Stories of Election: किस्से निवडणुकीचे! सुप्रिया सुळेंचा प्रचार सुरु झाला पण विरोधकांवर टीकाच करता येईना

लोकसभा निवडणुकीदरम्यान अनेक गंमतीजमती घडत असतात. त्यातील काही प्रसंग कायमचेच स्मरणात राहतात.
Stories of Election
Stories of Election
Updated on

पुणे : लोकसभा निवडणुकीदरम्यान अनेक गमतीजमती घडत असतात. त्यातील काही प्रसंग कायमचेच स्मरणात राहतात. बारामती लोकसभा मतदारसंघातून २००९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार म्हणून सुप्रिया सुळे निवडणूक रिंगणात होत्या. कण्हेरी येथे त्यांच्या प्रचाराचा प्रारंभ गेल्या अनेक निवडणुकांपेक्षा वेगळा ठरला.

सुप्रिया सुळेंच्या प्रचाराला सुरुवात झाली पण त्यांना विरोधकांवर टीकाच करता येत नव्हती. काय आहे किस्सा जाणून घेऊयात. (Lok sabha election 2024 Stories of Election Supriya Sule started campaigning but could not criticize opponents)

Stories of Election
Sangali Lok Sabha: सांगलीसाठी शिवसेनेनं जोर का लावला? काँग्रेसची पिछेहाट का झाली? जाणून घ्या

या किश्यामागचं कारणही मोठं गमतीशीर होतं. सुळे यांची उमेदवारी जाहीर होऊनही युतीनं त्यावर्षी अजूनही उमेदवार जाहीर केला नव्हता. युतीच्या जागा वाटपात बारामती लोकसभेची जागा भाजपकडे होती. सुळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून प्रचाराचा प्रारंभ केला तरीही भाजपचा उमेदवार जाहीर झाला नव्हता. (Latest Marathi News)

त्यामुळे कण्हेरी येथे प्रचाराच्या प्रारंभादरम्यान अनेक वक्‍त्यांना धारदार भाषणे करण्याची इच्छा होती; पण टीका करणार तरी कोणावर? कारण उमेदवारच समोर नसल्याने भाषण तरी काय करायचे? हा प्रश्‍नच अनेक वक्‍त्यांपुढे उभा होता.

Stories of Election
Vishwajeet Kadam, Vishal Patil : सांगलीच्या जागेवर शिवसेनेचं शिक्कामोर्तब; विश्वजीत कदम, विशाल पाटील नॉटरिचेबल?

ज्येष्ठ पत्रकार भाई रणसिंग यांनी भाषणात, ‘‘कुस्ती लढण्याची इच्छा खूप आहे; पण पुढे पैलवानच नाही तर आम्ही तरी काय करायचे?, असा सवाल उपस्थित केला. बारामतीत विरोधकांना उमेदवारच सापडत नसल्याने ‘राष्ट्रवादी’च्या नेते-कार्यकर्त्यांची भाषणे ठोकताना चांगलीच पंचाईत झाली होती. (Marathi Tajya Batmya)

शेवटी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानींपासून ते वरुण गांधींपर्यंत अनेकांवर टीका करणे त्यांनी पसंत केले. दुसरीकडे शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारच दिला जात नसल्यानं भाजपच्या मनात नेमके आहे तरी काय? याचीच चर्चा बारामती परिसरात होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.