Maharashtra Lok Sabha Election 2024 Result : सुरुवातीचे कल हाती; कोण आघाडीवर, कोण पिछाडीवर? पहिले कल का असतात महत्त्वाचे?

पहिल्या पंधरा मिनिटांमध्ये एनडीए १२३ जागांवर आघाडीवर होतं तर इंडिया आघाडी केवळ ५२ जागांवर आघाडीवर होतं. सुरुवातीला आलेले कलच महत्त्वाचे ठरतात, असा इतिहास आहे. एक्झिट पोलने एनडीएला साडेतीनशे जागांपेक्षा जास्त जागा मिळतील, असा अंदाज दिलेला आहे. तर इंडिया आघाडी दीडशे ते दोनशे जागा जिंकेल, असा अंदाज आहे.
Modi, Amit Shah, Eknath Shinde, Uddhav Thackeray, Ajit Pawar, Fadnavis
Modi, Amit Shah, Eknath Shinde, Uddhav Thackeray, Ajit Pawar, Fadnavisesakal
Updated on

Lok sabha election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवारी मतमोजणी होत आहे. सकाळी ८ वाजल्यापासून मतांच्या मोजणीला सुरुवात झाली असून सुरुवातीच्या अर्ध्या तासामध्ये देशभरात शंभरपेक्षा जास्त जागांचे कल हाती आलेले आहेत. पहिल्या कलांनुसार एनडीए पुढे असून इंडिया आघाडीने पिछाडी घेतल्याचं दिसतंय.

पहिल्या पंधरा मिनिटांमध्ये एनडीए १२३ जागांवर आघाडीवर होतं तर इंडिया आघाडी केवळ ५२ जागांवर आघाडीवर होतं. सुरुवातीला आलेले कलच महत्त्वाचे ठरतात, असा इतिहास आहे. एक्झिट पोलने एनडीएला साडेतीनशे जागांपेक्षा जास्त जागा मिळतील, असा अंदाज दिलेला आहे. तर इंडिया आघाडी दीडशे ते दोनशे जागा जिंकेल, असा अंदाज आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातून हाती आलेल्या कलांनुसार कोल्हापूरमध्ये शाहू महाराज आघाडीवर आहेत, पुण्यातून मुरलीधर मोहोळ आघाडीवर आहेत, रत्नागिरीतून नारायण राणे आघाडीवर आहेत. तर ठाण्यातून राजन विचारे आघाडीवर आहेत, पालघरमध्ये मविआच्या भारती कामडी आघाडीवर आहेत.

Modi, Amit Shah, Eknath Shinde, Uddhav Thackeray, Ajit Pawar, Fadnavis
Maharashtra Lok Sabha Election Results: राज्यात भाजपचा धुव्वा तर काँग्रेसची लाट, वाचा लोकसभा निवकालाची प्रत्येक अपडेटट

सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे तर अमरावतीमध्ये नवनीत राणा आघाडीवर आहेत.

ईशान्य मुंबईतून मिहीर कोटेचा आघाडीवर आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.