Lok Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे पहिल्यांदाच काँग्रेसला देणार मत; मतदानापूर्वी केली मोठी घोषणा

वर्षा गायकवाड ह्या मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत. मुंबईतल्या साऊथ सेंट्रलच्या जागेसाठी उद्धव ठाकरे आणि काँग्रेस समोरासमोर आले होते. सुरुवातीला वर्षा गायकवाड ह्या साऊथ सेंट्रल जागेवरुन निडणूक लढवणार होत्या. परंतु ठाकरेंनी ही जागा काँग्रेसला सोडण्यास नकार दिला.
uddhav thackeray
uddhav thackeraySakal
Updated on

Uddhav Thackeray Shivsena : बदललेल्या राजकीय परिस्थितीवरुन ठाकरेंना आता काँग्रेसला मतदान करावं लागणार आहे. उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत असलेल्या उद्धव ठाकरेंना यांना वर्षा गायकवाडांना मतदान करावं लागणार आहे.

शनिवारी उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी वर्षा गायकवाड ह्या मातोश्री निवासस्थानी दाखल झाल्या होत्या. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, मी मुंबई नॉर्थ सेंट्रल लोकसभा मतदारसंघाचा मतदार आहे आणि वर्षा गायकवाड यांना मतदान करणार आहे. इंडिया अलायन्स ही लोकसभा निवडणूक जिंकणार आहे.

uddhav thackeray
Earthquake Japan: जपानच्या बोनिन बेटावर भूकंपाचे झटके; त्सुनामीचा धोका असणार का?

वर्षा गायकवाड ह्या माझ्या छोट्या बहीण आहेत. आम्ही त्यांना आमचा खासदार म्हणून दिल्लीला पाठवणार आहोत. हुकूमशाहीचं सरकार हटवण्यासाठी आम्ही एकजुटीने लढणार आहोत, असं ठाकरे म्हणाले.

दरम्यान, वर्षा गायकवाड ह्या मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत. मुंबईतल्या साऊथ सेंट्रलच्या जागेसाठी उद्धव ठाकरे आणि काँग्रेस समोरासमोर आले होते. सुरुवातीला वर्षा गायकवाड ह्या साऊथ सेंट्रल जागेवरुन निडणूक लढवणार होत्या. परंतु ठाकरेंनी ही जागा काँग्रेसला सोडण्यास नकार दिला.

uddhav thackeray
Shruti Haasan: चार वर्षांच्या रिलेशनशिपनंतर श्रुती आणि शंतनू हजारिकानं केला ब्रेकअप? 'या' कारणामुळे होतीये चर्चा

मुंबई नॉर्थ सेंट्रल मतदारसंघातून मागच्या दोन टर्मपासून भाजपच्या पूनम महाजन खासदार आहेत. सध्या भाजपने या जागेसाठी कुणाचंही नाव जाहीर केलेलं नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भाजपला समर्थन देऊन सरकार स्थापन केल्यानंतर ही पहिलीच लोकसभेची निवडणूक आहे. त्यामुळे या मतदारसंघात काय होईल, हे पाहाणं महत्त्वाचं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()