Prakash Ambedkar: अकोला पॅटर्नमध्ये खरंच मराठ्यांना विरोध आहे का?; प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं गणित

उमेदवारांच्या यादीत जात लिहिण्यामागचा उद्देशही केला स्पष्ट
Prakash Ambedkar
Prakash Ambedkaresakal
Updated on

अकोला : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान येत्या २६ एप्रिल रोजी होत आहे. पण यंदाही प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या अकोला पॅटर्नची चर्चा सुरु आहे. या पॅटर्नमध्ये मराठा उमेदवारांना विरोध असल्याची चर्चा होते पण खरंच हा विरोध आहे का? स्वतः आंबेडकर यांनी यामागचं गणित उलगडून सांगितलं आहे. सकाळ माध्यम समुहाचे मुख्य संपादक सम्राट फडणीस यांनी घेतलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी राजकीय रणनितीवरही भाष्य केलं. (Loksabha Election 2024 Prakash Ambedkar Akola pattern really against the Marathas)

Prakash Ambedkar
PM Modi on Pitroda: सॅम पित्रोदांच्या 'वारसा संपत्ती'वरील विधानावर PM मोदींचं भाष्य; म्हणाले, "जिंदगी के साथ भी..."

अकोला पॅटर्न नेमका काय?

आंबेडकरांच्या अकोला पॅटर्नची चर्चा होते त्यावर स्पष्टीकरण देताना ते म्हणतात, "मराठा समाजाच्या हातात सत्ता आहे असं आपण म्हणतो पण ती खरंच मराठा समाजाच्या हातात नाही. तर मराठा समाजातील १६९ घराण्यांच्या हातात ही सत्ता आहे. पण ही घराणीचं आपल्याकडं मराठ्यांची सत्ता असल्याचं खपवतात. (Latest Marathi News)

याविरोधात आम्ही सोशल इंजिनिअरिंगला सुरुवात करताना मराठा समाजाविरोधात आंदोलन उभं केलं नाही, तर घराणेशाहीच्याविरोधातील आंदोलन केलं होतं. त्यामुळं आम्हाला उमेदवारी सामाजिक करता आली, यात आम्हाला यश आलं. अशा प्रकारे सर्व समाजाच्या उमेदवारांना संधी मिळतेय हे लक्षात आल्यानंतर या घराण्यांनी संपूर्ण पक्षच ताब्यात घेतला.

Prakash Ambedkar
Wayanad: राहुल गांधींच्या वायनाडमध्ये माओवाद्यांचा धुमाकूळ, निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे लोकांना आवाहन

राज्यातील राजकारण हे १६९ घराण्यांचा खेळ

त्यामुळं शरद पवार, उद्धव ठाकरे, काँग्रेस यांचे अध्यक्ष हे ठरवत नाहीत की युती कोणाबरोबर करायची. तर ही १६९ घराणी ठरवतात. म्हणून त्याच्या आगोदरच्या निवडणुकीत आणि या निवडणुकीत आम्ही थोडी रणनीती बदलली. यावेळी आम्ही म्हटलं की, तुम्ही सातत्यानं पाच वर्षे हारलेल्या १२ जागा आम्हाला द्या पण ते झालं नाही. (Marathi Tajya Batmya)

यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडली होती. काँग्रेसमधून अनेकजण भाजपत गेले होते. म्हणून आम्ही चर्चेसाठी तयार आहोत असं म्हटलं होतं. पण या १६९ घराण्यांना भीती अशी आहे की जर उमेदवारी ही सामाजिक झाली तर घराण्याची सत्ता जाईल आणि म्हणून यांनाच बाहेर काढा. त्यामुळं आमचा प्रचार असा आहे की, ज्यांना असं वाटतं सत्ता आपल्याकडं असली पाहिजे त्यांनी वंचितला मतदान करावं.

Prakash Ambedkar
Tata Elxsi : 700 टक्के डिव्हिडंट अन् 2000 इंजिनिअर्सना नोकऱ्या; 'टाटा'च्या कंपनीचं चोख नियोजन

सोशल इंजिनिअरिंग नको म्हणून खेळ

काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप किंवा शिवसेनेच्या ठाकरे गटाची यादी घ्या यात त्याच १६९ कुटुंबातील लोक आहेत, ते एकमेकांचे जवळचे नातेवाईक आहेत. राजकारणाला यांनी नात्यागोत्याचा रंग दिला आहे. यात फक्त लुटुपुटूची लढाई दाखवायची आणि सत्ता आपल्याकडंच ठेवायची, असा यांचा खेळ आहे. त्यामुळं हे सर्व पक्ष जे एकमेकांविरोधात लढतात ही केवळ नौटंकी आहे.

आम्ही जर नसतो तर ही सत्ता केवळ या १६९ कुटुंबांमध्ये खेळली गेली असती. त्यामुळं हा जिंकला आणि हा हारला यानं त्यांना फरक पडत नाही, ती त्यांच्या कुटुंबांमध्येच राहते. त्यामुळं आम्हीच खऱ्या अर्थानं सत्तेच सामाजिकरण केलं आहे. आमच्या उमेदवारांवरुन हे तुमच्या लक्षात येईल. (Latest Maharashtra News)

Prakash Ambedkar
Latest Marathi News : राज्यासह देशभरातील महत्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

उमेदवारांची जात का सांगतो?

आम्ही उमेदवारांची जात सांगतो कारण ही यादी सर्वसमावेशक आहे हे आम्ही दाखवतो. आमच्यावर टीका करणारे हे घराणेशाही मानणारे आहेत. बाबासाहेबांच्या शब्दांत सांगायचं झालं तर यांच्या राजकारणानं देशाला गुलाम केलं आहे. त्यामुळं विश्लेषण करताना त्यांनी आमच्यावर टीका करावी पण जे सर्व विश्लेषक आमच्या यादीवर भाष्य करतात तेव्हा ही नातेवाईकांची यादी आहे असा शिक्का ते मारु शकत नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.