Loksabha election 2024 : 'गोधरा’चा मुद्दा प्रचारामध्ये; बिहारच्या सभेत मोदींची लालूंवर टीका

PM Narendra Modi Ramtek
PM Narendra Modi Ramtekesakal
Updated on

दरभंगा (बिहार)ः गुजरातमध्ये २००२ साली झालेल्या गोधरा जळितकांडप्रकरणाला उजाळा देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) सर्वोसर्वा लालूप्रसाद यादव यांच्यावर घणाघाती टीका केली. गुजरातमध्ये साठ कारसेवकांना ज्यांनी जिवंत जाळून मारले त्यांना वाचविण्याचा प्रयत्न लालूप्रसाद यांनी केला होता. सोनिया मॅडमच्या राजवटीमध्येच हे घडल्याचे ते म्हणाले. विरोधकांनी नेहमीच लांगूलचालनाचे काम केल्याचा आरोपही मोदींनी केला.

पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘‘ लांगूलचालनाच्या राजकारणाला बळी पडलेल्या बिहारच्या शहजाद्यांच्या (तेजस्वी यादव) वडिलांनी गोधरा जळितकांड प्रकरणातील आरोपींना वाचविण्याचे काम केले होते. त्यावेळी केंद्रामध्ये सोनिया मॅडम यांचे सरकार होते. लालूप्रसाद यादव हे स्वतः पशुखाद्य गैरव्यवहारामध्ये दोषी ठरले आहेत. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्यांनी चौकशी समिती स्थापन केली होती त्या समितीनेच दोषींना क्लीनचीट दिली होती पण न्यायालयाने मात्र तो अहवाल कचऱ्याच्या डब्यात फेकून दिला होता.’’

त्यातून विचारधारा समजते

तेजस्वी यादव यांच्यावर टीका करताना मोदी यांनी अग्नीपथ योजनेचाही दाखला दिला. ‘‘ आम्ही जेव्हा कॅप्टन हमीद यांच्या हौत्मात्म्याची चर्चा करतो तेव्हा मात्र ते केवळ मुस्लिम असल्याची चर्चा केली जात नाही. आमच्याकडे दोन शहजादे आहेत त्यातील एकजण हा पाटण्यामध्ये बसला असून दुसरा दिल्लीमध्ये आहे. हे दोघेही या देशाला आपली जहागीर समजतात. ही मंडळी जेव्हा सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात तेव्हा त्यांची विचारधारा स्पष्ट होते.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.