Lok Sabha 2024
Lok Sabha 2024sakal

Lok Sabha Election 2024 : "पंतप्रधान गंगापुत्र तर मी शिखंडी"; वाराणसीतून तृतीयपंथीयांसाठी मोदींविरोधात लढणारी हिमांगी सखी कोण?

उत्तरप्रदेशातील वाराणसी लोकसभा मतदारसंघात तृतीयपंथी महामंडलेश्वर हिमांगी सखी अखिल भारत हिंदू महासभेकडून निवडणूक लढवणार आहे. १ जूनला वाराणसी लोकसभा मतदार संघाची निवडणूक पार पडणार आहे. त्यापूर्वी महामंडलेश्वर हिमांगी सखी यांनी 'पंतप्रधान नरेंद्र मोदी गंगापुत्र तर मी शिखंडी' असं म्हणत वाराणसी येथून प्रचारासाठी मैदानात उतरली आहे.
Published on

Lok Sabha Election 2024 : उत्तरप्रदेशातील वाराणसी लोकसभा मतदारसंघात तृतीयपंथी महामंडलेश्वर हिमांगी सखी अखिल भारत हिंदू महासभेकडून निवडणूक लढवणार आहे. १ जूनला वाराणसी लोकसभा मतदार संघाची निवडणूक पार पडणार आहे. त्यापूर्वी महामंडलेश्वर हिमांगी सखी यांनी 'पंतप्रधान नरेंद्र मोदी गंगापुत्र तर मी शिखंडी' असं म्हणत वाराणसी येथून प्रचारासाठी मैदानात उतरली आहे.

महामंडलेश्वर हिमांगी सखी म्हणाली, "मी गंगापुत्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समोर शिखंडीसारखी उभी आहे. तृतीयपंथींच्या हक्कासाठी मी निवडणूक लढवण्यासाठी मैदानात उतरली आहे. तृतीयपंथींना त्यांचा हक्क मिळावा, शिक्षण मिळावे आणि विधानसभेपासून लोकसभेपर्यंत प्रत्येक जागा तृतीयपंथींसाठी राखीव ठेवली जावी, हा माझा मुख्य मुद्दा असणार आहे."

जर लोकसभेत तृतीयपंथीयांसाठी राखीव जागा असती तर...

"मला महासभेने वाराणसीतून उमेदवार बनवले आहे, त्यामुळे मी वाराणसीतून निवडणूक लढवत आहे. मी तृतीयपंथी समाजाचे प्रतिनिधीत्व करत आहे. जर लोकसभेत तृतीयपंथीयांसाठी आरक्षित जागा असती तर आज त्यांना हे सगळ करण्याची गरज पडली नसती," असे देखील हिमांगी म्हणाली.

हिमांगी पुढे म्हणाली, "अखिल भारतीय हिंदू महासभेच्या चक्रपाणी महाराजांनी मला ही संधी दिली आहे. त्यांनी जे काम केले आहे, ते काम जर देशाच्या राजांनी केलं असतं तर तृतीयपंथीयांना खूप आनंद झाला असता. आम्हाला संसदेत आमचे विचार मांडण्यासाठी आणि समाजात पुढे जाण्यासाठी निवडण्यात आले आहे."

Lok Sabha 2024
Satara Lok Sabha : 'दुसऱ्यांचे पक्ष फोडून बालेकिल्ला होत नसतो'; शशिकांत शिंदेंचे शिवेंद्रराजेंना जोरदार प्रतिउत्तर

तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात का आणले जात नाही?

हिमांगी म्हणाली,  "तृतीयपंथी जर समाजाचा भाग आहेत तर आपल्या देशाचा राजा गप्प का बसला आहे? तृतीयपंथीयांनामुख्य प्रवाहात का आणले जात नाही? मोदी सरकार सत्तेत येवून १० वर्ष झाली, तृतीयपंथीयांची काय प्रगती झाली? आज सुद्धा तुम्ही सत्तेत असताना तृतीयपंथी समाज भिक का मागत आहे? पहिला मुद्दा हा आहे की लोकसभा आणि विधानसभेत तृतीयपंथींसाठी एक-एक जागा आरक्षित असायला हवी. जर तृतीयपंथींना शिक्षण दिले गेले असते तर त्यांच्यावर आज भिक मागण्याची वेळ नसती आली."

हिमांगीने शिखंडीसोबत केली आपली तुलना-

आपली तुलना शिखंडीसोबत करत हिमांगी म्हणाली, " मी मोदींच्या रस्त्यात उभी आहे, त्यांना शिखंडीला आपले करावे लागणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत:ला गंगापुत्र म्हणतात तर मी स्वत:ला शिखंडी मानते. गंगापुत्र जर शंखनाद करु शकतात तर शिखंडी काय नाय करु शकत?"

राहुल गांधींंबद्दल विचारले असता ती म्हणाली, "मी त्यांना ओळखत नाही. राहुल गांधी कोण आहेत? मी कोणाबद्दल चूकीच कशाला बोलू? नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांना देशाचा शिखंडीसमोर शरणागती पत्करावी लागेल."

ज्ञानवापी मंदीराबाबत काय म्हणाली हिमांगी-

"ज्ञानव्यापी मंदीराचा प्रश्व लवकरात लवकर मार्गी लागावा आणि तेथे ज्ञानव्यापी शिवमंदीर बनवावे. त्या मंदीराचे रुपांतर मशिदीमध्ये करण्यात आले. त्याचे अवशेष सुद्धा सापडले आहेत. मशीद हटवून तेथे मंदीर बांधण्यात यावे."

Lok Sabha 2024
Nashik Lok Sabha Constituency: मुख्यमंत्र्यांनी बोरस्ते यांना मुंबईत बोलावल्याची चर्चा! खासदार गोडसेही तत्काळ दाखल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.