Yusuf Pathan News: भारतभरात सध्या लोकसभा निवडणूकीची धामधूम आहे. लोकसभा निवडणूक 2024 मधील मतदानाचा सातवा आणि अखेरचा टप्पा शनिवारी (1 जून) पार पडणार आहे.
सातव्या टप्प्यात एकूण 8 राज्य आणि संघराज्यात मतदान पार पडणार आहे. याआधीच भारताचा माजी क्रिकेटपटू युसूफ पठाणनने या निवडणूकी संदर्भात मोठी भविष्यवाणी केली आहे.
युसूफ पठाण लोकसभा निवडणूकीत पश्चिम बंगालमधील बेरहामपूर मतदारसंघातून तृणमुल काँग्रेसचा उमेदवार आहे. त्याने आता असा दावा केला आहे की यंदा पश्चिम बंगालमधील 42 जागांवर तृणमुल काँग्रेसचे प्रदर्शन चांगले राहिल.
सातव्या टप्प्यात पश्चिम बंगालमधील देखील 9 जागांसाठी मतदान होणार आहे. सध्या पश्चिम बंगालमध्ये तृणमुल काँग्रेसचे सरकार आहे.
एएनआयशी बोलताना युसूफ पठाण म्हणाला, 'इथे आमच्या आशा उंचावलेल्या आहेत आणि आम्हाला विश्वास आहे की पश्चिम बंगालमध्ये तृणमुल काँग्रेसची प्रदर्शन चांगले राहिल. अंतिम टप्प्यातील मतदानातही पक्षाची कामगिरी चांगली राहिल. 4 जूनला लागणाऱ्या निकालाच्या दिवशी बंगालमधील 42 जागांवर तृणमुल काँग्रेस चांगल्या फरकाने विजय मिळवेल.'
दरम्यान, युसूफ पठाण उमेदवार असलेल्या मतदार संघात त्याला तिथे सध्या असलेल्या खासदार अधीररंजन चौधरीचे मोठे आव्हान असणार आहे. बेहरामपूर हा काँग्रेसचे नेते अधीररंजन चौधरी यांचा बालेकिल्ला मानला जातो. 1999 पासून सातत्याने तेच येथून निवडून आलेले आहेत. त्यामुळे या मतदार संघावर सध्या सर्वांचे लक्ष राहणार आहे.
दरम्यान, तृणमुल काँग्रेस इंडिया आघाडीचा (I.N.D.I.A) भाग असले, तरी तृणमुल काँग्रेस आणि काँग्रेस या दोन्ही पक्ष पश्चिम बंगालमध्ये वेगवेगळी निवडणूक लढत आहेत. तृणमुल काँग्रेसने सर्व 42 जागांवर त्यांचे उमेदवार उभे केले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.