'काँग्रेसने दोनदा बाबासाहेबांचा पराभव केला, प्रकाश आंबेडकरांना सोडून दिलं'; बावनकुळेंचा जोरदार प्रहार

काँग्रेसने महाविकास आघाडीत प्रकाश आंबेडकर यांना घेतले नाही, त्यांना सोडून दिले.
Babasaheb Ambedkar  Chandrashekhar Bawankule
Babasaheb Ambedkar Chandrashekhar Bawankuleesakal
Updated on
Summary

काँग्रेसने भंडारा व मुंबई या दोन ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पराभव केला आहे. काँग्रेस पक्ष हा बाबासाहेबांच्या, आंबेडकर परिवाराच्या विरोधी आहे.

कराड : काँग्रेस कधीही आंबेडकर परिवाराला सहन करत नाही. काँग्रेसने दोनदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पराभव केला आहे. काँग्रेस पक्ष हा बाबासाहेबांच्या (Babasaheb Ambedkar) विरोधी आहे. काँग्रेसने महाविकास आघाडीत प्रकाश आंबेडकर यांना घेतले नाही, त्यांना सोडून दिले असा प्रहार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावळकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी काँग्रेस पक्षावर केला.

सातारा लोकसभेचे महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्या प्रचारासाठी बावनकुळे आले असता ते माध्यमांशी बोलत होते. भाजपचे सातारा लोकसभा प्रभारी अतुल भोसले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. ''पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे निमंत्रण घेऊन मी आलो आहे. लाखो लोक या सभेला येतील. साताऱ्याची सभा ऐतिहासिक होईल.

Babasaheb Ambedkar  Chandrashekhar Bawankule
Satara Lok Sabha : शिंदेंना अटक केल्यास राज्यभर आंदोलन करणार; शरद पवारांचा थेट इशारा

उदयनराजे यांनी यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्यासाठी पुढाकार घेतला असेल आणि उदयनराजे यांनी मागणी केल्यास पंतप्रधान मागणी मान्य करतील, असे सांगून बावनकुळे म्हणाले, काँग्रेस (Congress) कधीही आंबेडकर परिवाराला सहन करत नाही. काँग्रेसने भंडारा व मुंबई या दोन ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पराभव केला आहे. काँग्रेस पक्ष हा बाबासाहेबांच्या, आंबेडकर परिवाराच्या विरोधी आहे. काँग्रेसने महाविकास आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकर यांना घेतले नाही, त्यांना सोडून दिले, त्यामुळे आंबेडकर परिवाराला काँग्रेस कधीही सहन करत नाही.''

Babasaheb Ambedkar  Chandrashekhar Bawankule
Satara Lok Sabha : 'मोदींची लाट सुनामीसारखी, लाटेत शरद पवारांचे सर्व उमेदवार पराभूत होणार'; बावनकुळेंना विश्वास

नाशिकच्या जागेचा तिढा सुटलेला नाही या प्रश्नावर ते म्हणाले, नाशिकची जागा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या चर्चेमध्ये आहे. भारतीय जनता पार्टी तेथे निवडणूक लढणार नाही. प्रीतम ताईला चांगल्या स्थानावर बसवण्यासाठी आमची जबाबदारी आहे. त्यासाठी मी, देवेंद्र फडणवीस पुढाकार घेत आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

मुंबईतून पूनम महाजन यांचा पत्ता कट करून अॅड. उज्वल निकम यांना उमेदवारी दिली आहे त्याबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले, पूनम महाजन यांचा योग्य विचार पक्षाकडून सुरू आहे. उज्वल निकम यांना भारतीय जनता पक्षाच्या उच्चस्तरीय केंद्रीय नेतृत्वाने उमेदवारी दिली आहे. देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार यांनी त्यांचा सन्मान केला आहे. उज्वल निकम हे लोकसभेत जातील आणि त्यांचा जो अभ्यास आहे, त्यातून नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये अत्यंत चांगलं काम निकम करतील. महाराष्ट्रात व देशात चांगले काम केलेला एक वकील उज्वल निकम यांच्या रूपाने भाजपचा खासदार बनतोय याचा मला अभिमान आहे.

Babasaheb Ambedkar  Chandrashekhar Bawankule
Kolhapur Lok Sabha : कोल्हापुरात मोदींच्या सभेला तुफान प्रतिसाद; गर्दीचे रूपांतर मतांत करताना नेत्यांचा लागणार कस

राष्ट्रवादीकडून तपास यंत्रणेवर दबावाचा प्रयत्न

खासदार शरद पवार यांनी शशिकांत शिंदे यांना कधीही अटक होऊ शकते असे वक्तव्य केले आहे. त्यावर बावनकुळे म्हणाले, ''गुन्हा कोणत्या प्रकारचा आहे. त्यातून गंभीरबाब समोर आली आहे. हा तपास यंत्रणेचा भाग आहे तो राजकीय भाग नाही. त्याचे राजकीय भांडवल कोण करत असेल त्याचा त्यांना लखलाभ आहे. हा रडीचा डाव नसून ५१ टक्के मते घेऊन खासदार उदयनराजे भोसले विजय होत आहेत. विरोधक पराभूत झालेलेच आहेत, त्यामुळे आम्हाला रडीचा डाव खेळण्याची गरजच नाही.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.