रायगड : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं रायगडच्या माणगाव तालुक्यात स्थिर सर्वेक्षण पथक सज्ज करण्यात आलं आहे. प्रत्यक्ष माणगावपासून २ किलोमीटर लांब अंतरावर हे पथक सज्ज आहे. तालुक्यात सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मात्र, या चेकपोस्टवर वाहनांची तपासणी होत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पण या पथकावर राजकीय नेत्यांचा दबाव आहे का? हा प्रश्न देखील या निमित्त उपस्थित होत आहे. (Loksabha Election 2024 Raigad static surveillance team at Mangaon not working properly)
निवडणुकीच्या काळात गैरप्रकार रोखण्यासाठी पथक
निवणुकीच्या आणि प्राचाराच्या काळात अवैध दारू, पैसे, शस्त्रसाठा येण्याची दाट शक्यता असते. त्यामुळं वाहनांची कसून चौकशी करण्यात येते. निवडणुकीमध्ये गोंधळ तसेच गैर प्रकार होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी तसेच मतदान सुरळीत पार पडण्यासाठी महत्वाच्या रस्त्यांवर स्थिर सर्वेक्षण पथक सज्ज करण्यात येतात.
तपासणी पथक प्रमुख मोबाईलमध्ये व्यस्त
यासाठी सहायक निवडणूक अधिकारी यांच्या अधिपत्याखाली शहरात बाहेरून येणाऱ्या वाहनांना प्रवेश देतना त्यांची कसून तपासणी करण्यात येते. मात्र, माणगावात याच्या उलट स्थिती आहे. पथकप्रमुख आपलं काम सोडून बाजुला मोबाईलमध्ये व्यस्त असल्याचं दिसून आलं आहे. रस्त्यात नावाराच पथकाचा बोर्ड लावण्यात आला आहे पण याला न जुमानता कुठल्याही तपासणीशिवाय इथून गाड्या सुसाट जात आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.