याचं सर्व्हेक्षण करण्यासाठी एका वित्तीय संस्थेचं गठण करण्यात येईल, असं ते म्हणाले.

जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर राहुल गांधी यांनी हैदराबादमध्ये याबाबत भाष्य केलं आहे. यापूर्वी राहुल यांनी जातनिहाय जनगणा करण्याचा शब्द दिलेला आहे.

rahul gandhi
Fact Check: वाराणसीत 2019 मध्ये एकूण मतदारांपेक्षा जास्त मतदान नाहीच, सोशल मीडियावर खोटा दावा व्हायरल

राहुल गांधी पुढे म्हणाले की, काँग्रेस सत्तेमध्ये आल्यास देशामध्ये ओबीसी, एस.सी., एस.टी. आणि अल्पसंख्याक समूदायातील लोक किती आहेत, याचं सर्व्हेक्षण अगोदर केलं जाईल. त्यानंतर संपत्तीचं समान वाटप करण्यासाठी ऐतिहासिक पाऊल उचललं जाईल. त्यानुसार एक वित्तीय संस्था आणि संस्थात्मक पातळीवर सर्व्हेक्षण केले जाईल. ज्याची जेवढी लोकसंख्या त्यांना तेवढा हक्क मिळवून देण्यासाठी काँग्रेस पावलं उचलणार असल्याचं गांधींनी स्पष्ट केलं.

देशामध्ये एससी, एसटी, ओबीसी आणि अल्पसंख्यकांची संख्या देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी ९० टक्के आहे. परंतु या समाजघटकांना नोकरी नाही आणि मालमत्तेचा समान हक्कदेखील नाही, असं राहुल गांधींनी म्हटलं.

rahul gandhi
Madha Lok Sabha Election: राजकारणातील शत्रू बनले मित्र अन्‌ मित्र झाले शत्रू, राजकीय उलथापालथीमुळे तालुक्यातील पक्षीय समीकरणांमध्ये बदल

ते पुढे म्हणाले, ९० आयएएस अधिकारी देशाचं प्रशासन चालवतात. त्यामध्ये केवळ ३ ओबीसी, १ आदिवसी आणि ३ दलित आहेत. त्यामुळे देशातील नोकऱ्या आणि इतर लोककल्याणकारी योजनांना लोकसंख्येच्या घटकांसाठी वितरित केलं जाईल. त्यासाठी देशातील जनतेने काँग्रेसला साथ द्यावी, असं ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.