Bengaluru South Election Results : बंगळुरू दक्षिणमधून भाजपच्या तेजस्वी सूर्यांनी घेतली मोठी आघाडी; काँग्रेसच्या सौम्या रेड्डी पिछाडीवर

कर्नाटकातील बेंगळुरू दक्षिण मतदारसंघावर नेहमीच भाजपचं वर्चस्व राहिलं आहे.
Bengaluru South Election Results
Bengaluru South Election Resultsesakal
Updated on
Summary

बेंगळुरू दक्षिण लोकसभा मतदारसंघ 1996 ते 2018 पर्यंत भाजपचे माजी मंत्री अनंत कुमार यांच्याकडे होता.

Bengaluru South Election Results : कर्नाटकातील बेंगळुरू दक्षिण लोकसभा सीट देशभरातील हॉट सीटपैकी एक आहे. या जागेवर भाजपने तेजस्वी सूर्या (Tejasvi Surya), तर काँग्रेसने सौम्या रेड्डी यांना उमेदवारी दिली होती. बेंगळुरू दक्षिण लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार तेजस्वी सूर्या 222024 मतांनी आघाडीवर आहेत. सूर्या यांना आतापर्यंत एकूण 601165 मते मिळाली आहेत. तर काँग्रेसचे उमेदवार रेड्डी यांना 379141 मते मिळाली आहेत.

कर्नाटकातील बेंगळुरू दक्षिण मतदारसंघावर नेहमीच भाजपचं वर्चस्व राहिलं आहे. सध्या येथील खासदार तेजस्वी सूर्या आहेत. ते 17 व्या लोकसभेचे सर्वात तरुण खासदार आहेत. यावेळीही लोकसभा निवडणुकीत भाजपनं तेजस्वी सूर्या यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना तिकीट दिलं आहे. ही जागा 1991 पासून भाजपच्या ताब्यात आहे. दरम्यान, भारतात जेव्हा पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या, तेव्हा पेशानं स्वातंत्र्यसैनिक आणि वकील टी. मडिया गौडा यांनी बंगळुरू दक्षिण मतदारसंघातून (Bengaluru South Constituency) विजय मिळवला होता.

2024 च्या लोकसभा निवडणुकीतील एक हॉट सीट म्हणून बेंगळुरू दक्षिणेकडं पाहिलं जातं. येथून भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि विद्यमान खासदार तेजस्वी सूर्या निवडणूक लढवत आहेत. बंगळुरू दक्षिणमध्ये ही चुरशीची लढत आहे. यावेळी सूर्या यांच्यासमोर काँग्रेसच्या उमेदवार सौम्या रेड्डी दिग्गज नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी यांच्या कन्येचं आव्हान होतं. रामलिंगा रेड्डी विधानसभेत बीटीएम लेआउटचे प्रतिनिधित्व करतात. सौम्या 2018 मध्ये जयनगरची आमदार म्हणून निवडून आली होती.

Bengaluru South Election Results
Thiruvananthapuram Lok Sabha Election Results : मंत्री चंद्रशेखरांचा पराभव करत शशी थरूर सलग चौथ्यांदा तिरुअनंतपुरममधून विजयी

बेंगळुरू दक्षिण लोकसभा मतदारसंघ 1996 ते 2018 पर्यंत भाजपचे माजी मंत्री अनंत कुमार यांच्याकडे होता. मात्र, 2018 मध्ये त्यांच्या आकस्मिक निधनामुळं ही जागा रिक्त झाली. यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं अनंत कुमार यांच्या पत्नी तेजस्विनी यांच्या जागी तेजस्वी सूर्या यांना पसंती देत उमेदवारी दिली. या निवडणुकीत तेजस्वी सूर्या विजयी झाले. तेजस्वी सूर्या यांना तिकीट मिळण्याचं कारण म्हणजे, आरएसएसला तरुण नेता तयार करायचा होता. बंगळुरू दक्षिण हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो.

बेंगळुरू दक्षिण जागेचा राजकीय इतिहास

1956 मध्ये काही लोकसभा मतदारसंघ कर्नाटक राज्याला जोडण्यात आले. यानंतर बेंगळुरू उत्तर आणि दक्षिण प्रदेश एकत्र करून बेंगळुरू लोकसभा मतदारसंघाची निर्मिती करण्यात आली. एचसी दासप्पा 1957 ते 1962 पर्यंत बंगळुरू मतदारसंघातून खासदार झाले. 1963 मध्ये त्यांनी भारताचे रेल्वे मंत्री म्हणूनही काम केले. आणीबाणीनंतर देशभरात मतदारसंघांची पुनर्रचना झाली, त्यानंतर ही जागा 1977 मध्ये बंगलोर दक्षिण म्हणून अस्तित्वात आली. तेव्हापासून आतापर्यंत येथे 12 वेळा निवडणुका झाल्या आहेत. यामध्ये भाजपने 8 वेळा, जनता पक्षाला 3 वेळा आणि काँग्रेसने केवळ एकदाच विजय मिळवला आहे.

