Dr. Shrikant Shinde : उल्हासनगरात डॉ. श्रीकांत शिंदेंच्या विजयासाठी भाजपाने कसली कंबर; ओमी कालानीचीही कमिटमेंट

नरेंद्र मोदी यांच्या गळ्यात पुन्हा पंतप्रधान पदाची माळ टाकण्यासाठी अब की बार 400 पार चा नारा भारतीय जनता पक्षाने दिला आहे.
Dr. Shrikant Shinde
Dr. Shrikant Shindesakal
Updated on

उल्हासनगर - नरेंद्र मोदी यांच्या गळ्यात पुन्हा पंतप्रधान पदाची माळ टाकण्यासाठी अब की बार 400 पार चा नारा भारतीय जनता पक्षाने दिला आहे. त्यासाठी महायुतीतील प्रत्येक उमेदवार निवडून देण्यासाठी रणनीती आखणाऱ्या भाजपने एकजूट अभेद्य ठेवून कल्याण लोकसभेचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विजयासाठी कंबर कसली आहे.

महायुतीची एकजूट अभेद्य ठेवण्याचे व डॉ. शिंदे यांच्यासाठी काम करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी उल्हासनगरात आयोजित करण्यात आलेल्या भाजपा कार्यकर्त्यांच्या बैठकीत केले आहे.

शिवसेना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, भाजपा आमदार कुमार आयलानी, विधानसभा संयोजक जमनादास पुरसवाणी, भाजप जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी, शिवसेना शहरप्रमुख राजेंद्रसिंग भुल्लर, भाजपचे नरेंद्र राजानी, प्रकाश माखीजा, लाल पंजाबी, महेश सुखरामानी, मनु खेमचंदानी, दीपक छतलानी, प्रशांत पाटील आदी यावेळी उपस्थित होते.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही महायुद्धात महायुतीत सामील झाल्यास त्याचा आनंद होईल अशी प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली आहे. श्रीकांत शिंदे यांनी भाजपच्या पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याची इच्छा प्रगट केल्यामुळे आजची बैठक बोलावण्यात आल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

उल्हासनगरला विकास निधी कमी पडू दिलेला नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू असून यापुढेही या शहराच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

ओमी कालानीचीही डॉ. शिंदेंसाठी कमिटमेंट

शहरातील टीम ओमी कालानी चे सर्वेसर्वा व युथ आयकॉन ओमी कालानी यांची पत्नी पंचम कालानी ह्या राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाच्या जिल्हाध्यक्ष आहेत. मात्र पक्ष कोणताही असो लोकसभा निवडणुकीत डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासाठी काम करण्याचे कमिटमेंट ओमी कालानी यांनी दिले आहे.

दुसरीकडे महायुतीतील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस भरत गंगोत्री यांचे कॅम्प नंबर 5 मधील भाटिया रोड, नेताजी चौक, मठमंदिर आदी परिसरात वर्चस्व असल्याने शिवसेना शिंदे गट, भाजपा, राष्ट्रवादी अजित पवार, टीम ओमी कालानी यांच्यामुळे डॉ. श्रीकांत शिंदे यांना एकतर्फी मतदान होणार असे चित्र दिसू लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.