ज्या महामानवानं भारताला संविधान दिलं, त्याच आंबेडकरांना दोन वेळा काँग्रेसकडून स्वीकारावा लागला पराभव!

एवढे कर्तृत्व असूनही बाबासाहेबांना प्रत्यक्ष निवडणुकीच्या राजकारणात दोन वेळा अपयश आले.
Lok Sabha Elections Dr. Babasaheb Ambedkar
Lok Sabha Elections Dr. Babasaheb Ambedkaresakal
Updated on
Summary

प्रत्यक्ष निवडणुकीत असे पराभव झाले असले तरी बाबासाहेबांनी नंतर राज्यसभेच्या माध्यमातून संसद गाठली.

Lok Sabha Elections : भारताचे उच्चविद्याविभूषित नेते व पददलित, गरिबांचे उध्दारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांनी लिहिलेल्या संविधानाच्या (Constitution) माध्यमातून आपल्या देशाचे राज्यशकट हाकले जाते. डॉ. आंबेडकर यांचे देशाप्रतिचे कार्य आपणा सर्वांना चांगल्या प्रकारे विदित आहेच. संविधानाच्या मसुदा समितीतसुध्दा त्यांचा सहज प्रवेश झालेला नव्हता.

एवढ्या मोठ्या अडथळ्यांचा डोंगर पार करून बाबासाहेबांनी आपली कारकीर्द गाजवली. एवढे कर्तृत्व असूनही बाबासाहेबांना प्रत्यक्ष निवडणुकीच्या राजकारणात दोन वेळा अपयश आले. त्यांच्या शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनने १९५२ च्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत दोन जागा जिंकल्या. मात्र, स्वतः बाबासाहेबांना मुंबई राज्यातील उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून व १९५४ च्या भंडारा पोटनिवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला.

Lok Sabha Elections Dr. Babasaheb Ambedkar
Ratnagiri Loksabha 1957 : संसदेत स्वतःच्या भाषेतून भाषण करणाऱ्या प्रेमजीभाईंनी 'पणती' निशाणीवर लोकसभा जिंकली!

मुंबई उत्तरमधून ते शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनकडून (Scheduled Caste Federation) उभे होते. तिथे कॉँग्रेसच्या (Congress) नारायण सदोबा काजरोळकर यांनी त्यांचा पराभव केला. बाबासाहेब चौथ्या क्रमांकावर गेले. त्या मतदारसंघात त्यावेळच्या देशात प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा व हिंदू महासभेचाही उमेदवारही होता. कम्युनिस्ट पक्षाकडून श्रीपाद अमृत डांगे यांनी बाबासाहेबांच्या विरोधात प्रचार जोरदार प्रचार केला. अशोक मेहता यांच्या सोशॅलिस्ट पार्टीने मात्र बाबासाहेबांना पाठिंबा दिला होता. बाबासाहेबांना ज्यांनी पराभूत केले ते काजरोळकरही दलित समाजातूनच होते. तसेच त्यांनी बाबासाहेबांचे सहाय्यक म्हणूनही काम केले होते.

Lok Sabha Elections Dr. Babasaheb Ambedkar
Satara Lok Sabha : उदयनराजेंना दिलेला 'शब्द' अमित शहा पाळणार? साताऱ्याच्या उमेदवारीवरून भाजप-राष्ट्रवादीत घमासान!

मुंबईतील पराभवानंतर बाबासाहेबांनी १९५४ ला भंडारा (Bhandara) येथून लोकसभेची पोटनिवडणूक लढविली मात्र तिथेही त्यांना पराभव स्वीकारावा लागला. या दोन्ही निवडणुकीत कॉँग्रेस त्यांच्या विरोधात होती. प्रत्यक्ष निवडणुकीत असे पराभव झाले असले तरी बाबासाहेबांनी नंतर राज्यसभेच्या माध्यमातून संसद गाठली. पंडित नेहरूंच्या स्वातंत्र्याआधीच्या हंगामी व नंतरच्या पहिल्या मंत्रिमंडळातही बाबासाहेब मंत्रिपदी राहिले. या मंत्रिपदाच्या माध्यमातून त्यांनी अत्यंत महत्वाचे दूरगामी निर्णय घेत देशसेवा केली.

Lok Sabha Elections Dr. Babasaheb Ambedkar
Rajapur Constituency : समाजवादी विचारसरणीच्‍या नाथ पै पर्वाचा अस्त; बेळगावला गेले अन् तिथंच त्यांचं..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.