Maharashtra Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रासह देशभरातील मतदानाची टप्पे कसे असतील? संपूर्ण माहिती एका क्लिकवर

Maharashrta Lok sabha Constituency wise voting dates: महाराष्ट्रातही लोकसभेच्या ४८ मतदारसंघांमध्ये पाच टप्प्यांत मतदान होणार आहे.
Maharashtra Loksabha Election 2024
Maharashtra Loksabha Election 2024Sakal
Updated on

Maharashtra Lok Sabha Election Five Phases List:

लोकसभेसाठी देशात सात टप्प्यांत मतदान होणार असून हा मतदानाचा कालावधी खूप मोठा असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. महाराष्ट्रातही लोकसभेच्या ४८ मतदारसंघांमध्ये पाच टप्प्यांत मतदान होणार आहे. कोणत्या राज्यांमध्ये किती टप्प्यांत व केव्हा मतदान होणार? याची माहिती अशी...

महाराष्ट्रात महिनाभर चालणार मतदानाची प्रक्रिया (Maharashtra Lok Sabha Election Five Phases List)

महाराष्ट्रात यंदा ९ कोटी १२ लाख ४४ हजार ६७९ मतदार मतदानाचा हक्क बजावण्यास पात्र ठरले असून ही आतापर्यंतची विक्रमी संख्या मानली जाते.या वेळी महाराष्ट्रात प्रथमच तब्बल पाच टप्प्यांत मतदान होणार आहे. यामुळे राजकीय पक्षांना प्रचारासाठी पुरेसा वेळ मिळेल. मुंबईतील सहाही मतदारसंघांसाठी २० मे रोजी मतदान होणार आहे. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्याचे मतदान १९ एप्रिल रोजी होणार असून मुंबई परिसरातील शेवटचे मतदान २० मे रोजी होणार असल्याने राज्यात जवळपास महिनाभर निवडणूक प्रक्रिया सुरू राहील. राज्यात ९७ हजार ३२५ मतदान केंद्रे असतील.

तुमच्या भागात मतदान कधी? जाणून घ्या Maharashrta Lok sabha 2024 constituency wise voting dates

महाराष्ट्रातील मतदान (Maharashtra Loksabha Election Poll Voting Dates

पहिला टप्पा : १९ एप्रिल : रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर

दुसरा टप्पा : २६ एप्रिल : बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ - वाशीम, हिंगोली, नांदेड, परभणी

तिसरा टप्पा : ७ मे : रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले

चौथा टप्पा : १३ मे : नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड

पाचवा टप्पा : २० मे : धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ

कोणत्या राज्यांमध्ये किती टप्प्यांत व केव्हा मतदान होणार? याची माहिती अशी.

 अरुणाचल प्रदेश (२) : एकाच टप्प्यात १९ एप्रिलला मतदान

 आसाम (१४) : तीन टप्प्यांत- १९ एप्रिल, २६ एप्रिल व ७ मे

 बिहार (४०) : सात टप्प्यांत- १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे, २० मे, २५ मे व १ जून

 छत्तीसगड (११)- तीन टप्प्यांत - १९ एप्रिल, २६ एप्रिल व ७ मे

 दिल्ली (७) : एका टप्प्यात - २५ मे

 गोवा (२): एका टप्प्यात- ७ मे

 गुजरात (२६) : एका टप्प्यात ७ मे

 हरियाना (१०) : एका टप्प्यात २५ मे

 हिमाचल प्रदेश (४)- एकाच टप्प्यात १ जून

 जम्मू - काश्मीर (५)- पाच टप्प्यांत १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे व २० मे

 झारखंड (१४) - चार टप्प्यांत- १३ मे, २० मे, २५ मे व १ जून

 कर्नाटक (२८) - दोन टप्पे- २६ एप्रिल व ७ मे

 केरळ (२०)- एका टप्प्यात २६ एप्रिल

 मध्यप्रदेश (२९) - चार टप्पे- १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, व १३ मे.

 मणिपूर (२)- एक टप्पा- १९ एप्रिल

 मेघालय (२)- एक टप्पा- १९ एप्रिल

 मिझोराम (१)- एक टप्पा- १९ एप्रिल

 नागालँड (१)- एक टप्पा- १९ एप्रिल

 ओडिशा (२१)- चार टप्पे - १३ मे, २० मे, २५ मे व १ जून

 पंजाब (१३)- एकाच टप्प्यात- १ जून

 राजस्थान (२५)- दोन टप्पे- १९ एप्रिल व २६ एप्रिल

 सिक्कीम (१)- एक टप्पा- १९ एप्रिल

 तमिळनाडू (३९)- एक टप्पा- १९ एप्रिल

 तेलंगण (१७) - एक टप्पा- १३ मे

 त्रिपुरा (२) - दोन टप्पे - १९ एप्रिल व २६ एप्रिल

 उत्तराखंड (५) - एक टप्पा- १९ एप्रिल

 उत्तरप्रदेश (८०)- सात टप्पे- १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे, २० मे, २५ मे व १ जून

 पश्चिम बंगाल (४२)- सात टप्पे- १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे, २० मे, २५ मे व १ जून

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.