गेल्या वेळी लोकसभा पोटनिवडणुकीत शुभम शेळके यांना मोठ्या प्रमाणात मते पडली होती. त्याचप्रमाणे यावेळीही मराठी भाषिकांनी समितीच्या पाठीशी उभे राहून आपली ताकद दाखवून द्यावी.
बेळगाव : बेळगाव लोकसभा (Belgaum Lok Sabha) मतदारसंघासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे (Maharashtra Ekikaran Samiti) महादेव पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. सामान्य कार्यकर्त्याला समितीने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिल्याने कार्यकर्त्यांतून समाधान व्यक्त केले जात आहे.
बेळगाव लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानंतर समितीकडे चंद्रकांत कोंडुसकर (Chandrakant Konduskar), साधना पाटील, आनंद आपटेकर व महादेव पाटील यांनी अर्ज दाखल केले होते. अर्ज दाखल झाल्यानंतर उमेदवार अंतिम करण्यासाठी शनिवारी बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी समितीचे ज्येष्ठ नेते ॲड. राजाभाऊ पाटील होते.
सुरुवातीला निवड कमिटीच्या सदस्यांनी चर्चा करून चारही इच्छुक उमेदवारांनी आपसात चर्चा करून एक उमेदवार ठरवावा, अशी सूचना करण्यात आली. मात्र, एकमत होऊ शकले नाही, त्यानंतर चारही उमेदवारांच्या मुलाखती झाल्या. यावेळी चंद्रकांत कोंडुसकर यांनी आपला अर्ज मागे घेत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर निवड समितीच्या सदस्यांनी तीन उमेदवारांबाबत चर्चा करून एकमताने महादेव पाटील यांची निवड जाहीर केली.
माजी आमदार मनोहर किणेकर यांनी मराठी भाषा आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी समिती कार्यरत असून, सीमालढ्याचा एक भाग म्हणून समिती निवडणूक लढवीत असते. गेल्या वेळी लोकसभा पोटनिवडणुकीत शुभम शेळके यांना मोठ्या प्रमाणात मते पडली होती. त्याचप्रमाणे यावेळीही मराठी भाषिकांनी समितीच्या पाठीशी उभे राहून आपली ताकद दाखवून द्यावी. राष्ट्रीय पक्षांमधील उमेदवारांबाबत नाराजी आहे. त्यामुळे मराठी भाषिकांनी एकत्र राहून प्रयत्न केल्यास समितीचा विजय नक्की होईल, असे मत व्यक्त केले.
यावेळी तालुका समितीचे सचिव एम. जी. पाटील, रणजित चव्हाण-पाटील, विकास कलघटगी, आर. आय. पाटील, रामचंद्र मोदगेकर, बाळू केरवाडकर, म. ए. युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, शुभम शेळके, आर. के. पाटील, पांडुरंग पट्टण, ॲड. सुधीर चव्हाण, रमेश माळवी, राकेश पलंगे, ॲड. अमर येळूरकर, मनोहर हलगेकर, राजू बिर्जे, मदन बामणे, रमेश पावले, मोतेश बार्देशकर, श्रीकांत कदम, मोनाप्पा संताजी, आर. एम. चौगुले, प्रमोद पाटील, दत्ता जाधव, सागर पाटील, रणजित हावळान्नाचे, उमेश कुऱ्हाळकर, विकास देसूरकर, सूरज कणबरकर आदी उपस्थित होते.
महादेव पाटील यांची निवड झाल्यानंतर त्यांचा फेटा व हार घालून सत्कार करण्यात आला. तसेच समितीकडे निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या आपटेकर, साधना पाटील व चंद्रकांत कोंडुसकर यांचाही सन्मान झाला. यावेळी अनेकांनी समितीच्या उमेदवारासाठी देणगीही जाहीर केली. सर्वांनी प्रचारासाठी अधिक वेळ देण्याचा निर्णयही घेतला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.