मनमोहन सिंगांच्या दहा वर्षांच्या काळात काँग्रेसने 12 लाख कोटींचा भ्रष्टाचार केला; अमित शहांचा गंभीर आरोप

आगामी सार्वत्रिक निवडणुकीत भाजप ‘४०० पार’चे लक्ष्य गाठणार आहे.
Home Minister Amit Shah
Home Minister Amit Shahesakal
Updated on
Summary

'मोदी जगातील एकमेव व्यक्ती आहेत, जे २३ वर्षे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान होते आणि त्यांनी एकही दिवस सुटी घेतली नाही. त्यांनी नेहमीच भारतासाठी काम केले.'

बंगळूर : आगामी सार्वत्रिक निवडणुकीत भाजप ‘४०० पार’चे लक्ष्य गाठणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील ‘एनडीए’शी इंडिया ब्लॉकची तुलनाच होऊ शकत नाहे. इंडिया ब्लॉक हा परिवारवादी आणि भ्रष्टाचारी आहे. मनमोहन सिंगांच्या (Manmohan Singh) दहा वर्षांच्या काळात काँग्रेसने १२ लाख कोटींचा भ्रष्टाचार केला आहे, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला.

Home Minister Amit Shah
Sangli Lok Sabha : 'सांगली' लढण्यावर काँग्रेस ठाम; शरद पवारांच्या मध्यस्थीकडं लक्ष, वादग्रस्त जागांवर अंतिम तोडगा निघणार?

बंगळूरमधील पॅलेस ग्राऊंडवर आयोजित मेळाव्यात श्री. शहा (Amit Shah) बोलत होते. कर्नाटकातील सर्व २८ लोकसभेच्या जागा भाजप जिंकेल, असा विश्वास व्यक्त करून विरोधी पक्ष मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि घोटाळ्यात गुंतल्याचा आरोप त्यांनी केला. कधीही सुटी न घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उन्हाळा सुरू होताच परदेश दौऱ्यावर जाणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांची तुलना करत, त्यांनी काँग्रेसवर (Congress) जोरदार टीका केली.

आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप आणि एनडीए- आम्ही मोदींच्या नेतृत्वाखाली निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहोत. दुसऱ्या बाजूला इंडिया आघाडी आहे, ज्यात भ्रष्ट लोकांचा समावेश आहे, जे कौटुंबिक राजकारण चालवतात, असे ते म्हणाले.

Home Minister Amit Shah
Sangli Lok Sabha : डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार यांच्या उमेदवारीनंतर नवा ट्विस्‍ट; बाबर-पाटील गटाच्या भूमिकांकडं लक्ष

पंतप्रधान मोदींनी यावेळी भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांसमोर ‘४०० पार’चे लक्ष्य ठेवले आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत कर्नाटकच्या जनतेने ४३ टक्के मतदान केले आणि १७ जागा जिंकल्या. २०१९ मध्ये ५१ टक्के मते मिळाली आणि २५ जागा मिळाल्या, परंतु यावेळी ६० टक्के मतांची हमी द्या आणि भाजप आघाडीला सर्व २८ जागांवर विजयी करा. काँग्रेसला राज्यात खातेही उघडू दिले जाणार नाही, असे ते म्हणाले.

मोदी जगातील एकमेव व्यक्ती आहेत, जे २३ वर्षे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान होते आणि त्यांनी एकही दिवस सुटी घेतली नाही. त्यांनी नेहमीच भारतासाठी काम केले. दुसरीकडे उन्हाळा आला का राहुल गांधी परदेशात जातात. काँग्रेसला दर सहा महिन्यांनी त्यांचा शोध घ्यावा लागतो. संपूर्ण देश नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी एकजुटीने उभा आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते बी. एस. येडियुरप्पा, प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र, कर्नाटक निवडणूक प्रभारी सरचिटणीस राधामोहन दास अग्रवाल, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, विधानसभेतील विरोधी पक्षनेते आर. अशोक यावेळी उपस्थित होते.

Home Minister Amit Shah
Hatkanangale Lok Sabha : ..अन् धैर्यशील मानेंनी शेट्टींचा पराभव करून आपल्या आईच्या पराभवाचा बदला घेतला!

मोदींचे झीरो करप्शन

एकीकडे नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान म्हणून २३ वर्षे काम केले; २३ वर्षांत विरोधकांना मोदींवर २५ पैशांच्या भ्रष्टाचाराचा आरोप करता आलेला नाही. ते पारदर्शकतेचे देशात रोल मॉडेल आहेत. दुसरीकडे ‘इंडिया’ ही भ्रष्टाचाराची आघाडी आहे. मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी यांच्या काँग्रेसच्या १० वर्षांच्या राजवटीत १२ लाख कोटी रुपयांचे घोटाळे आणि भ्रष्टाचार झाला, असा आरोप शहा यांनी केला. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यावरही हल्लाबोल करत कर्नाटकच्या जनतेला भ्रष्टाचार आवडत नसल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी यूपीए सरकारच्या काळात प्रसारमाध्यमांनी नोंदवलेल्या विविध घोटाळ्यांची माहिती त्यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.