Election Story : 'गाय वासरू, नका विसरू'; वाचा भारतातील निवडणुकांचे रंजक किस्से

Loksabha Election 2024: दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या राजकारणाचे किस्से आजही चवीनं चर्चिले जातात
Congress Party_Cow and Calf
Congress Party_Cow and Calf
Updated on

Loksabha Election 2024 Marathi News : निवडणुका घोषित झाल्या की राजकारणातील काही रंजक किस्से आणि घोषणांची नेहमी चर्चा सुरु होते. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या राजकारणाचे किस्से आजही चवीनं चर्चिले जातात. आता देखील लोकसभा निवडणुकीची घोषणा झालेली असल्यानं यानिमित्त काही जुन्या घोषणांची चर्चा सुरु झाली आहे. (Loksabha Election 2024 Gai Vasaru Naka Vishru Interesting stories from India elections)

Congress Party_Cow and Calf
2G Spectrum Scam: 'टू जी स्पेक्ट्रम' घोटाळ्याची बंद झालेली फाईल पुन्हा उघडणार? निर्दोष सुटलेले 'हे' नेते येणार पुन्हा अडचणीत

भारतीय निवडणूक घोषणांच्या इतिहासात इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळातील ‘गरिबी हटाओ’ सारखीच ‘गाय वासरू, नका विसरू’, या घोषणेचीही लोकप्रियता आजही आहे. दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर पंतप्रधानपदाच्या पक्षांतर्गत शर्यतीत इंदिरा गांधी यांनी बाजी मारली व पद मिळवलं. (Latest Marathi News)

मात्र, त्यानंतर पक्षात मतभेद निर्माण झाले व १९६९ ला पक्षाची दोन शकले झाली. गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस-आर (मागणीवादी) तर के. कामराज, मोरारजी देसाई आदींच्या नेतृत्वाखाली कॉँग्रेस-ओ (संघटनावादी) हे ते दोन गट.

Congress Party_Cow and Calf
Vijay Shivtare: शिवतारे भाजपच्या कमळ चिन्हावरही लढण्यास तयार; मुख्यमंत्र्यांसमोर ठेवला नवा प्रस्ताव

गांधींच्या गटाला ‘गाय वासरू’ हे चिन्ह मिळाले. १९७१ च्या सार्वत्रिक निवडणुका या दोन्ही गटांनी लढवल्या. मात्र, इंदिरा गांधींच्या पक्षाने गरिबी कमी करण्याचे वचन देत ही निवडणूक जिंकली. अर्थात १९७१ साली पाकिस्तानसोबतचे युद्ध इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली जिंकल्याने त्यांची लोकप्रियता आधीच वाढली होती. या निवडणुकीत त्यांनी ‘गाय व वासरू’ या भारतीय संस्कृतीत मानाचे स्थान असलेल्या प्रतिकांचा चपखल वापर केला. (Marathi Tajya Batmya)

गाय तिच्या वासराला जशी जपते, लळा लावते अगदी तशाच रीतीने आमचा पक्ष मतदारांना वागवेल, अशी खात्री त्यांनी ‘गाय वासरू, नका विसरू’ या घोषणेतून दिली. परिणामी कॉँग्रेस (आर) पक्षाने तब्बल ३५२ जागा मिळवत पुन्हा एकदा सत्ता प्राप्त करत इंदिरा गांधी यांना पंतप्रधानपदी बसवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.