राष्ट्रवादीच्या होम पिचवर शरद पवारांचीच कसोटी; साताऱ्याच्या उमेदवारीवरुन मोठा पेच, श्रीनिवास पाटील-सारंग पाटलांना विरोध!

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक होत आहे.
Satara Loksabha Election
Satara Loksabha Electionesakal
Updated on
Summary

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार पवार गटापुढे उमेदवारी कोणाला द्यायची यावरुन मोठा पेच निर्माण झाला आहे.

कऱ्हाड : सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या मतदार संघाचे खासदार म्हणून श्रीनिवास पाटील (Shrinivas Patil) यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या लोकसभा तोंडावर आहे. त्यातच साताऱ्याचा पवार गटाचा खासदारकीचा उमेदवार ठरवताना ट्विस्ट निर्माण झाले आहे.

खासदार पाटील आणि त्यांचे पुत्र सारंग पाटील (Sarang Patil) यांच्या उमेदवारीला त्यांच्याच पक्षातील दोन माजी मंत्र्यांनी थेट विरोध करुन दोन नवीन नावे सुचवली आहेत. त्यामुळे पक्षाच्या कसोटीच्या काळातच पक्षात अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यातच साताऱ्याची जागा म्हणजे खासदार पवार गटाचे नाक आहे. ही सीट तर कोणत्याही परिस्थितीत निवडूण आणण्यासाठी त्यांना प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यातच हुकमी एक्याला विरोध झाल्याने त्यातून मार्ग काढण्याचे शिवधनुष्य खासदार पवार यांना आता पेलावे लागणार आहे.

Satara Loksabha Election
Loksabha Election : 'वंचित'च्या प्रकाश आंबेडकरांना 'माविआ' घेणार नाही; टीका करत काय म्हणाले आठवले?

त्यामुळे पक्षाची उमेदवारी घेवून तुतारी कोण वाजवणार हा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे. लोकसभेची निवडणूक जाहीर (Satara Loksabha Election) झाली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक होत आहे. त्यामुळे सर्वच पक्षांतील इच्छुकांनी सातारा लोकसभा मतदार संघाचे तिकीट आमच्या पक्षाला मिळावे यासाठी आपापल्या वरिष्ठ नेत्यांकडे फिल्डिंग लावली आहे. त्यामुळे यावेळची निवडणूक अटीतटीची होईल अशी स्थिती निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून साताऱ्याचे खासदार म्हणून श्रीनिवास पाटील यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

त्यामुळे पक्षाच्या फाटाफुटीत यावेळचे तिकीट त्यांना मिळाले तर राष्ट्रवादी काँग्रेसला विजयापर्यंत मजल मारण्याची संधी मिळेल, अशी सर्वसामान्यांत चर्चा सुरु आहे. खासदार पाटील यांनी तब्बल तीन वेळा खासदारकी आणि सहा वर्षे सिक्कीमचे राज्यपाल म्हणून काम केले आहे. त्यामुळे प्रशासनातला दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. त्याचबरोबर सारंग पाटील यांनाही खासदारांच्या माध्यमातून झालेल्या विकासकामांतून गावा-गावात संपर्क वाढवला आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने व माजी सभापती सत्यजितसिंह पाटणकर यांनीही होम पिचवर उतरुन संपर्क अभियान सुरु केले आहे.

Satara Loksabha Election
Sangli Loksabha : 'आमचाच आमदार अन्‌ खासदार’ सूत्र यंदाही जमणार की बिघडणार? संजय पाटील तिसऱ्यांदा 'लोकसभे'साठी सज्ज

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आता खासदार पवारांच्या बालेकिल्ल्यातील निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. थोरल्या पवारांच्या गटातील उमेदवाराबरोबर तुल्यबळ लढतीसाठी महायुतीनेही जय्यत तयारी सुरु केली आहे. साताऱ्याच्या उमेदवारीसाठी दोनच दिवसांपूर्वी खासदार पवार गटाची मुंबईत बैठक झाली. त्या बैठकीत माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, पाटणचे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी खासदार पाटील आणि त्यांचे पुत्र सारंग पाटील यांच्या उमेदवारीला थेट विरोध केला. आमदार पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांचे तर माजी मंत्री पाटणकर यांनी त्यांचे पुत्र सत्यजितसिंह पाटणकर यांचे नाव पुढे केले.

त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार पवार गटापुढे उमेदवारी कोणाला द्यायची यावरुन मोठा पेच निर्माण झाल्याने येथील उमेदवारीचा निर्णय स्थगित ठेवावा लागला आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार पवार गटाचा कसोटीचा काळ आहे. यामध्ये एकही सीट गमावून चालणार नाही अशी स्थिती आहे. त्यातच साताऱ्याची जागा म्हणजे खासदार पवार गटाचे नाक आहे. ही सीट तर कोणत्याही परिस्थितीत निवडूण आणण्यासाठी त्यांना प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यामुळे आता खुद्द शरद पवार यांनाच साताऱ्याच्या जागेसाठीच्या निर्णयाचे शिवधनुष्य पेलावे लागणार आहे. त्यामुळे आता उमेदवारी कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Satara Loksabha Election
Hatkanangle Loksabha : हातकणंगलेत राजू शेट्टींना 'मविआ'चा पाठिंबा? उद्या घोषणेची शक्‍यता, मुंबई-दिल्लीत घडामोडींना वेग

बाळासाहेब पाटलांच्या विरोधाची कारणे

  • सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत स्वतः आमदार पाटील निवडणूक रिंगणात होते. त्यावेळीही खासदार पाटील यांनी उघड भूमिका घेतली नाही.

  • शेती उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत आमदार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. त्यात खासदार पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली नाही.

  • कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघातील गावात निधी टाकताना विचारात घेण्यात आले नाही.

पाटणकरांच्या विरोधाची कारणे

  • पाटण मतदारसंघातील गावात विकास कामांसाठी निधी टाकताना पाटणकर गटाला विचारात घेतले गेले नाही.

  • सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत सत्यजितसिंह पाटणकर निवडणूक रिंगणात असताना खासदार पाटील यांनी कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही.

  • पाटण बाजार समिती निवडणुकीत खासदार पाटील यांनी कोणतीही स्पष्ट भूमिका घेतली नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()