Madha Constituency Lok Sabha Election Result: शरद पवारांनी भाजपला दाखवला कात्रजचा घाट! माढ्याचा गड धैर्यशील मोहिते पाटलांनी जिंकला!

Dhairyasheel Mohite Patil Madha Lok Sabha Election Result 2024 : माढ्यात मात्र कायमच चुरस असते. माढ्यात २०१४ मध्ये ६३.७१, २०१९ मध्ये ६३ टक्के तर २०२४ मध्ये ६३.६५ टक्के मतदान झाले आहे. सोलापूरच्या तुलनेत माढा पुन्हा एकदा आघाडीवर राहिल्याचे दिसले.
Madha Constituency Lok Sabha Election Resul
Madha Constituency Lok Sabha Election Resulesakal
Updated on

माढा लोकसभा मतदारसंघात धैर्यशील मोहीते पाटील यांनी मोठा विजय मिळवला आहे. त्यांना ६ लाख २२ हजार २१३ मते मिळाली आहेत. तर रामराजे सिंह निंबाळकर यांना ५ लाख ०१ हजार ३७६ मते मिळाली. १ लाख २० हजार ८३७ मतांनी रामराजे सिंह निंबाळकर यांचा पराभव झाला आहे. राष्ट्रीय समाज पार्टी पक्षाच्या उमेदवाराने घेतलेल्या मतामुळे देखील रामराजे यांना फटका बसला. रामचंद्र मयप्पा घुटुकडे यांना ५८ हजार ४२१ मते मिळाली आहेत.

माढा लोकसभा मतदारसंघात यावेळी चांगलाच चर्चेत आला. जागावाटपावरुन महायुतीतच अंतगर्त वाद झाले होते. यामुळे भाजपची कोंडी झाली होती. शरद पवारांचा बालेकिल्ला म्हणून माढ्याची ओळख आहे. या मतदारसंघाची निर्मिती २००९ मध्ये झाल्यानंतर शरद पवार येथून खासदार झाले होते. विजयसिंह मोहिते-पाटील २०१४ मध्ये खासदार झाले होते. पुढे मोहिते-पाटलांनी २०१९ ला भाजपमध्ये प्रवेश केला होता.

भाजपने यावेळी पुन्हा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली होती. त्यांच्या उमेदवारीला मोहिते-पाटील व फलटणमधून रामराजे नाईक निंबाळकर यांनी मोठा विरोध केला होता. तरी भाजप आपल्या निर्णयावर ठाम होती. शेवटी धैर्यशील मोहिते-पाटील यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाची तुतारी हाती घेऊन माढा लोकसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या विरोधात दंड थोपटले.

Madha Constituency Lok Sabha Election Resul
India Lok Sabha Election Results : 300च्या आधी थांबली NDAची गाडी, PM मोदींनी जनतेचे मानले आभार, काँग्रेस म्हणाली- मोदींच्या विरोधात जनादेश

विधानसभानिहाय परिस्थिती-

माढा लोकसभा मतदारसंघ हा सोलापूर आणि सातारा जिल्ह्यातील काही विधानसभा मतदारसंघानी बनला आहे. सोलापूर जिल्ह्यातील, करमाळा, माढा, सांगोला, माळशिरस, फलटण आणि माण–खटाव या तालुक्यांचा माढा लोकसभा मतदारसंघात समावोश होतो. करमाळा येथे संजय शिंदे हे आमदार आहेत. माढा येथून बबनदादा शिंदे, सांगोला येथे शिंदेंच्या शिवसेनेचे शहाजीबापू पाटील, माळशिरसमधून राम सातपुते हे भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे माढ्यात महायुतीचे वर्चस्व आहे.

सोलापूर जिल्हा

• २४४ - करमाळा विधानसभा मतदारसंघ

• २४५ - माढा विधानसभा मतदारसंघ

• २५३ - सांगोला विधानसभा मतदारसंघ

• २५४ - माळशिरस विधानसभा मतदारसंघ

सातारा जिल्हा

• २५५ - फलटण विधानसभा मतदारसंघ

• २५८ - माण विधानसभा मतदारसंघ

Madha Constituency Lok Sabha Election Resul
Maharashtra Lok Sabha Election Results: राज्यात भाजपचा धुव्वा तर काँग्रेसची लाट, वाचा लोकसभा निवकालाची प्रत्येक अपडेटट

आमदार कोण व कोणत्या पक्षाचे आहेत?

माढा विधानसभेत आमदार बबन शिंदे हे सध्या अजित पवार गट म्हणजे महायुतीचे आहेत. करमाळ्यात संजय शिंदे अपक्ष म्हणून निवडून आले होते, मात्र ते अजित पवार गटाच्या बाजूने असल्याचे बोलले जाते. करमाळ्यातील रश्मी बागल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. माण - याठिकाणी भाजपचे आमदार जयकुमार गोरे आहेत. फलटण - इथे अजित पवार गटाचे दीपक चव्हाण आमदार आहेत. माळशिरस - राम सातपुते हे भाजपचे आमदार आहेत. सांगोला या ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेचे शहाजीबापू पाटील आमदार आहेत.

माढा लोकसभेत कोणते मुद्दे गाजले -

कृष्णा-भीमा स्थिरीकरणासह सिंचनाचे प्रश्‍न, मोहिते-पाटील, निंबाळकरांचा विरोध कुठपर्यंत टिकणार?, ‘शेकाप’चे डॉ. अनिकेत देशमुख पवारांचे उमेदवार असण्याची शक्यता, नेते सोडून गेले तरीही शरद पवारांचा मतदारसंघावर प्रभाव कायम या मुद्द्यांवर निवडणूक गाजली. भाजपमध्ये झालेली अंतर्गत धुसफूस देखील चर्चेचा विषयी होतात.

किती मतदान झाले?

माढ्यात मात्र कायमच चुरस असते. माढ्यात २०१४ मध्ये ६३.७१, २०१९ मध्ये ६३ टक्के तर २०२४ मध्ये ६३.६५ टक्के मतदान झाले आहे. सोलापूरच्या तुलनेत माढा पुन्हा एकदा आघाडीवर राहिल्याचे दिसले. मागील निवडणुकीच्या तुलनेत माढ्यात ०.६५ टक्के मतांची वाढ झाली आहे.

२०१९ मध्ये कुणाचं पारडं जड होतं?

रणजितसिंह नाईक निंबाळकर (भाजप) विजयी मते : ५,८६,३१४

संजयमामा शिंदे (राष्ट्रवादी काँग्रेस) मते : ५,००,५५०

ॲड. विजयराव मोरे (वंचित बहुजन आघाडी) मते : ५१,५३२

दौलत शितोळे (अपक्ष) मते : १२,८६९

विजयी उमेदवारांचे मताधिक्य : ८५,७६४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.