Loksabha election 2024 : सभा घ्यायला आल्या अन् विकासाचा मुद्दा विसरुन गेल्या; प्रियांका गांधींनी मराठवाड्यासाठी शब्दही काढला नाही

श्रीमती गांधी यांनी या सभेत स्थानिक व मराठवाडा पातळीवरील मुद्द्यांना स्पर्श न करता थेट राष्ट्रीय पातळीवरील मुद्द्यावर भाष्य केले. राष्ट्रीय पातळीवर सुरू असलेली महागाई, बेरोजगारी यावर प्रामुख्याने भाष्य केले, शेतकरी प्रश्नांच्या बाबतीत त्यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले परंतु आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याबाबत भाष्य केले नाही. त्यामुळे मराठवाड्याच्या विकासाचा प्रश्न ऐरणीवर येऊन कधी सुटणार हा मतदारांना प्रश्न पडला आहे.
Loksabha election 2024 : सभा घ्यायला आल्या अन् विकासाचा मुद्दा विसरुन गेल्या; प्रियांका गांधींनी मराठवाड्यासाठी शब्दही काढला नाही
Updated on

उदगीर (जि.लातुर) : अनेक वर्षापासून विकासापासून वंचित असलेल्या मराठवाड्याच्या विकासाचा मुद्दा सातत्याने चर्चेत राहतो. मात्र विकास होत नाही, अशातच शनिवारी (ता. २७) काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्या आयोजित सभेत काँग्रेसची सत्ता आल्यास विकास करण्याचे आश्वासन मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र श्रीमती गांधी यांनी मराठवाड्याच्या विकासाबाबत एकही शब्द न उच्चारल्याने उपस्थित मतदारांचा हिरमोड झाल्याची स्थिती आहे.

शनिवारी येथील जिल्हा परिषदेच्या मैदानात काँग्रेसचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या प्रचारार्थ श्रीमती गांधी यांची सभा संपन्न झाली. यात राष्ट्रीय पातळीवर सर्व मुद्द्याबाबत जोरदार चर्चा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपा सरकारवर गेल्या दहा वर्षात केलेल्या कामाचा पंचनामा श्रीमती गांधी यांनी केला. यावेळी निवडणूक येतात मोदींची नोटंकी सुरू असा गंभीर आरोप पंतप्रधानांवर केला. मात्र सभा असलेल्या मराठवाड्याच्या विकासासंदर्भात त्यांनी आपल्या भाषणात कुठलेच आश्वासन न देता चकार शब्दही उच्चारला नाही त्यामुळे मराठवाड्याच्या विकासाचे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Loksabha election 2024 : सभा घ्यायला आल्या अन् विकासाचा मुद्दा विसरुन गेल्या; प्रियांका गांधींनी मराठवाड्यासाठी शब्दही काढला नाही
PM Modi Kolhapur Rally: पंतप्रधान मोदींच्या सभेला संभाजी भिडेंची हजेरी; मोदींचं कोल्हापुरकरांना पुन्हा सत्तेत आणण्याचं केलं आवाहन

गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्राच्या विकासाबरोबर मराठवाड्याला न्याय मिळू शकला नाही २०१४ ला सत्ता बदल झाल्यानंतर सुद्धा भाजपाच्या काळात मराठवाड्याचा म्हणावा तसा विकास होऊ शकला नाही. मराठवाड्याची वाटरग्रीड योजना अद्यापही रखडलेली आहे. रेल्वेचे प्रश्न अद्यापही प्रलंबित आहेत. मराठवाड्यात म्हणावे तसे उद्योग अद्यापही उभारले गेले नाहीत. या पार्श्वभूमीवर मराठवाड्याच्या विकासावर चर्चा होईल असे मतदारांना अपेक्षित होते.

श्रीमती गांधी यांनी या सभेत स्थानिक व मराठवाडा पातळीवरील मुद्द्यांना स्पर्श न करता थेट राष्ट्रीय पातळीवरील मुद्द्यावर भाष्य केले. राष्ट्रीय पातळीवर सुरू असलेली महागाई, बेरोजगारी यावर प्रामुख्याने भाष्य केले, शेतकरी प्रश्नांच्या बाबतीत त्यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले परंतु आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याबाबत भाष्य केले नाही. त्यामुळे मराठवाड्याच्या विकासाचा प्रश्न ऐरणीवर येऊन कधी सुटणार हा मतदारांना प्रश्न पडला आहे.

Loksabha election 2024 : सभा घ्यायला आल्या अन् विकासाचा मुद्दा विसरुन गेल्या; प्रियांका गांधींनी मराठवाड्यासाठी शब्दही काढला नाही
Tristan Stubbs DC vs MI : 4,4,6,4,4,4 एकाच षटकात होत्याचं नव्हतं झालं! स्टब्सच्या तडाख्यात वूडची शकलं

सीमा प्रश्नाचाही उल्लेख नाही

उदगीर तालुक्याला लागून असलेला महाराष्ट्र कर्नाटक सिमा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेला आहे. श्रीमती गांधी यावेळी हा प्रश्न ऐरणीवर घेतील अशी अपेक्षा होती. मात्र कर्नाटक सीमा परिसरात अनेक दिवसापासून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या मराठी बांधवांना न्याय देण्याच्या संदर्भात या सभेत श्रीमती गांधी यांनी उल्लेख केला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.