1989 च्या निवडणुकीत काँग्रेसने ही जागा पहिल्यांदाच जिंकली

1977 च्या लोकसभा निवडणुकीत केएस हेगडे यांनी माजी मुख्यमंत्री केंगल हनुमंतय्या यांच्या विरोधात येथून विजय मिळवला होता. 1980 मध्ये टीआर शामन्ना जनता पक्षाच्या तिकिटावर विजयी झाले होते. 1984 मध्ये व्हीएस कृष्णा अय्यर यांनी निवडणूक जिंकली. 1989 च्या निवडणुकीत काँग्रेसने ही जागा पहिल्यांदा जिंकली आणि माजी मुख्यमंत्री आर. गुंडू राव यांनी निवडणूक जिंकली.

ही जागा 1991 पासून आहे भाजपकडे..

त्यानंतर ही जागा काँग्रेसला कधी जिंकता आलेली नाही. पंतप्रधान चंद्रशेखर यांचे सरकार पडल्यानंतर 1991 मध्ये निवडणुका झाल्या. ही निवडणूक जिंकून व्यंकटगिरी गौडा यांनी या जागेवर भाजपचे खाते उघडले. 1996 मध्ये भाजपने अनंत कुमार यांना उमेदवारी दिली, ते विजयी झाले. त्यानंतर त्यांनी सलग 5 निवडणुका जिंकल्या. यामुळे अनंत कुमार कर्नाटकातील सर्वात प्रभावशाली राजकारण्यांपैकी एक बनले. त्यांनी वाजपेयी आणि मोदी सरकारमध्ये अनेक महत्त्वाची पदे भूषवली. 2018 मध्ये कर्करोगाने ग्रस्त असलेल्या अनंत कुमार यांचे 2019 मध्ये निधन झाले. यानंतर तेजस्वी सूर्या यांनी 2019 च्या निवडणुकीत भाजप उमेदवार म्हणून विजय मिळवला आणि वयाच्या 29 व्या वर्षी सर्वात तरुण खासदारांपैकी एक बनले.

बेंगळुरू दक्षिण मतदारसंघात 20 लाख मतदार

2019 च्या आकडेवारीनुसार, बेंगळुरू दक्षिण जागेवर सुमारे 20 लाख मतदार आहेत. यामध्ये पुरुषांची संख्या 10.5 लाख तर महिलांची संख्या 9.5 लाख आहे. या परिसराची एकूण लोकसंख्या 24 लाखांच्या आसपास आहे. विशेष म्हणजे, येथील संपूर्ण लोकसंख्या शहरी भागात राहते. या जागेवर अनुसूचित जातीचे एकूण मतदार सुमारे 8 टक्के आहेत, तर अनुसूचित जमातीचे मतदार 1.71 टक्के आहेत.

2019 निवडणूक निकाल

विजयी - तेजस्वी सूर्या (भाजप)

मिळालेली मते – 7,39,229

मते (%) – 62.20

उपविजेते - बीके हरिप्रसाद (काँग्रेस)

मते मिळाली- 4,08,037

मते (%) – 34.33

अंतर- 3,31,192

2014 निवडणूक निकाल

विजेयी - अनंत कुमार (भाजप)

मते मिळाली- 6,33,816

मते (%)- 56.88

उपविजेते - नंदन नीलेकणी (काँग्रेस)

मिळालेली मते – 4,05,241

मते (%) – 36.37

अंतर – 2,28,575

कोण कधी जिंकले?

1951 - टी. मडिया गौडा (काँग्रेस)

1957-1977 : जागा अस्तित्वात नव्हती

1977 - केएस हेगडे (जनता पार्टी)

1980 - टीआर शामन्ना (जनता पार्टी)

1984 – व्ही.एस. कृष्णा अय्यर (जनता पार्टी)

1989 – आर गुंडू राव (काँग्रेस)

1991 - के. वेंकटगिरी गौडा (भाजपा)

1996 – अनंत कुमार (भाजपा)

1998 – अनंत कुमार (भाजपा)

1999 – अनंत कुमार (भाजपा)

2004 – अनंत कुमार (भाजपा)

2009 – अनंत कुमार (भाजपा)

2014 – अनंत कुमार (भाजपा)

2019 – तेजस्वी सूर्या (भाजप)

कोण आहेत तेजस्वी सूर्या?

२०१९ च्या निवडणुकीत तेजस्वी सूर्या दक्षिणेतील भाजपाचा तरुण चेहरा म्हणून उदयास आले होते. त्यांनी कर्नाटकातील भाजपाचा अभेद्य बालेकिल्ला तर वाचवलाच शिवाय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बी. के. हरिप्रसाद यांचाही पराभव केला. भारतीय जनता युवा मोर्चा (BJYM) चे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या (३३) पुन्हा एकदा बंगळुरू दक्षिणमधून निवडणूक लढवत आहेत. तेजस्वी सूर्या बीजेवायएमचे अध्यक्ष म्हणून खूप सक्रिय आहेत. ते भाजपाच्या युवा नेत्यांच्या आघाडीच्या फळीत येतात. १६ नोव्हेंबर १९९० रोजी कर्नाटकातील चिक्कमंगळुरू येथे जन्मलेल्या तेजस्वी सूर्या यांनी कायद्याचे शिक्षण घेतले आहे. त्यांचे वडील एल. ए. सूर्यनारायण हे उत्पादन शुल्क विभागात अधिकारी होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.