Maharashtra lok sabha election 2024 result : काकाच ठरले पुतण्यावर वरचढ; अजित पवारांचा प्रयोग फसला?

lok sabha election results 2024 ncp ajit pawar sharad pawar seats : विकासासाठी आणि मोदींसाठी एनडीएमध्ये सहभागी झाल्याचं सांगणाऱ्या अजित पवारांना लोकसभा निवडणुकीत मात्र फारकाही यश मिळेल, असं वाटत नाही. कारण कलांनुसार केवळ एक जागेवर त्यांचा उमेदवार आघाडीवर आहे.
Maharashtra lok sabha election 2024 result
Maharashtra lok sabha election 2024 resultesakal
Updated on

Ajit pawar ncp lok sabha result : लोकसभा निवडणुकांचे कल हाती येऊ लागले आहेत. एक्झिट पोलने जे अंदाज मांडले होते होते ते सपशेल खोटे ठरत असल्याचं चित्र आहे. कारण देशामध्ये इंडिया आघाडी २२८ जागांवर आघाडीवर असून एनडीए २९० जागांवर आघाडीवर आहे. सकाळी ११ वाजताचे हे कल आहेत.

महत्त्वाचे म्हणजे अजित पवारांनी जो गाजावाजा करुन महायुतीमध्ये सहभाग घेतला आणि सत्तेची पदं मिळवली, तो त्यांचा निर्णय मतदारांना रुचला नसल्याचं दिसून येत आहे. विकासासाठी आणि मोदींसाठी एनडीएमध्ये सहभागी झाल्याचं सांगणाऱ्या अजित पवारांना लोकसभा निवडणुकीत मात्र फारकाही यश मिळेल, असं वाटत नाही. कारण कलांनुसार केवळ एक जागेवर त्यांचा उमेदवार आघाडीवर आहे.

रायगडमधून सुनील तटकरे हे आघाडीवर आहेत. बाकी तीन उमेदवार पिछाडीवर आहेत. महायुतीमध्ये अजित पवारांना पाच जागा मिळाल्या होत्या. एक सोडता सर्व ठिकाणी त्यांचे उमेदवार पिछाडीवर आहेत. विशेष म्हणजे शिरुरमधून आढळराव पाटील पिछाडीवर आहेत. हे कल सायंकाळपर्यंत बदलू शकतात.

दुसरीकडे शरद पवारांच्या गटाने १० पैकी ८ जागांवर आघाडी घेतली आहे. शिरुरमध्ये अमोल कोल्हे आणि बीडमध्ये बजरंग सोनवणे आघाडीवर आहेत. अत्यंत कमी वेळेत मशाल हे चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचवण्याचं जिकिरीचं काम त्यांच्या पक्षाने केल्याने मोठं यश पदरी पडत आहे.

कोणी किती जागा लढल्या?

  • भाजप - 28

  • शिंदे गट - 15

  • अजित पवार - 4

  • महादेव जानकर - 1

  • उद्धव ठाकरे - 21

  • काँग्रेस -17

  • शरद पवार - 10

शिरुर लोकसभा मतदारसंघाचे २०१९चे चित्र

डॉ. अमोल कोल्हे (राष्ट्रवादी काँग्रेस) विजयी मते : ६३५८३०

शिवाजीराव आढळराव पाटील (शिवसेना) मते : ५७७३४४

राहुल ओव्हाळ (वंचित बहुजन आघाडी) मते : ३८०७०

जमीरखान कागदी (बहुजन समाज पक्ष) मते : ७२४७

विजयी उमेदवाराचे मताधिक्य : ५८,४८६

लोकसभेचा रणसंग्राम

🔴मोदी करणार हॅट्रिक की राहुल गांधी देणार धक्का ? देशभरातल्या मतदारसंघांचे क्षणाक्षणाचे अपडेट्स जाणून घ्या LIVE

https://www.esakal.com/lok-sabha-election/lok-sabha-election-results-live-updates-2024-general-elections-winners-list-in-indian-constituencies-all-state-nivadnuk-outcome-for-india-congress-vs-nda-bjp-modi-vs-gandhi-all-in-marathi-news-kgm00

🟣मविआ मारणार बाजी की महायुती गड राखणार ? जाणून घ्या महाराष्ट्राचा महानिकाल LIVE

https://www.esakal.com/maharashtra/maharashtra-lok-sabha-election-results-live-updates-2024-general-elections-matdar-sangh-nikal-news-candidates-winners-list-and-their-constituencies-mva-mahayuti-shivsena-ubt-ncp-sp-bjp-know-all-nivadnuk-events-in-marathi-bam92

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.