राष्ट्रवादीच्या जगतापांचे बंड शमले; शरद पवार, जयंत पाटलांनी काढली समजूत, माढ्यात देणार मोहिते-पाटलांना साथ

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अनेकांनी खासदार शरद पवार यांची साथ सोडली.
Madha Lok Sabha Constituency
Madha Lok Sabha Constituency esakal
Updated on
Summary

माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या पाठीशी राहणार आहोत. जातीयवादी भाजपला रोखण्यासाठी आम्ही सदैव शरद पवार यांच्यासोबत राहणार आहोत.

सातारा : माढा लोकसभा मतदारसंघातील (Madha Lok Sabha Constituency) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे अभय जगताप (Abhay Jagtap) यांचे बंड शमविण्यात पक्षाला यश आले आहे. खुद्द खासदार शरद पवार (Sharad Pawar) व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी त्यांची समजूत काढल्यामुळे त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात न उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

तसेच त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे माढ्यात महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यापुढील अडचणी वाढण्‍याची शक्‍यता आहे. यासंदर्भात माहिती देण्यासाठी अभय जगताप यांनी साताऱ्यात पत्रकारांशी संवाद साधला.

Madha Lok Sabha Constituency
Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha : PM मोदी विजयाची हॅट्‌ट्रिक करणार आणि मी अडीच लाख मतांनी विजयी होणार - नारायण राणे

जगताप म्हणाले, ‘‘माढा लोकसभा मतदारसंघात आम्ही पक्षनिष्ठेने काम करत होतो. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अनेकांनी खासदार शरद पवार यांची साथ सोडली. तरीही आम्ही त्यांच्यासोबत राहून तुतारीचे काम माढा मतदारसंघात करत होतो; पण पक्षाकडून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून धैर्यशील मोहिते-पाटील (Dhairyasheel Mohite-Patil) यांना उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर आमचे कार्यकर्ते नाराज झाले. त्यांनी आम्ही केलेल्या तयारीच्या जोरावर अपक्ष लढण्याचा सल्ला दिला होता; पण खासदार शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माझी समजूत काढली, तसेच त्यांना भविष्यात संधी दिली जाईल, असाही शब्द दिला आहे.

Madha Lok Sabha Constituency
Kolhapur Lok Sabha : कुणाच्या तरी पराभवासाठी 'ते' माझ्यासोबत आले; गौप्यस्फोट करत मंडलिक सतेज पाटलांबद्दल काय म्हणाले?

त्यामुळे कार्यकर्त्यांची मने वळवली असून, आम्ही यापुढेही शरद पवार यांच्या तुतारीसोबतच राहणार आहोत, तसेच माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या पाठीशी राहणार आहोत. जातीयवादी भाजपला रोखण्यासाठी आम्ही सदैव शरद पवार यांच्यासोबत राहणार आहोत. जयंत पाटील यांनी माढा लोकसभेचा सर्व्हे केला होता. यामध्ये मोहिते पाटील यांचे नाव आघाडीवर होते. त्यामुळे त्यांनी माझी समजूत काढली असून, मला आणखी काम करण्याची गरज आहे.’’

Madha Lok Sabha Constituency
'लोकसभे'त सात कुटुंबांचेच वर्चस्व! 1977 पासूनचा इतिहास; कोल्हापुरातून गायकवाड-मंडलिक सर्वाधिक वेळा खासदार

विधानसभेची मागणी नाही...

विधानसभेला संधी दिली जाणार आहे का? यावर अभय जगताप म्हणाले, ‘‘त्यावेळी कोण उमेदवार असेल ते श्री. पवारच ठरवतील. मी तशी मागणी केलेला नाही.’’ ईडीची तुम्हाला भीती वाटत नाही का? यावर ते म्हणाले, ‘‘आता ईडीची कारवाई कोणावरही होते. त्यामुळे माझ्यावर कारवाई झाल्यास आश्चर्य वाटायला नको,’’ असेही त्यांनी नमूद केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()