Maharashtra Politics: विधानसभेपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होणार? बंडखोर ठाकरे-पवारांकडे परतणार?

Maharashtra politics: देशात मोदी फॅक्टर असताना राज्यातील भाजपला ४५ पार नाऱ्याला सुरुंग लागण्याची शक्यता आहे. एकजरी बंडखोर मुळ पक्षात आला तरी याचा परिणाम विधानसभा निवडणुकांवर होणार आहे.
sharad pawar and uddhav thackeray
sharad pawar and uddhav thackerayesakal
Updated on

महाराष्ट्रात एक्झिट पोलनंतर शिंदे गट आणि अजित पवार गटातील आमदार आणि खासदारांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.  एक्झिट पोलमध्ये महाविकास आघाडी म्हणजे शरद पवार आणि उद्धव ठाकरे गटाला कौल मिळाला आहे. निकालातून हे चित्र स्पष्ट झालं तर आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात पुन्हा राजकीय भूकंप घडण्याची शक्यता आहे.
एक्झिट पोल आलेल्या अंदानुसार शरद पवार यांची खरी राष्ट्रवादी तर उद्धव ठाकरे यांची खरी शिवसेना हे स्पष्ट झालं. आता निकाल देखील तसाच लागला तर यावर शिक्कामोर्तब होणार.

संपूर्ण देशात एनडीएची सत्ता येणार असल्याचा अंदाज एक्झिट पोलमध्ये व्यक्त करण्यात आला आहे. मात्र महाराष्ट्रात एनडीएचा विजयरथ रोखण्यात महाविकास आघाडीला यश येणार, असे चित्र दिसत आहे. पक्ष आणि चिन्ह हातातून गेल्यानंतर देखील ठाकरे-पवारांना मोठं यश मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे बंडखोरांची परिस्थिती आता तळ्यात मळ्यात होणार आहे.

एक्झिट पोलनुसार भाजपला १८, एकनाथ शिंदेंना ७ तर अजित पवार गटाला १ असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेसला ६, ठाकरे गटाला ९ तर शरद पवार गटाला ६ जागा मिळण्याची शक्यता आहे.

sharad pawar and uddhav thackeray
Exit Poll 2024: दोन शिवसेनेच्या लढतीत AIMIM महाराष्ट्रातून हद्दपार? एक्झिट पोलने औवेसींना किती जागा दिल्या? 

एकनाथ शिंदे गटाने १५ जागा लढवल्या होत्या. यामध्ये बहुतांश विद्यमान खासदारांना उमेदवारी देण्यात आली. मात्र शिंदेंच्या केवळ सात जागा निवडून येण्याची शक्यता आहे. अजित पवार गटाने ५ जागा लढवल्या होत्या. त्यात त्यांची एकच जागा निवडून येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली.  यामुळे शिंदे आणि अजित पवारांच्या सोबत गेलेल्या आमदार-खासदारांच्या मनस्थिती बदलली तर ते पुन्हा मुळ पक्षात येण्याची शक्यता आहे.

महायुतीतील छोट्या पक्षांनी याचे खापर भाजपवर फोडले आहे. भाजपाने विश्वासात न घेतल्याने हे चित्र दिसत आहेत. आमचे दोन आमदार असतांना त्यांनी विचारले सुद्धा नाही, असल्याचे आमदार बच्चू कडू म्हणाले.

देशात मोदी फॅक्टर असताना राज्यातील भाजपला ४५ पार नाऱ्याला सुरुंग लागण्याची शक्यता आहे. एकजरी बंडखोर मुळ पक्षात आला तरी याचा परिणाम विधानसभा निवडणुकांवर होणार आहे.

sharad pawar and uddhav thackeray
Lok Sabha Exit Poll 2024 : एक्झिट पोलने मालेगावात ‘कही खुशी-कही गम!’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.