ठाणे - विजय शिवतरे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समज दिल्यानतंरही त्यांच्याकडून वारंवार बारामतीमध्ये अजित पवार यांच्या विरोधात आगपाखड सुरु आहे. त्यामुळे शिवतरे यांच्याकडून वारंवार महायुतीचा धर्म तोडण्याचे काम करत आहेत. आम्हाला महायुतीचे वातावरण खराब होईल असे कृत्य करायचे नसल्याचा इशारा राष्ट्रवादी (अजित पवार गटाचे) प्रवक्ते आनंद परांजपे यांनी दिला.
विजय शिवतरे यांच्या कृत्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात मुख्यमंत्री शिंदे यांचे म्हणने त्यांचेच नेते ऐकत नाहीत असा मेसेज जात असून ते चुकीचे असल्याचे ते म्हणाले. शिवतरे हे महायुतीच्या दुधात मीठ टाकत आहेत, पुरंदरच्या जनतेने त्यांना त्यांची जागा २०१९ ला दाखविली असल्याची आठवणही त्यांनी करुन दिली आहे. ४८ लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचा धर्म राष्ट्रवादी पाळत आहे.
परंतु शिवसेनेकडून राष्ट्रवादीचे शक्तीस्थळ राष्ट्रवादीचा स्वाभिमान बारामती मध्ये महायुतीचे वातावरण खराब करण्याचे काम करीत असल्याचा आरोप देखील आनंद परांजपे यांनी केला. तसेच शिवतरे बारामतीचा महायुतीचा धर्म तोडत राहिले, महायुतीमध्ये शिवसेना देखील ज्या लोकसभेच्या जागा लढणार आहेत तिथे महायुतीचा धर्म राष्ट्रवादीचे पदाधिकारी देखील तोडू शकतात असा इशारा राष्ट्रवादी (अजित पवार गट) प्रवक्ते आनंद परांजपे यांनी दिला आहे.
संग्राम थोपटे यांना काँग्रेसच्या कोट्यातून मत्री पद का मिळाले नाही. त्यांनी आमच्यावर आरोप करण्यापेक्षा प्रांत अध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांना त्यांनी तो प्रश्न विचारला तर तो अधिक संयुक्तिक राहील असा सल्लाही त्यांनी दिला.
दरम्यान, कल्याणमधील भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी प्रदेश अध्यक्ष बावनकुळे यांना पत्र पाठवून मतदार संघाची मागणी केली आहे. यावर परांजपे यांनी भाष्य केले आहे. मतदार संघात आपल्या पक्षाचा उमेदवार आपल्या पक्षाचे चिन्ह उभे रहावे त्याची भावना असणे स्वाभाविक आहे. त्यामुळे भाजपच्या लोकांनी त्यांची भावना त्यांच्या वरिष्ठांकडे मांडली आहे. याच्यामध्ये गैर नसल्याचेही त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.