Rajapur Constituency : समाजवादी विचारसरणीच्‍या नाथ पै पर्वाचा अस्त; बेळगावला गेले अन् तिथंच त्यांचं..

प्रजा समाजवादी पक्षाने नाथ पैंच्या रूपाने राजापूर मतदारसंघात भक्कम पाय रोवले.
Nath Pai Praja Samajwadi Party Rajapur Constituency
Nath Pai Praja Samajwadi Party Rajapur Constituencyesakal
Updated on
Summary

नाथ पै (Nath Pai) यांनी लोकसभेत आपल्या कामाची छाप पाडली. त्यांचे भाषण सुरू झाले की, पूर्ण संसद स्तब्ध होऊन ऐकत राहायची.

Lok Sabha Elections : लोकसभेची १९६७ मध्ये झालेली निवडणूक आधीच्या लढतीसारखाच निकाल घेऊन आली. त्यात राजापुरात प्रजा समाजवादी पक्ष, तर रत्नागिरीत काँग्रेसने (Congress) पुन्हा यश मिळविले. या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढण्याबरोबरच विजयी उमेदवारांच्या मतांमध्ये मोठी वाढ झाली. या निवडणुकीत रत्नागिरीत पुन्हा एकदा काँग्रेसच्या शारदा मुखर्जी (Sarada Mukherjee) यांनी बाजी मारली. तेथे ४,५१,२०१ मतदार होते. त्यातील २,७५,८६८ इतक्या मतदारांनी हक्क बजावल्याने मतांची टक्केवारी ६१.१४ इतकी झाली.

Nath Pai Praja Samajwadi Party Rajapur Constituency
Rajapur Loksabha : संयुक्त महाराष्ट्राचा बुलंद आवाज मोरेश्वर जोशी; 'या' योगदानामुळं काँग्रेसनं शिक्षकावर सोपवली मोठी जबाबदारी

१९६२ च्या तुलनेत (४६.९६) ही टक्केवारी जास्त होती. यावेळी भारतीय जनसंघ आणि काँग्रेस यांच्यात खरी लढाई होती. यात काँग्रेसच्या मुखर्जी यांनी १,१२,१३८ इतकी मते घेत विजय मिळविला. भारतीय जनसंघाचे आर. जी. कळसकर यांना ६१,६९९, अपक्ष के. जी. पवार यांना ३७,९१४, प्रजा समाजवादी पक्षाचे एम. व्ही. प्रधान यांना २४,६९३, तर पी. ‘डब्ल्यूपी’चे जे. आर. तावडे यांना १९,७८५ इतकी मते मिळाली.

राजापुरातही मतांची टक्केवारी वाढली. तेथे ३,९६,०६३ मतदारांपैकी २,३५,९०९ जणांनी हक्क बजावला. १९६२ च्या ४७.५० टक्के मतदानाच्या तुलनेत ही ५९.५६ इतकी टक्केवारी होती. यात २,२१,९९३ मते वैध ठरली. या ठिकाणी तिरंगी लढत झाली होती. बॅ. नाथ पै यांनी यावेळी तिसऱ्यांदा विजयी होत मोठे मताधिक्य मिळविले. त्यांना १,२६,६५३ मते मिळाली. यामुळे प्रजा समाजवादी पक्षाने नाथ पैंच्या रूपाने राजापूर मतदारसंघात भक्कम पाय रोवले. काँग्रेसच्या एस. एस. आजगावकर यांना ६७,५६९, तर ‘पीडब्ल्यूपी’च्या आर. टी. कळंगुटकर यांना २७,७७१ मते मिळाली.

Nath Pai Praja Samajwadi Party Rajapur Constituency
Sangli Loksabha : उद्धव ठाकरेंची 'मशाल' पेटली! सांगलीच्या जागेसाठी काँग्रेसची हतबलता; बालेकिल्ला निसटणार?

नाथ पै (Nath Pai) यांनी लोकसभेत आपल्या कामाची छाप पाडली. त्यांचे भाषण सुरू झाले की, पूर्ण संसद स्तब्ध होऊन ऐकत राहायची. स्वतः पंडित नेहरू त्यांचे भाषण ऐकण्यासाठी थांबायचे. मुत्सद्दी आणि शाश्वत विकासाचे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यासाठी प्रयत्न करणारे नेते, अशी त्यांची ओळख होती. मधल्या काळात दिल्लीत झालेल्या राजकीय अस्थिरतेचा फायदा घेऊन मुत्सद्दीपणे त्यांनी कोकण रेल्वेसाठीचा सर्व्हे करून घेतला होता.

१७ मे १९७१ ला ते बेळगावला गेले होते. हुतात्मा श्रद्धांजलीसाठीचा कार्यक्रम सुरू होता. याच दरम्यान त्यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने तळकोकणात राजकीयदृष्ट्या मोठी पोकळी निर्माण होते की काय, अशी स्थिती निर्माण झाली. त्यांनी आपल्या राजकारणातील कारकिर्दीत उमटवलेला ठसा कोकणात आजही तितकाच तेजस्वीपणे तळपत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.