Loksabha Election 2024: उमेदवारांसाठी होत्या रंगीत मतपेट्या! वाचा भारतातील निवडणुकांचे रंजक किस्से

Loksabha Election 2024 Marathi News : भारतात मोठ्या प्रमाणावर असलेली निरक्षरता हे एक मोठे आव्हान निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणाऱ्या यंत्रणांसमोर होते.
Loksabha Election 2024 Marathi News
Loksabha Election 2024 Marathi News
Updated on

Loksabha Election 2024 : भारत स्वतंत्र झाल्यानंतर १९५१-५२ मध्ये पहिल्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. पण ही निवडणूक प्रक्रिया राबवताना अनेक सुविधांची आणि नागरिकांसाठी ही प्रक्रिया नवी असल्यानं त्यांच्या सोयीनं अनेक नवनव्या कल्पना राबवण्यात आल्या होत्या. त्यानुसार, उमेदवारांसाठी रंगीत मतपेट्या ठेवण्यात आल्या होत्या, याचा इतिहास आपण जाणून घेऊयात. (lok sabha election 2024 there were colored ballot boxes for candidates read interesting anecdotes about elections in India)

Loksabha Election 2024 Marathi News
Sharad Pawar: ...तर आणखी इनकमिंग होणार; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

रंगनिहाय मतपेट्या

भारतात मोठ्या प्रमाणावर असलेली निरक्षरता हे एक मोठं आव्हान निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणाऱ्या यंत्रणांसमोर होतं. आज जरी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचा वापर करून प्रक्रिया सुसह्यपणे राबविण्यात येत असली तरी सुरुवातीच्या काळात ती किती जिकिरीची होती, हे लक्षात येऊ शकेल. (Latest Maharashtra News)

कारण पहिल्या म्हणजे १९५१-५२ च्या निवडणुकीत प्रत्येक उमेदवाराला स्वतंत्र मतपेट्या ठेवण्यात आल्या होत्या. त्या मतपेट्यांना उमेदवारनिहाय रंग देण्यात आला होता. तसेच मतपेट्यांवर उमेदवारांच्या पक्षाचं निवडणूक चिन्ह दर्शविण्यात आलं होतं. जेणेकरून अशिक्षित मतदारांना सहजपणे आपलं मतदान करता यावं. (Marathi Tajya Batmya)

Loksabha Election 2024 Marathi News
Bhosari Land Scam: भोसरी भूखंड घोटाळा प्रकरणी खडसे कुटुंबियांना मोठा दिलासा! कोर्टानं दिला महत्वाचा निर्णय

अशिक्षितपणामुळं मर्यादा

अशिक्षित मतदार जास्त असल्यानं व मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणूनच चिन्ह हा प्रकार अस्तित्वात आला. मतदान केंद्रांची संख्या कमी असल्यानं ते दूरवर असायचे. तसेच सर्वसामान्य मतदार व निवडणूक राबविणाऱ्या यंत्रणांकडेही साधनांचा अभाव असल्यानं कसरत करत विविध मार्ग अवलंबले गेले. सायकल, पायी व मिळेल त्या उपलब्ध साधनांचा वापर करत मतपेट्या दुर्गम भागात पोहोचवल्या गेल्या. उमेदवारांनी भिंतीवर, जनावरांच्या पाठीवर चिन्ह कोरत आपला प्रचार केला. (Latest Marathi News)

Loksabha Election 2024 Marathi News
Arvind Kejriwal Arrest: राहुल गांधी केजरीवालांना कायदेशीर मदत करणार; कुटुंबियांशी साधला संवाद

पहिला मतदार

वाहनांची कमतरता असल्याने पायी व प्रत्यक्ष घरोघरी भेटीवर भर देण्यात आला. या मतपेट्या गोदरेज कंपनीच्या व दणकट स्टील वापरून तयार करण्यात आल्या होत्या. याच पहिल्या निवडणुकीत हिमाचल प्रदेशातील श्‍यामसरण नेगी या मतदाराची स्वतंत्र भारतातील मतदान करणारा पहिला मतदार अशी नोंद झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.