Loksabha Election 2024: देशात 543 ऐवजी 544 मतदरासंघात होणार निवडणूक; एक अतिरिक्त मतदारसंघ का? जाणून घ्या

CEC राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत लोकसभा निवडणुकीचं शेड्युल जाहीर केलं.
Loksabha Election 2024
Loksabha Election 2024esakal
Updated on

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगानं शनिवारी लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत ५४३ ऐवजी ५४४ लोकसभा मतदारसंघांचं शेड्युल जाहीर केलं. देशभरात ५४३ लोकसभेच्या जागा असताना ही एक अतिरिक्त जागा का? जाहीर केली. जाणून घ्या सविस्तर. (Lok sabha Election 2024 will be held in 544 constituencies instead of 543 Why an additional constituency in schedule)

Loksabha Election 2024
J&K Vidhan Sabha Election: जम्मू-काश्मीरची विधानसभा निवडणूक का जाहीर झाली नाही? CEC राजीव कुमारांनी दिलं स्पष्टीकरण

निवडणूक आयोगाने 16 मार्च रोजी सार्वत्रिक निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या, यामध्ये असं लक्षात आलंय की, मतदारसंघांची संख्या 543 लोकसभेच्या जागांशी जुळण्याऐवजी 544 वर पोहोचली आहे. एक अतिरिक्त जागा म्हणजे नवा लोकसभा मतदारसंघ तयार झाला आहे का? अशी चर्चा सुरु झाली आहे. पण कोणताही नवा लोकसभा मतदारसंघ तयार करण्यात आलेला नाही, हे स्पष्ट करताना मणिपूरमधील एका मतदारसंघामुळं ही परिस्थिती निर्माण झाल्याचं त्यांनी सांगितलं. (Latest Marathi News)

Loksabha Election 2024
EVM Allegations: अधुरी हसरते...! मुख्य निवडणूक आयुक्तांनी उलगडून सांगितलं EVM मशीनचं गणित

मणिपूरमध्ये का होणार दोनदा मतदान

543 लोकसभा मतदारसंघांसाठी 19 एप्रिल ते 1 जून या कालावधीत सात टप्प्यांत निवडणुका होणार आहेत. प्रत्येक मतदारसंघाला एकाच दिवशी आपला खासदार निवडता येतो, पण एकट्या मणिपूर मतदारसंघात दोन दिवस निवडणुका होणार आहेत. मणिपूरमध्ये अलिकडेच निर्माण झालेल्या हिंसाचाराच्या परिस्थितीमुळं इथं दोनदा मतदान होणार आहे.

मणिपूरमध्ये दोन लोकसभा मतदारसंघ आहेत यामध्ये एक अंतर्गत लोकसभा मतदारसंघ तर एक बाह्य मतदारसंघ आहे. यांपैकी अंतर्गत मणिपूरमध्ये 19 एप्रिलला मतदान होईल, तर बाहेरील मणिपूरमध्ये 19 एप्रिल आणि 26 एप्रिल या दोन तारखांना मतदान होईल.

Loksabha Election 2024
Assembly Elections 2024 : लोकसभेसोबतच 'या' चार राज्यात होणार विधानसभेच्या निवडणुका! निवडणूक आयोगाची घोषणा

चुराचंदपूर आणि चंदेल हे जिल्हे पहिल्या टप्प्यातील मतदानाचा भाग आहेत. याच दोन्ही जिल्ह्यांमध्ये कुकी आणि मैतेई समाजात भयानक हिंसाचार झाला होता. बाह्य मणिपूर लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या १५ विधानसभा मतदारसंघांसाठी १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यामध्ये हिरोक, वांगजिंग टेंथा, खांगाबोक, वाबगाई, कक्चिंग, हियांगलाम, सुग्नू, चंदेल (अ.जा.), सायकुल (अ.जा.), कांगपोकपी, सैतू (अ.जा.), हेंगलेप (अ.ज.), चुराचंदपूर (अ.जा.), सायकोट (अ.जा.), आणि सिंगत (ST) या जागांचा समावेश आहे. Election Briefs

तर बाह्य मणिपूर मतदारसंघातील उर्वरित 13 विधानसभा मतदारसंघात 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यामध्ये जिरीबाम, तेंगनौपाल (ST), फुंग्यार (ST), उखरुल (ST), चिंगाई (ST), करोंग (ST), माओ (ST), ताडुबी (ST), तामेई (ST), तामेंगलाँग (ST), नुंगबा (ST), Tipaimukh (ST), आणि थॅनलॉन (ST) या मतदारसंघांचा समावेश आहे.

दरम्यान, निवडणूक आयोगाने जे मतदार हिंसाचारामुळं सध्या विस्थापित आहेत त्यांना ते सध्या राहत असलेल्या छावणीतूनच त्यांना मतदान करू देण्याची मुभा दिली आहे. त्यानुसार CEC राजीव कुमार यांनी निवडणुकीचं वेळापत्रक सादर करताना माध्यमांना सांगितलं की, जम्मू-काश्मीरच्या IDPs साठी अशीच योजना आधीच उपलब्ध आहे. तीच आता मणिपूरमध्येही उपलब्ध होईल. Education about Elections

Loksabha Election 2024
Lok Sabha Election 2024 Dates : महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात कधी होणार मतदान? तारखेनुसार जाणून घ्या सविस्तर

निवडणूक आयोगानं जाहीर केलं निवेदन

निवडणूक आयोगानं आपल्या प्रेसनोटमध्ये हे स्पष्टपणे म्हटलं आहे की, “आयोगाने मणिपूरच्या ग्राउंड परिस्थितीचा आढावा घेतला आहे आणि असं नमूद केलं आहे की, अलिकडील संघर्षांदरम्यान मणिपूरच्या विविध मतदारसंघात नोंदणीकृत मोठ्या संख्येने मतदार त्यांच्या मूळ ठिकाणाहून विस्थापित झाले होते. ते आता मणिपूरच्या विविध जिल्ह्यांतील मदत शिबिरांमध्ये राहत आहेत.

आयोगाने, विविध भागधारकांशी योग्य सल्लामसलत केल्यानंतर, असा निर्णय घेतला आहे की कॅम्पच्या ठिकाणी/जवळ विशेष मतदान केंद्रे स्थापन केली जातील, जिथं अशा सुविधेचा पर्याय निवडणारे मतदार ईव्हीएममध्ये त्यांची मते नोंदवू शकतील. या संदर्भात, मणिपूरच्या अंतर्गत विस्थापित व्यक्तींना मदत शिबिरांमध्ये मतदान करण्यासाठी एक तपशीलवार योजना आयोगाने २९ फेब्रुवारी २०२४ रोजी जाहीर केली आहे”

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.