Loksabha Election : मोदी- गांधी यांच्यापैकी कुणाची जादू चालणार?

शेतीविकास, कांद्याची निर्यात, प्रकल्पातून शहरासाठी पाणी पळविणे, सिंचन, जीवनावश्‍यक वस्तूंसाठी जीएसटी, औद्योगिक विकास आणि बेरोजगारी आदी प्रश्‍न, हिंदुत्व विरुद्ध अल्पसंख्याक लढाईचे चित्र निर्माण करणे आणि शेती, कांदा, सिंचन, बेरोजगारीप्रश्‍नी प्रचारात ठोस आश्‍वासनांअभावी लोकसभेच्या धुळे मतदारसंघातील निवडणूक जनतेच्या हाती गेली आहे.
Loksabha Election
Loksabha Electionsakal
Updated on

धुळे : शेतीविकास, कांद्याची निर्यात, प्रकल्पातून शहरासाठी पाणी पळविणे, सिंचन, जीवनावश्‍यक वस्तूंसाठी जीएसटी, औद्योगिक विकास आणि बेरोजगारी आदी प्रश्‍न, हिंदुत्व विरुद्ध अल्पसंख्याक लढाईचे चित्र निर्माण करणे आणि शेती, कांदा, सिंचन, बेरोजगारीप्रश्‍नी प्रचारात ठोस आश्‍वासनांअभावी लोकसभेच्या धुळे मतदारसंघातील निवडणूक जनतेच्या हाती गेली आहे.

यात पंतप्रधान नरेंद्र मोदी की कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची जादू चालते हा औत्सुक्याचा विषय ठरतो आहे. वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमचा उमेदवार रिंगणात नसल्याने धुळे मतदारसंघातील जातीय समीकरणे बदलली आहेत. एकीकडे कांद्याच्या निर्यातीचा प्रश्‍न भाजप- महायुतीच्या डोळ्यातून पाणी काढत असताना काँग्रेस- महाविकास आघाडी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची सहानुभूती मिळविण्यासाठी सरसावली आहे.

महायुती हिंदुत्व, देशाच्या सुरक्षिततेच्या मुद्यावर प्रचारात भर देत आहे. परंतु, या प्रचारात विशिष्ट समुदायाला विरोधाची किनार दिसत असल्याने जातीय समीकरणे बदलत आहेत. महायुतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे प्रचारात कारकिर्दीत सिंचन, पाणी, रेल्वे, दळणवळणाच्या सुविधा बळकटीकरणाच्या केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडत आहेत.

काँग्रेसच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांनी शेतीसह सर्वांगिण विकासाचा अजेंडा मतदारांपुढे ठेवला आहे. कांदा निर्यात, शेती, बेरोजगारीच्या मुद्याला नंदुरबारच्या सभेतून बगल देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, धुळ्याच्या सभेत बगल देणारे गृहमंत्री अमित शहा यांच्या अशा भूमिकेमुळे भाजप- महायुतीच्या उमेदवाराला ही नाराजी दूर सारण्याचे मोठे आव्हान पेलावे लागत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com