Sharad Pawar: अस्वस्थ आत्म्यापासून सुटका करुन घ्या म्हणणाऱ्या PM मोदींना शरद पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, हे खरं आहे पण...

पुण्यातील सभेत बोलताना मोदींनी शरद पवारांवर अस्वस्थ आणि अतृप्त आत्मा अशा शब्दांत नाव न घेता टीका केली होती.
Sharad pawar PM Modi
Sharad pawar PM Modiesakal
Updated on

ओतूर : लोकसभा निवडणुकीनिमित्त पुण्यातील सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांवर अस्वस्थ आणि अतृप्त आत्मा अशा शब्दांत नाव न घेता टीका केली होती. त्यांच्या या टीकेला खुद्द शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ओतूर इथं शिरुर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. (Lok Sabha Election 2024 Sharad Pawar reply to PM Modi who taunted him in Pune Rally)

Sharad pawar PM Modi
Modi Rally Pune: "एका अतृप्त आत्म्यानं महाराष्ट्रासह देशाला अस्थिरतेत लोटलं"; PM मोदींकडून नाव न घेता शरद पवारांवर घणाघाती टीका

गेल्या ४५ वर्षे तो महाराष्ट्रात अस्वस्थता निर्माण करतोय. सरकारला अडचणीत आणतोय. या आत्म्यापासून सुटका करुन घेण्याची गरज आहे. हे मोदींचं कालचं पुण्यातील भाषण मीही ऐकलंय, असं शरद पवारांनी म्हटलं. तसेच पुढे बोलताना ते म्हणाले, "आत्मा अस्वस्थ आहे खरं आहे, पण तो स्वतःच्या स्वार्थासाठी नाही. माझ्या शेतकऱ्याच्या हिताचं दुखणं मांडायचं आहे, त्यासाठी अस्वस्थ व्हायला पाहिजे. (Latest Marathi News)

आज सामान्य माणूस महागाईनं अस्वस्थ आहे. लोकांना प्रचंच करणं अवघड झालं आहे, त्यासाठी मी भूमिका मांडली आणि त्यासाठी अस्वस्थता दाखवली. अतिसामान्य माणसाचं दुःख मांडण आणि त्याची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, हे संस्कार माझ्या सारख्यावर यशवंतराव चव्हाणांनी केले आणि त्याच्याशी मी तडजोड करणार नाही"

Sharad pawar PM Modi
Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

पवार पुढे म्हणाले, "२०१४ साली पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं होतं की, मला सहा महिने द्या कच्च्या तेलाचे भाव खाली आणतो पण किती आणले? उलट वाढले, दुप्पट वाढले. यावेळी त्यांनी आणखी एक गोष्ट सांगितली की, आमच्या आई-बहिणींना स्वयंपाक करणं अवघड झालं आहे कारण सिलेंडरच्या किंमती वाढल्या आहेत.

सहा महिन्यात ही किंमत मी कमी करतो, त्यानंतर त्यांनी असं सांगितलं की या महागड्या सिलेंडरला आता नमस्कार करा आणि लोकांना हे खरं वाटल आणि त्यांनी मोदींना मतदान केलं. पण याचीही दुप्पट किंमत आता आमच्या भगिनींना भोगावी लागत आहे. संसाराला ज्या ज्या गोष्टी लागतात त्याचे भाव मोदींच्या काळात वाढले आहेत, अशा शब्दांत शरद पवारांनी मोदींच्या निर्णयांवर टीका केली. (Marathi Tajya Batmya)

पुण्यातील सभेत मोदी काय म्हणाले होते?

पुणे जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी मोदींची काल पुणे रेसकोर्सच्या मैदनावर सभा पार पडली. यावेळी त्यांनी शरद पवारांचं नाव न घेता घणाघाती टीका केली. त्यांनी म्हटलं की, "मी आज जे काही बोलेल ते कोणी व्यक्तीगत आपल्यावर घेऊ नये. काही भटकणाऱ्या आत्मा असतात, ज्यांची इच्छा पूर्ण होत नाहीत त्यांची आत्मा भटकत राहते.

ज्याचं स्वतःचं काम होत नाही तर ते दुसऱ्यांचं काम देखील बिघडवायला लागतात. आपला महाराष्ट्र देखील अशाच एका अतृप्त आत्मांचा शिकार झाला आहे. आजपासून ४५ वर्षांपूर्वी इथल्या एका मोठ्या नेत्यानं आपल्या महत्वाकांक्षेसाठी या खेळाला सुरुवात केली. तेव्हापासून महाराष्ट्र एक अस्थिरतेच्या काळात ओढला गेला, त्यानंतर अनेक मुख्यमंत्री आपले कार्यकाळ पूर्ण करु शकले नाहीत.

Sharad pawar PM Modi
PM Modi in Dharashiv: अमेरिकेत व्हाईट हाऊसमध्ये जेवणाच्या टेबलवर होतं 'सूपरफूड'; मोदींनी सांगितला किस्सा

हा आत्मा विरोधकांनाच अस्थिर करत नाही तर काहीही करु शकतो. हा आत्मा आपल्या पक्षातही असं करते, कुटुंबातही असंच करते. सन १९९५ मध्ये जेव्हा भाजप-शिवसेनेचं सरकार महाराष्ट्रात आलं तेव्हा देखील ही आत्मा सरकार अस्थिर करण्यासाठी काम करत होती. त्यानंतर सन २०१९ मध्ये जनादेशाचा इतका मोठा अपमान केला जे महाराष्ट्राची जनता चांगलं जाणते. पण आज केवळ महाराष्ट्राच नव्हे तर देशात अस्थिरता निर्माण करण्याचा खेळ ही आत्मा करत आहे. त्यामुळं आज भारताला अशा भटकत्या आत्मापासून वाचवून देशाला स्थिर आणि मजबूत सरकारच्या दिशेनं जाणं गरजेचं आहे, असंही मोदी यावेळी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.